गुन्हे विषयक
…या शहरात चोरी,गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर हद्दीतील संजयनगर परिसरातील गणेश कॉलनी येथे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून चोरी केली असून त्यामुळे संजयनगर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

संजयनगर येथील रहिवासी असलेले सिकंदर शेख यांच्या नव्या बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी येथील गेट व दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला होता.बेडरूममधील कपाटाची उचकापाचक करून लॉकरमधील एक लाख रुपये किमतीची व १ तोळा वजनाची सोन्याची पोत चोरी केली आहे.
संजयनगर येथील रहिवासी असलेले सिकंदर शेख यांच्या नव्या बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी येथील गेट व दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला होता.बेडरूममधील कपाटाची उचकापाचक करून लॉकरमधील एक लाख रुपये किमतीची व १ तोळा वजनाची सोन्याची पोत चोरी केली आहे.ही घरफोडीची घटना १८ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजेपासून १९ नोव्हेंबरच्या पहाटेच्या सुमारास झाली आहे.
दरम्यान या चोरीची माहिती शेजाऱ्याकडून मिळाल्यानंतर घरमालक आयुब शेख यांनी जुन्या घराकडून त्यांच्या नव्या घराकडे धाव घेतली,असता त्यांना घरातून १ तोळा वजनाची पोत चोरी झाल्याचे समजले.याबाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.



