निवडणूक
कोपरगाव पालिकेत…इतक्या जणांची माघार !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आपले नामनिर्देशन छाननीच्या दिवशी सकाळी 11 पासून 2.30 वाजे पर्यंत केलेल्या छाननीत नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या अर्जात माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे यांचा अर्ज बाद झाला असल्याची माहिती हाती आली असून आज 161 नामनिर्देशन पैकी 56 अर्ज बाद झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून आता वैध अर्ज 181 शिल्लक राहिले असताना आज राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुहासिनी कोयटे यांचेसह नगरसेवक पदाचे मोहसीन मेहमूद सय्यद,नंदिनी जनार्दन कदम आदी तीन जणांनी आपली तलवार म्यान केली असल्याने आता केवळ 178 अर्ज शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान आता कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आपले नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे दोन दिवस शिल्लक असताना शिंदेसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,अजित पवार गटाचे बहुचर्चित उमेदवार ओमप्रकाश कोयटे,भाजप कोल्हे गटाकडून पराग संधान,निष्ठावान भाजप कडून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,योगेश वाणी तर उबाठा कडून सपना भरत मोरे आदीचे अर्ज शिल्लक असून आता दोन दिवसात कोण आपली तलवार परजनार आणि कोण म्यान करणार हे उघड होणार आहे.त्याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आपले नामनिर्देशन भरण्याचे अखेरच्या दिवशी आज शिंदेसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,अजित पवार गटाचे बहुचर्चित उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांनी आ.आशुतोष काळे यांचे उपस्थितीत तर भाजप कोल्हे गटाकडून पराग संधान यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत तर निष्ठावान भाजप कडून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,तर उबाठा कडून सपना भरत मोरे आदी नऊ जणांनी वाजतगाजत आपले अर्ज दाखल केले होते यातील डमी असलेल्या सुहासिनी कोयटे यांचा अर्ज वगळता अन्य सर्व अर्ज वैध ठरले आहे.तर बाद मधील एकूण 56 अर्ज बाद झाले होते.त्यानंतर आज माघार घेण्याचा पहिला दिवस होता त्यामुळे कोण-कोण या रणांगणातून माघार घेणार याकडे शहर वासियांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.त्यात वरील तीन नावे समोर आली आहे.अद्याप आपले नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहे.त्यानंतर शहरात नगरपरिषद निवडणुकीत दुरंगी निवडणूक होणार की बहुरंगी हे उघड होणार आहे.

दरम्यान नगरसेवक पदासाठी शिल्लक अर्ज पुढील प्रमाणे आहे –
30 सदस्यांच्या जागांसाठी २२२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया मोठ्या जोमात सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी शंभर सदस्यांनी ११० अर्ज तर अध्यक्ष पदासाठी ७उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले आहे.यात सोमवारी प्र. क्र.१ ब मध्ये गायकवाड शुभम विनायक अपक्ष,प्र. क्र.२ अ मध्ये खरे दिनकर शाहूराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,बाबुराव सावळेराम पवार अपक्ष,प्र. क्र. २ ब मध्ये शेख फमिदा हसन शिवसेना,न्याजोबी सरदारखा पठाण अपक्ष,पवार संगीता श्रीनिवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,प्र. क्र.३ अ मध्ये आढाव निर्मला सोमनाथ,राष्ट्रबादी काँग्रेस पक्ष,प्र. क्र.३ व मध्ये,गायकवाड मयूर विजय भाजपा,नरोडे सुधाकर बाबुराव अपक्ष,नरोडे सुधाकर बाबुराव शिवसेना,प्र. क्र. ४ अ मध्ये उदावंत संजना संजय भाजपा,नरोडे सीमा हनुमंत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, साळुंखे मंदा पिराजी शिवसेना,प्र. क्र. ४ ब मध्ये काले अतुल धनालाल भाजपा,शिदे आतिश सतीश अपक्ष,मोरे भरत आसाराम,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,प्र.क्र. ५ अ मध्ये जगताप योगेश बंडू,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,माळी अक्षय बाळासाहेब शिवसेना, प्र.क्र.५.अ मध्ये घायताडकर शोभा अशोक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,घायताड़कर भाग्यश्री कुणाल,-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,मढवई मंदा निखिल-शिवसेना,मढ़वई मंदा निखिल-अपक्ष,थोरात प्रियंका किरण-अपक्ष,प्र.क्र.६ अ मध्ये बागुल पद्मावती बोगेश- अपक्ष,खैरनार सुनिता मुनील-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,प्र. क्र.६ व मध्ये रुईकर प्रकाश फकीरराव,-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शेवाळे संदीप मोतीराम,-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,भूतडा मुकुंद रामेश्वर,-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,डुंबरे संदीप रामदास-शिवसेना,गायकवाड शुभम विनायक अपक्ष,शिंदे जनार्दन रघुनाथ-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शेख सलीम चनेमिया-अपक्ष प्र. क्र. ७ अ मध्ये सारंगधर प्रसाद दिलीप-शिवसेना,शिलेदार प्रतिभा सुनील-राष्ट्रबादी काँग्रेस पक्ष,प्र.क्र.७ व मध्ये पहाडे गौरी मंदार-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,खरात काजल विशाल-शिवसेना,कोपरे मोनिका प्रशांत,-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,प्र.क्र.८ अ मध्ये जाधव अर्चना सुखदेव,-अपक्ष,शिंदे वैशाली शुभम,-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,त्रिभुवन सुनंदा माधव-बहुजन समाज पार्टी,साबळे कल्याणी नितीन,-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,सोनटक्के,मनीषा सुरेश- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,मरसाळे विमल भगवान,-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,प्र. क्र.८ ब मध्ये पठाण हैदर हमीद-अपक्ष,फुरेशी खालिक जमालभाई-अपक्ष,कुरेशी खालिक जमालभाई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,त्रिभुवन माधव सखाराम-बहुजन समाज पक्ष,आत्तार इम्तियाज रफिक – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,प्र.क्र. ९ अ मध्ये शेजवळ संतोष अर्जुन -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,रणशूर उज्वला जितेंद्र,-भाजपा,पवार मधुकर विश्राम-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,शिंदे सचिन अशोक,-शिवसेना,खंडीझोड राजेंद्र जयदेव,-अपक्ष,खरात नितीन रमेश-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,आहेर सागर निंबा-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,प्र. क्र.९ व मध्ये आभाळे जयश्री राजेंद्र-,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शेख शमा अयुब अपक्ष,भगत बिना विजय,-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,धोत्रे भाग्यश्री चंद्रकांत,-अपक्ष, फडे अंजना गंगाधर,-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,प्र. क्र. १० ब मध्ये भसाळे श्रेया श्रीपाद-शिवसेना,प्र. क्र. ११ अ मध्ये आरणे स्वाती संतोष,-अपक्ष,त्रिभुवन सोनम अरुण-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,पवार आशाबाई बाळू-शिवसेना,भालेराव संगीता गुलाब-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,कांबळे अंजना संजीव-शिवसेना,भालेराव संगीता गुलाब-अपक्ष,प्र. क्र. ११ ब मध्ये कडू प्रशांत बाळासाहेब-भाजपा,शिदे योगेश छबुराव-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,काळे शुभम कैलास-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,म्हस्के चंद्रशेखर सुधाकर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,वाणी नयनकुमार काशिनाथ-भाजपा,पठाण आसिफ मेहबूच-बहुजन समाज पक्ष,साटोटे सदाशिव भिकन-अपक्ष, प्र.क्र. १२ अ मध्ये चव्हाण जयश्री कैलास- शिवसेना,मंजुळ सविता कैलास -भाजपा,मणियार समीना अन्सार-अपक्ष,शेख सुमैय्या इरफान-अपक्ष,शिंपी भारती शामकांत-बहुजन समाज पक्ष,होणे अश्विनी संतोष-अपक्ष, होणे अश्विनी संतोष-रा.कॉ.प,कुरेशी रहमून्नीसा राजमहंमद-अपक्ष,मंजुळ सविता कैलास-अपक्ष,प्र. क्र. १२ ब मध्ये साठे सिद्धार्थ चंद्रकांत-भाजपा,सय्यद मेहमूद मनवरभाई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,मोरे योगेश बन्सीलाल-शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे,सय्यद मेहमूद मनवरभाई -पक्ष,सय्यद मोहसिन मेहमूद-अपक्ष,-वाघ सनी रमेश अपक्ष,प्र. क्र.-१३ अ मध्ये पंडोरे आकाश भास्कर-शिवसेना,धसे सखाराम जयवंता-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,प्र. क्र.१३ व मध्ये चव्हाण सुरेखा विकी अपक्ष,पठाण जुलेखा मेहबूब -बहुजन समाज पक्ष,सय्यद शाईन शफिक अपक्ष,प्र. क्र.१४ अ मध्ये गंगुले शंकर वसंतराव-शिवसेना,ईश्वरे मच्छिंद्र सारंगधर-भाजपा,ईश्चरे मच्छिंद्र सारंगधर-अपक्ष,मोरे प्रशांत सुनील-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,बागवाल इकबाल गनी -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,मोरे प्रशांत सुनील-अपक्ष,प्र. क्र.१४ व मध्ये गंगुले मिराबाई शंकर-अपक्ष,शिंदे माधुरी मच्छिंद्र-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,बागबान यास्मिन गनी-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,लांडगे सविता अशोक-अपक्ष,प्र. क्र. १५ अ मध्ये वंदन लक्ष्मण साबळे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,प्र.क्र. १५ व मध्ये हाडा गगन अनिल-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,मोरे प्रशांत सुनील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,पारखे निलेश प्रभाकर-अपक्ष. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १९२ सदस्यांनी २19 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे तर नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवाराने 14 अर्ज दाखल केलेले आहे.आता आगामी दोन दिवसात किती जण रणांगणातून पळ काढणार आणि किती जण जोर बैठका काढणार हे आगामी दोन दिवसात कळणार आहे.



