निवडणूक
भाऊ आणि काकांची बैठक झाली निष्फळ!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आता नवीन रंग भरू लागले असून अद्याप आपले नामनिर्देशन पत्र मागेही घेतले नसताना अनेकांना आता आपले जुने उट्टे काढण्याची संधी अनेकांना मिळू लागली आहे.यातच नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असताना प्रचार सुरू केला आहे.त्यातच त्यांच्या पक्ष प्रवेशाने दुखावलेले माजी सहकारी व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्याकडे आगामी धोका ओळखून त्यांच्या नाकदुऱ्या काढण्याचा प्रसंग आला असून त्यात त्यांचा कुदळे त्यांनी आपला पत्ता उघड केला तर नाहीच पण मागील सर्व हिशेब चुकता केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे शहरात भाऊ आणि काकांच्या झालेल्या निष्फळ बैठकीच्या चर्चेला जोरदार उधाण आले आहे.

आपल्या नगराध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे घरचे लग्न समजून राष्ट्रवादी आ.काळे गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे हे आपले जुने मित्र असलेल्या पद्मकांत कुदळे यांना काल सायंकाळी त्यांच्या घरी गाठले असता त्यांनी आपल्या मनात अनेक वर्ष खदखदत असलेली सल काढून टाकल्याने अनेकांना आपण का आलो ? असा प्रश्न न पडला तर नवल होते.दरम्यान आ.काळे यांची मोठी पंचाईत झाली असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्यानंतर घडले ते आक्रितच.
राजकारणाइतके द्वाड क्षेत्र कोणतेही नाही.येथे कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि निरंतर शत्रूही.आणि कोणाचे पारडे कधी जड होईल आणि कोणाचे पारडे निचांकी जाईल याचाही काही धरबंध नसतो.कधी तर जुनी ऊनीदुणी काढण्याची कधी संधी येईल हेही सांगता येत नाही.त्यामुळे राजकारणाला शक्यतांची कला असेही म्हणतात.आणि हे क्षेत्र इतके अस्थिर झाले आहे की,कोणाचा काहीही धरबंध येथे धरता येत नाही हेच खरे.शत्रू समोर दिसत असला तरी संधी मात्र मांडी शेजारी बसलेला मित्र अशी उपाधी धारण केलेला साधत असतो.आमच्या प्रतिनिधीने यापूर्वीच अजित पवार राष्ट्रवादीची उमेदवारी अकल्पितपणे ओमप्रकाश कोयटे यांना जाहीर झाल्याने अनेकांना धक्का बसला होता.त्यांच्या पक्षप्रवेशाला तर माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांना धक्का बसल्याने त्यांना ‘कृष्णाई ‘ मधून काढता पाय घ्यावा लागला होता.त्याचे वृत्त याआधी आमचे ‘न्युजसेवा ‘ वेब पोर्टलवर येऊन गेलेलं आहे.खरे तर कोयटे आणि कुदळे हे एकेकाळी एकमेकांचे परममित्र होते.नव्वदच्या दशकात त्यांनी निवारा हौसिंग सोसायटी उभारून आपल्या भविष्याला आकार दिला होता.कुदळे यांचे श्वसुर संभाजीराव यांनी या दोन मित्रांच्या स्वप्नांना आकार दिला होता.त्यातूनच ही जोडी कोपरगाव शहराच्या आणि तालुक्याच्या आसमंतात मोठ्या डौलाने उभी राहिली आणि त्यांचे कौतुक साऱ्या दूनियाने पाहिले आहे.आज ही दोन्ही नावे सामान्य या सदरात मोडत नाही.तरीही अल्पसंख्याक असल्याने ती डरकाळ्या फोडत नाही एवढेच फक्त.त्यांनी तालुक्यातील प्रस्थापित काळे आणि कोल्हे यांचा पदर धरुनच राजकारण करण्याचा प्रयत्न केला.कधी कोल्हेंशी बिनसले तर काळेंना जवळ केले.मात्र त्या दोघांना सोडून ही मंडळी दूर गेली नाही.नाही दोघांशी जमले तर त्यांनी कोणालाही थेट आव्हानही दिले नाही.मिळेल ते पदरात घेऊन ही मंडळी आपले अस्तित्व टिकवून ठेवत राहिली.

राजकारणात काळे,कोल्हे,विखे आदींना आपल्या कानाच्या वर गेलेला कोणीही कार्यकर्ता चालत नाही हे संभाजी काळे,नामदेवराव परजणे,(हे त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे याचे व्याही होते हे इथे उल्लेखनीय )भानुदास पाटील दंडवते,पंडितराव जाधव,माजी आ.स्व.दादा पाटील रोहमारे,अशोक रोहमारे,संदीप वर्पे,नितीन औताडे,विजय वहाडणे आदींनी त्याचा कटू अनुभव घेतला आहे.राजेश परजणे हे केवळ आपले संस्थान मंत्री विखे यांच्या धाकाने टिकवून आहे.
दरम्यान त्यांच्या उभारीच्या काळात मात्र यांनी एकत्र येऊन समता पतसंस्था काढली होती.मात्र त्यातून पुढे कोयटे यांनी कुदळे यांना विश्वासात न घेता समता इंटरनॅशनल स्कूल काढले आणि त्यांना समता पतसंस्थेतील काढून टाकले असल्याचा अनेकांचा दावा आहे.परिणामी त्यांच्या संबंधात कटुता आली होती.परिणामी कुदळे यांनी स्वतंत्र पतसंस्था काढून त्यांना कृतीतून उत्तर दिले होते.इथपर्यंत बरोबरी ठीक होती.कुदळे यांनी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचेशी एकनिष्ठ राहून आपले राजकारण केले त्यातून बऱ्याच वेळा ते संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहिले होते.मात्र नंतरच्या काळात त्यांच्यात कटुता आली आणि त्यांनी दहा वर्षापूर्वी कोल्हे गटास रामराम ठोकला होता.आणि माजी आ.अशोक काळे यांच्यात गोटात सामील झाले आहे.तेथे त्यांचा माजी आ.काळे आणि सन्मान करत त्यांना कारखान्याचे संचालकपद बिनबोभाट दिले होते.तर कोयटे यांनी गेली पंचवीस वर्षात राजकारणापासून अलिप्त राहून आपली सहकारी पतसंस्था चळवळीत मोठी दमदार वाटचाल सुरू केली होती.आणि त्यात पाळेमुळे रोवून त्यांनी आपल्याला सिध्दही केले आहे.पतसंस्था चळवळ त्यांनी राज्यात पसरवली आणि नंतर देशातही.परिणामी त्यांचे सहकाऱ्यांचे जाळे आता देशभर पसरले आहे.त्यांना आशियायी पतसंस्था चळवळीत ही योगदान दिले आहे.तेथे आता ते संचालक आहे.(इथेच आता खरी गोम सुरू झाली आहे)

दरम्यान कुदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आधीच माळी बोर्डिंगमध्ये माळी समाजाची एक बैठक घेऊन ओरिजनल ओबीसी कार्यकर्त्यांचे नगराध्यक्षपदाची संधी द्यावी अशी मागणी केली होती.त्यामुळे माळी समाजासह अन्य ओबीसी समाज उमेदवारी नाकारल्याने काळे आणि कोल्हे यांच्या उमेदवारांना किती मतदान करणार याकडे शहरातील मतदानाचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान नगरपरिषदेचे ढोल वाजण्यास सुरुवात झाल्यावर व नगराध्यक्षपद ओबीसी साठी राखीव झाल्यावर पद्मकांत कुदळे यांचे चिरंजीव दिनार कुदळे यांना आ.आशुतोष काळे यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही न मागता दिली होती.मात्र त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन प्रथम आणि नंतर राजकारण हा अग्रक्रम ठरलेला असल्याने (तालुक्यातील अनेकांनी नव्हे सर्वच रिकामटेकड्यानी तो अंगिकारावा असाच आहे) त्यांनी विनम्रपणे त्यास नकार दिला आहे.आणि येथेच खरी संघर्षाची सुरुवात झाली आहे.उमेदवाराच्या शोधात आ.काळे यांना मग ओबीसी आणि लोकप्रिय चेहरा म्हणून कोयटे खुणावू लागले होते.मात्र ते आपल्याला निमंत्रणाचा स्वीकार करणार नाही याची खूणगाठ बांधून त्यांनी आपले नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले होते.त्यात कोल्हे आणि विखे यांच्यात मागील वर्षी गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत वीतुष्ट आल्याने त्यांनी ही नामी संधी साधली असल्याचे बोलले (!) जात आहे.या नगरपरिषद निवडणुकीची संधी साधून विखे यांनी आपले गणेशचे उट्टे काढण्याची संधी म्हणून न पाहिले तर नवल.त्यांनी आ.काळे आणि अजित पवार कोयटे यांना पक्ष प्रवेशासाठी आणखी प्रोत्साहन दिले असल्याचे मानले जाते.

माजी आ.कोल्हे आणि मंत्री विखे यांच्यात मागील वर्षी गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मोठे वीतुष्ट आल्याने त्यांनी कोपरगावची ही नामी संधी साधली असल्याचे बोलले (!) जात आहे.या नगरपरिषद निवडणुकीची संधी साधून विखे यांनी आपले गणेशचे उट्टे काढण्याचे ठरवले असल्यास नवल नाही.यातून सूज्ञास पुढील चित्रपट उलगडणे सहज सोपे आहे.
दरम्यान आता प्रचार सुरू झाल्यावर कोयटे यांना आपल्या जुन्या मित्रांची म्हणजेच पद्मकांत कुदळे यांची आठवण न झाली तर नवल होते.त्यांनी काल सायंकाळी त्यांच्या टाकळी शिवारातील वस्तीवर जात आपल्या जुन्या मित्राला जोडण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे समवेत आ.आशुतोष काळे,नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेन बोरावकें,माजी नगराध्यक्षा तथा त्यांच्या धर्मपत्नी सुहासिनी कोयटे,व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी पद्मकांत कुदळे यांनी आपल्या अनेक वर्षात मनात खदखदत असलेली सल काढून टाकल्याने अनेकांना आपण का आलो ? असा प्रश्न न पडला तर नवल होते.कुदळे यांनी चांगलेच तोंडसुख घेतल्याचे मानले जात आहे.दरम्यान आ.काळे यांची मोठी पंचाईत झाली असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र यावेळी कुदळे यांनी थेट कोयटे यांना मदत करण्याचा कोणताही शब्द दिला नसल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे जेवणाच्या पहिल्याच घासात खडा लागावा अशी परिस्थिती कोयटे यांचेवर ओढवली असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान यावर हे प्रकरण थांबले असले तर नवल होते.यात सहभागी शीर्षस्थ नेत्याने उमेदवाराला घरी जावू दिल्यावर पुन्हा घटनास्थळी धाव घेऊन कुदळे यांची भेट घेऊन यांचे तोंडावर हात फिरवला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यामुळे कोयटे यांनी याबाबत आगामी चाली ओळखणे किती गरजेचे आहे.आणि आपल्याला पंचवीस वर्षाच्या राजकारणाबाहेर राहून आपले फेडरेशन,पतसंस्था आणि शिक्षण संस्था यातून आपण किती शत्रू निर्माण केले हे ओळखणे गरजेचे आहे हे प्रतिबिंबित झाले असल्याचे मानले जात आहे.वर्तमानात त्यांनी कोयटे यांना अडचणीत आणण्याचा आणि प्रहार करण्यास सुरुवात केली आहे.राजकारणात काळे,कोल्हे,विखे आदींना आपल्या कानाच्या वर गेलेला कोणीही कार्यकर्ता चालत नाही हे संभाजी काळे,नामदेवराव परजणे,(हे त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे याचे व्याही होते हे इथे उल्लेखनीय )भानुदास पाटील दंडवते,पंडितराव जाधव,माजी आ.स्व.दादा पाटील रोहमारे,अशोक रोहमारे,संदीप वर्पे,नितीन औताडे,विजय वहाडणे आदींनी त्याचा कटू अनुभव घेतला आहे.राजेश परजणे हे केवळ आपले संस्थान मंत्री विखे यांच्या धाकाने टिकवून आहे हे कोणीही नाकारणार नाही.दोन्ही गडावरील किंवा संस्थानातील नेते एक तर विष घालून मारतो आणि दुसरा गुळात घालून मारतो.आगामी काळात कोयटे हे नेमके कोणत्या स्थानी आहे याचा शोध त्यांनी घेणे गरजेचे बनले आहे.
दरम्यान कुदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आधीच माळी बोर्डिंगमध्ये माळी समाजाची एक बैठक घेऊन ओरिजनल ओबीसी कार्यकर्त्यांचे नगराध्यक्षपदाची संधी द्यावी अशी मागणी केली होती.त्यामुळे माळी समाजासह अन्य ओबीसी समाज उमेदवारी नाकारल्याने काळे आणि कोल्हे यांच्या उमेदवारांना किती मतदान करणार याकडे शहरातील मतदानाचे लक्ष लागून राहिले आहे.त्यामुळे कदाचित शिंदे सेना आपले भविष्य घडवू शकत असल्याचे आताच बोलले जावू लागले आहे.



