निवडणूक
…या नगरपरिषद निवडणुकीत अब तक छप्पन !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आपले नामनिर्देशन छाननीच्या दिवशी सकाळी 11 पासून 2.30 वाजे पर्यंत केलेल्या छाननीत नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या अर्जात माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे यांचा अर्ज बाद झाला असल्याची माहिती हाती आली असून आज 161 नामनिर्देशन पैकी 56 अर्ज बाद झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून आता वैध अर्ज 181 शिल्लक राहिले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी दिली आहे.

कोपरगाव नगराध्यक्षपदासाठी आता 09 अर्ज बाकी राहिले आहे.यातील उमेदवार पराग संधान,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे,शिवसेना उबाठा गटाच्या सपना मोरे,शिंदे सेनेचे उमेदवार राजेंद्र झावरे,अपक्ष उमेदवार दिपक वाजे,तर शेवटी वरिष्ठ स्तरावरून आपली उमेदवारी भरण्याचे फर्मान आल्याने तो भरला ते उमेदवार योगेश वाणी आदी उमेदवार आपले नशीब अजमावत आहे.
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आपले नामनिर्देशन भरण्याचे अखेरच्या दिवशी आज शिंदेसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,अजित पवार गटाचे बहुचर्चित उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांनी आ.आशुतोष काळे यांचे उपस्थितीत तर भाजप कोल्हे गटाकडून पराग संधान यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत तर निष्ठावान भाजप कडून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,तर उबाठा कडून सपना भरत मोरे आदी नऊ जणांनी वाजतगाजत आपले अर्ज दाखल केले होते यातील डमी असलेल्या सुहासिनी कोयटे यांचा अर्ज वगळता अन्य सर्व अर्ज वैध ठरले आहे.तर बाद मधील एकूण 56 अर्ज बाद झाले असल्याने आता आगामी तीन दिवसात कोण आपली शस्त्रे म्यान करणार याकडे नागरिकांचे या निवडणूकांकडे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात निवडणूक होत असलेल्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र सादर करण्याचा काल शेवटचा दिवस होता.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नव्हती.येथेही इच्छुकांनी आपल्या समर्थक नेते आणि कार्यकर्त्यांसह मोठी गर्दी केली होती.
कोपरगाव येथे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोपरगावच्या नगराध्यक्षपदासाठी नऊ जणांनी १५ आणि नगरसेवकपदाच्या ३० जागांसाठी २२१ असे एकूण २३६ इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत व मुख्याधिकारी सुहास जगताप आदींनी दिली दिली होती.

आज झालेल्या छाननीत तब्बल 56 अर्ज बाद झाले असून ही बहुधा पहिलीच वेळ असावी.त्यामुळे आता निवडणुकीचा रिंगणात 181 नामनिर्देशन पत्र बाकी राहिले असल्याचे दिसून येत आहे.तर नगराध्यक्ष पदासाठी आता 09 अर्ज बाकी राहिले आहे.यातील उमेदवार पराग संधान,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे,शिवसेना उबाठा गटाच्या सपना मोरे,शिंदे सेनेचे उमेदवार राजेंद्र झावरे,अपक्ष उमेदवार दिपक वाजे,तर शेवटी वरिष्ठ स्तरावरून आपली उमेदवारी भरण्याचे फर्मान आल्याने तो भरला ते उमेदवार योगेश वाणी आदी उमेदवार आपले नशीब अजमावत आहे.ते लढणार की आपली सपशेल शरणागती पत्करनार हे आगामी तीन दिवसात लवकरच कळणार आहे.



