जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावात नगराध्यक्ष,नगरसेवकपदासाठी विक्रमी अर्ज,शिमगा सुरू !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आपले नामनिर्देशन भरण्याचे अखेरच्या दिवशी आज शिंदेसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,अजित पवार राष्ट्रवादी गटाचे बहुचर्चित उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांनी आ.आशुतोष काळे यांचे उपस्थितीत तर भाजप कोल्हे गटाकडून पराग संधान यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत तर निष्ठावान भाजप कडून माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,तर उबाठा कडून सपना भरत मोरे यांनी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे उपस्थितीत अशा नऊ जणांनी वाजतगाजत आपले अर्ज दाखल केले असून आता खरा शिमगा सुरू होणार असल्याने नागरिकांचे या निवडणूकांकडे लक्ष लागून राहिले आहे.

भाजप कोल्हे गटाकडून माजी आ.स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे उपस्थितीत पराग संधान आणि त्यांचे सहकारी आपला अर्ज दाखल करताना दिसत आहे.


  

  

   राज्यात निवडणूक होत असलेल्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र सादर करण्याचा आज शेवटचा दिवस होता.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नव्हती.येथेही इच्छुकांनी आपल्या समर्थक नेते आणि कार्यकर्त्यांसह मोठी गर्दी केली होती.

नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल करताना शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,जिल्हाध्यक्ष सचिन कोते सह शिवसेना उमेदवार सपना भरत मोरे आदी दिसत आहेत.

   कोपरगाव येथे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोपरगावच्या नगराध्यक्षपदासाठी नऊ जणांनी १५ आणि नगरसेवकपदाच्या ३० जागांसाठी २२१ असे एकूण २३६ इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत व मुख्याधिकारी सुहास जगताप आदींनी दिली आमच्या प्रतिनिधींना दिली आहे.

  

  

कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे अपक्ष उमेदवारी दाखल करताना त्यांचे सहकाऱ्यासमवेत दिसत आहेत.

    दरम्यान आजपर्यंत आठ दिवसात नगराध्यक्षपदासाठी ९ जणांचे १५ उमेवारी अर्ज दाखल झाले आहेत.भाजपकडून पराग संधान,राष्ट्रवादी अजीत पवार गट ओमप्रकाश कोयटे,शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे राजेंद्र झावरे,उद्धव सेनेकडून सपना भरत मोरे,तर अपक्ष म्हणून विजय वहाडणे,अपक्ष उमेदवार दिपक वाजे,माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे,भाजपचे योगेश वाणी,रहिमुलीसा कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.तीस सदस्यांच्या जागांसाठी २२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

  

 

एकनाथ शिंदे सेनेच्या वतीने आपले नामनिर्देशन पत्र दाखल करताना माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे व त्यांचे सहकारी दिसत आहेत.

   दरम्यान विविध पंधरा प्रभागात एकूण प्रभाग निहाय आलेल्या अर्जांची छाननी सुरू असून त्यांचे आकडेवारी आणि नावे समजण्यास उशीर होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी महेश सावंत यांनी दिली आहे.या अर्जांची छाननी मंगळवार दि.१८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

माजी नगराध्यक्षा सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे.त्यावेळी संदिप कोयटे दिसत आहे.

   

दरम्यान अद्याप निवडणूक अर्ज माघार झालेली नसताना माजी आ.कोल्हे गटाने आ.काळे गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांच्यावर आरोप सुरू केले असून कोयटे यांनी प्रत्यारोपांची राळ उडवून दिली असल्याने आगामी निवडणुकीची चुणूक पाहायला भेटू लागली आहे.

  दरम्यान आलेल्या अर्जांची छाननी झालेल्या उमेदवारांची माघार घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असल्याचे समजत आहे.त्यामुळे आता छाननीत नेमके काय होणार याकडे नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांत धाकधूक सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close