निवडणूक
कोपरगाव शहराला आपण रोज पाणी मिळवून देऊ-या नेत्याचे आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावची माणसे पाण्यासाठी सहनशील म्हणून प्रसिद्ध आहे.त्यांना आजही चार दिवसांना पाणी मिळते.स्वच्छ पाणी हा नागरिकांचा हक्क आहे.पण तो मिळत नाही.म्हणून आगामी काळात सपना मोरे यांना निवडून दिले तर शहराला आपण आगामी काळात पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

“खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सहकार्याने सपना मोरे या नगराध्यक्षपदासाठी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करून आगामी काळात ज्यांना सेनेत यापूर्वी दगा फटका झाला अशा जुन्या कार्यकर्त्यांना आगामी काळात सामावून घेऊन न्याय देण्यास मदत करणार आहे.महाआघाडीसाठी अन्य सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत घेणार आहे”-भरत मोरे,माजी शहर प्रमुख,शिवसेना(उबाठा)
कोपरगाव शहराच्या नगरपरिषद निवडणुकीत अधिकृत उमेदवारी सपना भरत मोरे यांनाच दिलेली असून त्या कोपरगाव शहराला न्याय देतील.तसेच शहरातील बंडखोरांना रोखण्यासाठी आपण वरिष्ठ नेत्यांना आपण अहवाल देणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांनी काल सायंकाळी जाहीर केली असताना आज दुपारी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज भरत मोरे यांच्या कार्यालयाला भेट देऊन नगरसेवक यांना शिवसेनेचे ए.बी.फॉर्म सुपूर्त केले त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान यावेळी प्रभाग क्रमांक सहा मधून
संदीप शेवाळे,प्रभाग क्रमांक ०७ मधून मोनिका प्रशांत कोपरे,बिना भगत यांना प्रभाग क्र.०९ मधून तर मधुकर पवार आदींना उमेदवारी जाहीर करून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव,माजी शहर प्रमुख भरत मोरे,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सपना मोरे,शिर्डी लोकसभा मतदार संघाचे समन्वयक मुकुंद सिनगर,शहर युवा आघाडीचे अध्यक्ष गगन हाडा,बिना भगत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना खा.वाकचौरे म्हणाले की,”सेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत आहे.त्यांना आगामी काळात उज्ज्वल भवितव्य मिळणार आहे.जीवनात माणसाला संघर्षाशिवाय काही मिळत नाही.भरत मोरे या संघर्षशील कार्यकर्त्यांच्या धर्मपत्नी सपना मोरे यांना पक्षाने न्याय दिला आहे.गरिबांचे काम करणारी संघटना म्हणून सेना ओळखली जाते.आगामी सिंहस्थ पर्वणीत मोठी संधी असून शहराच्या विकासासाठी आपण निधी मिळविण्यास प्रयत्न करू.सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आदींना कोपरगावच्या मतदारांनी मतदान करावे आणि उद्या नामनिर्देशन दाखल करण्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी शेवटी खा.वाकचौरे यांनी केले असून सपना मोरे या निवडणुकीत नक्की विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी प्रास्ताविक माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी केले त्यावेळी ते म्हणाले की,”खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सहकार्याने सपना मोरे या नगराध्यक्षपदासाठी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.आगामी काळात ज्यांना सेनेत यापूर्वी दगा फटका झाले अशा जुन्या कार्यकर्त्यांना आगामी काळात सामावून घेऊन न्याय देण्यास मदत होणार आहे.महाआघाडीसाठी अन्य सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत करणार आहे.आगामी काळ निवडणुकाचा म्हणजेच युध्दाचे दिवस आहे.सावध रहावे लागणार आहे.ज्यांनी प्रवेश केला त्यांचा सत्कार केला जाईल अशी घोषणा करून यावेळी राष्ट्रवादीचे उपशहराध्यक्ष ऋषिकेश खैरनार,आदींना प्रवेश दिला आहे.त्यांचा सत्कार खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे हस्ते करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी सूत्रसंचालन मुकुंद सिनगर यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार गगन हाडा यांनी मानले आहे.



