जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

उबाठा सेनेचा…हा नेता हाती धरणार धनुष्य बाण !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

     कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली असून ओमप्रकाश कोयटे यांनी आ.काळे गटात प्रवेश केल्याने शहरात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून आज झालेल्या घडामोडीत सपना भरत मोरे यांची (उबाठा) शिवसेनेकडून निश्चीत झाली असून परिणामी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी नाराज होत आता मशालीकडे पाठ फिरवली असल्याचे मानले जात असून त्यांनी आता आपला मोर्चा शिंदे सेनेच्या धनुष्याकडे वळवला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून उद्या दुपारी 12 वाजता त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित समजला जात आहे.त्यामुळे आता महाविकास आघाडीत आता संदीप वर्पे आणि काँग्रेसचे नितीन शिंदे शिवाय राहिले कोण ? असा सवाल तालुक्यात निर्माण झाला आहे.

माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी आपल्या सौभाग्यवती सपना मोरे यांचेसाठी खा.संजय राऊत यांना हाताशी धरून आपला नेमका बाण मारला असून त्यांना नूतन जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांचे सहाय्य होत असल्याचे दिसत आहे.खा.संजय राऊत यांचेपुढे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हतबल असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.परिणाम व्हायचा तोच झाला असून राजेंद्र झावरे सेनेतून उद्या बाहेर पडत असून शिंदे सेनेचे धनुष्य हाती धरत आहे.

     राजकारण हे शक्यतांची कला समजली जाते येथे काहीही घडू शकते आणि काहीही बिघडू शकते अशी स्थिती कधीही निर्माण होऊ शकते.याचा ताजा अनुभव कोपरगावकरांना नगरपरिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आला आहे.राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आगामी 02 डिसेंबरला संपन्न होणार आहे.त्या दिशेनं निवडणूक आयोगाने प्रवास सुरू केला असून काल दि.१० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून आज नामनिर्देशन भरण्याचा चौथा दिवस होता.त्याची अंतिम मुदत-१७ नोव्हेंबर असून आता आपले नामनिर्देशन भरण्यासाठी केवळ तीन दिवस राहिले आहे.त्यामुळे राजकीय आसमंतात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे.शिवसेनेच्या अनेक मातब्बर शिवसैनिकांना माजी आ.कोल्हे गटाने गळाला लावल्याने शिवसेना नेमकी किती शिल्लक राहिली ? असा सवाल निर्माण झाला आहे.उरलीसुरली आता दोन गटात विभागली असून त्यांच्या आता सरळसरळ दोन तट पडले असल्याचे दिसू लागले आहे.नगराध्यक्ष पदावरून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आणि भरत मोरे यांच्यात दोन गट पडले आहे.परिणामी व्हायचा तोच परिणाम झाला असून राजेंद्र झावरे यांची ही शेवटची निवडणूक असल्याने त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.त्यांचे काळे आणि कोल्हे विरूध्द यशाचे मेरिट चांगले मानले जात होते.प्रशासनाचा अनुभव त्यांच्या पदरी होता.मात्र मोरे यांनी खा.संजय राऊत यांना हाताशी धरून आपला नेमका बाण मारला असून त्यांना नूतन जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांचे सहाय्य होत असल्याचे दिसत आहे.खा.संजय राऊत यांचेपुढे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हतबल असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

  

शिवसेना आधी माजी सन-2004 साली आ.काळे यांच्या गळाला काही लागली होती.त्यानंतर सन -2014 साली माजी आ.कोल्हे यांच्या कछप्पी लागली होती.आणि उरली-सुरली आता शिंदे सेनेच्या गळाला लागली असल्याने कोपरगाव तालुक्यातील शिवसेना उद्या दुर्बिणीतून पहावी लागली तर नवल वाटू नये.आणि यात विशेष म्हणजे वरिष्ठ नेत्यांचे मोठे योगदान राहिले आहे हे विशेष !

   दरम्यान खा.संजय राऊत यांनी सपना मोरे यांच्या विजयाची हमी घेतली असल्याची माहिती हाती आली आहे.परिणामी झावरे त्यांचे बद्दल त्यांना सहानुभुती असूनही ते काहीही करू शकत नाही.परिणामी त्यांचे कार्यकर्त्यांनी दुपारी 12 वाजता भेट घेतली मात्र त्यात काहीही साध्य होताना दिसले नाही.परिणामी दुपारी त्यांना 05 वाजे पर्यंत थांबण्यास भाग पाडले मात्र तरीही उपयोग न झाल्याने त्यांनी थेट कोपरगाव शहराचा रस्ता धरला आहे.आता त्यांच्या अपेक्षा मावळल्या असून झावरे यांची अवस्था आता,’ हे फळ का मम तपाला ‘ अशी झाली असून त्यांनी आता अशा सोडल्या आहे.आणि आता शिंदे सेनेकडून अपेक्षा वाढल्या आहेत.हताश झालेल्या कार्यकर्त्यांनी अखेर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा,’आखरी रस्ता ‘ धरला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. शिंदे सेनेशी त्यांचे संधान साधल्यावर त्यांनी उद्या दुपारी पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे.परिणामी तोळा मासा असलेल्या शिंदे सेनेला बरे दिवस येण्याची शक्यता वाढली आहे.जेथे एक उमेदवारची चिंता होत्ती त्या ठिकाणी पूर्ण पॅनल उभा राहण्याची शक्यता वाढली आहे.त्यामुळे गेली पस्तीस चाळीस वर्षे उभी केलेली शिवसेना आता शेवटचे आचके देत असल्याचे उघड होत आहे.त्यांची कोपरगाव तालुक्यातील अवस्था ‘ चित्रपटातील मधील जेलर सारखी झाली असून,’आधे इधर जाओ,आधें उधर जावो,बाकी मेरे पीछे आओ ‘ अशी झाली आहे.आधी माजी सन-2004 साली आ.काळे यांच्या गळाला काही लागली होती.त्यानंतर सन -2014 साली माजी आ.कोल्हे यांच्या कछप्पी लागली होती.आणि उरली-सुरली आता शिंदे सेनेच्या गळाला लागली असल्याने शिवसेना उद्या दुर्बिणीतून पहावी लागली तर नवल वाटू नये.आणि यात विशेष म्हणजे वरिष्ठ नेत्यांचे मोठे योगदान राहिले आहे.कारण प्रत्येक निवडणुकीत त्यांनी आपले निष्ठावान स्वतंत्र उमेदवार देऊन आपला पक्ष वाढविण्यासाठी जे प्रयत्न करायला हवे होते ते तर केले नाहीच पण प्रत्येक निवडणुकीत उपरे उमेदवार आयात केले होते.आणि आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला होता.एव्हढेच नाही तर मोठे पॅकेज घेऊन सोयीचे उमेदवार देऊन आपल्याच शिवसैनिकांना आत्महत्या करायला भाग पाडले आहे.

वरिष्ठ नेत्यांच्या साखर सम्राट धार्जिण्या आणि आत्मघाती निर्णयामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यातील निष्ठावान भाजपची आणि सेनेच्या कार्यकर्त्यांची वाट लागली आहे.निष्ठावान भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आता एकच पर्याय शिल्लक राहिला असल्याचे दिसून येत आहे.आणि तो म्हणजे एखादी कोरडी विहीर पाहून सामूहिकरित्या आत्महत्या करणे हा होय.

   दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यातील निष्ठावान भाजपची वेगळी स्थिती नाही.निष्ठावान भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आता एकच पर्याय शिल्लक राहिला असल्याचे दिसून येत आहे.आणि तो म्हणजे एखादी कोरडी विहीर पाहून सामूहिकरित्या आत्महत्या करणे हा होय.ज्या पक्षासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले,आपल्या हाडाची काड केली,पक्ष वाढीसाठी जेलची हवा खाल्ली,टाचा घासल्या त्याच पक्षनेत्यांनी त्यांना आपल्या स्वार्थासाठी पक्ष वाढू तर दिला नाहीच पण ज्यांनी त्याग केला त्यांना इतरत्र जायला भाग पाडले आहे.परिणामी हा कधीकाळी क्रांतिकारी असलेला राज्यात प्रस्थापित नेत्यांना धाक निर्माण केलेला पक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचें नंतर आता लवकरच इतिहास जमा होणार असे स्पष्ट दिसू लागले आहे.साखर आणि मद्य सम्राटांच्या वेढ्यात हे पक्ष आता केंव्हाच हरवला आहे.त्याला भाजपची अपवाद नाही त्यांनीही तोच कित्ता गिरवला असल्याने लवकरच पश्चिम महाष्ट्रात आता हुकूमशाही अवतरणार आहे.शिर्डी आणि राहाता तालुका त्याचे ज्वलंत उदाहरण बनले आहे.येथे कार्यकर्त्याना थेट आव्हान दिले जात आहे. दोन्ही तालुक्यातील युवराज अभद्र बोलून त्यांना नाक खाजवून दाखवत आहे.आणि ते केवळ तमाशा पाहण्याशिवाय काही करू शकत नाही.अंतर्गत खदखद ही कधी आणि कोणत्या वेळी बाहेर पडले याचा काही नेम राहिलेला नाही.

 

  दरम्यान आताच हाती आलेल्या माहितीनुसार माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला असून त्याची प्रत आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली आहे.त्यामुळे या बातमीला दुजोरा मिळाला आहे.

  दरम्यान नव्याने हाती आलेल्या  माहितीनुसार प्रभाग क्रमांक तीन मधून माजी शहर प्रमुख कलविंदर दडीयाल यांची भावजय साठी भाजप कडून उमेदवारी मिळाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.याआधी प्रभाग क्रं.15 मधून शिवसेनेचे अनिल आव्हाड,प्रभाग क्रं.06 मधून या आधीच संजय सातभाई यांचे सुपुत्र विक्रम सातभाई,माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,प्रभाग क्रं.10 मधून रवींद्र कुलथे आदीं भाजपच्या गळाला लागले आहेच पण आता प्रभाग क्रं.चार मधून अतुल काले यांची उमेदवारी जाहीर झाली असल्याचे समजले जात आहे.तर राजेंद्र सालकर हे आपल्या पत्नीसाठी प्रभाग क्रं.03 मधून प्रतीक्षा यादीत वरच्या क्रमांकावर असल्याचे समजत आहे.अशा स्थितीत खा.संजय राऊत यांनी सपना मोरे यांचे शिवधनुष्य पेलले असल्याने (उबाठा) शिवसेनेचे सुकानु नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे असा प्रश्न कोणाही सूज्ञास न पडला तर नवल !

                ———————————

*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close