निवडणूक
एका म्यान्यातील दोन तलवारी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची माजी आ.कोल्हे गटाची काल नगराध्यक्षपदासह नगरसेवकांची उमेदवारी जाहीर झाला असताना आज दि.13 नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांचे नाव म्हणुन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे पुढे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.मात्र आता त्यांचे स्पर्धक माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे हे आ.काळे गटात राहणार की माजी आ.कोल्हे गटात जाणार असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.याबाबत कोपरगाव शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान कोयटे यांना हि उमेदवारी देण्यात नेमकी कोणी भूमिका निभावली याचा आमच्या प्रतिनिधीने शोध घेतला असता मुंबई येथे आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालनात आ.काळे यांनी दोन दिवसापूर्वी ही खिचडी पकवली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांना आणखी आधार देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रसद पुरवली असल्याची माहिती हाती आली असून विखे यांनी आधार दिल्याने आ.कोल्हे गटास हा अंतर्गत दणका समजला जात आहे.
राजकारण हे शक्यतांची कला समजली जाते येथे काही ही घडू शकते आणि काहीही बिघडू शकते अशी स्थिती कधीही निर्माण होऊ शकते.याचा ताजा अनुभव कोपरगावकरांना नगरपरिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आला आहे.राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आगामी 02 डिसेंबरला संपन्न होणार आहे.31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत.त्या दिशेनं निवडणूक आयोगाने प्रवास सुरू केला असून काल दि.१० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून आज नामनिर्देशन भरण्याचा तिसरा दिवस आहे.त्याची अंतिम मुदत-१७ नोव्हेंबर असून त्याची छाननीची तारीख-१८ नोव्हेंबर असून ते माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर आहे.अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत-२५ नोव्हेंबर आहे.तर निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी-२६ नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर होणार आहे.तर माघार झाली नाही तर मतदानाचा दिवस-२ डिसेंबर निश्चित करण्यात आला आहे.त्यामुळे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे.जोरजोराने ढोल-ताशे बडवले जात असून रणभेऱ्या गर्जत असून नाल,घोडे,तंग,तोबरा,जमा करण्यात सर्व गर्क आहे.सबब अजिबात नको अशी आरोळी झाली आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्या जागेवर अनेक ओबीसी नेते आणि कार्यकर्ते इच्छुक असताना माजी आ.कोल्हे गटाने त्यावर पाणी फिरवले आहे.परिणामी ओबीसी नेते आणि उमेदवारांत मोठी नाराजी दिसून येत आहे.आता आ.काळे गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय निरिक्षांचे लक्ष लागून राहिले होते.आज त्यासाठी त्यांनी,’ कृष्णाई ‘ मंगल कार्यालयात आपल्या उमेदवाऱ्या जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.त्यात अकल्पितपणें राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे नाव समोर आल्याने अनेक तरुण इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.त्यांना आपल्या चेहऱ्यावरील भाव लपवता आले नाही.कोयटे सहकारी पतसंस्था चळवळीतील बुजुर्ग नाव.आणि सहकार सोडून ते नगरपरिषद निवडणुकीत आपल्या दंडाच्या बेतकुळ्या दाखवतील अशी कोणालाही सुतराम शक्यता वाटत नव्हती.मात्र झाले ते आक्रितच.आपल्या वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी हनुमान उडी मारल्याने अनेकांनी तोंडांत बोटे घातली आहे.आधी तर त्यांचे चिरंजीव संदीप कोयटे व्यासपिठावर असल्याने ओमप्रकाश कोयटे त्यांचे नाव पुकरतील असा माध्यमांचा व्होरा होता.तो सपशेल चुकला आहे.त्यामुळे आता आगामी काळात शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहे.

दरम्यान कोल्हे गटाच्या उमेदवारी जाहीर झाल्यावर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या कोल्हे गटाच्या अनेक उमेदवारांशी आ.काळे गटाने संपर्क साधून लाल गालिचा अंथरला असल्याच्या बातम्या आहेत.त्यात एक नदीकाठचे माजी नगराध्यक्ष,एक विषय समितीचे सभापती,दोन सक्रिय कार्यकर्ते आदींचा समावेश आहे.
राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे आणि माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे खरे तर ही जोडगुळी 1980-90 च्या दशकात जास्त प्रकाश झोतात आलेली तरुण आणि होतकरू गणली गेलेली मंडळी.पदमाकांत कुदळे यांनी कोयटे यांना शिवाजीरोडचे किराणा दुकान सोडून त्यांना निवारा सोसायटीमधील प्लॉट खरेदी विक्रीत म्हणजेच रियल इस्टेट व्यवसायात आणले.आणि तेथून पुढे त्यांचे नशीब पालटले हे त्यांनीच एका निवारा हौसिंग सोसायटीच्या ‘संभाजी गार्डन’ येथील कार्यक्रमात कबूल केले आहे.(संभाजी गार्डन हे नाव कुदळे यांचे सासऱ्यांचे,त्यांनीच या जोडगुळीला या क्षेत्रात आणले होते )कुदळे यांनी 1985 साली नगराध्यक्षपद भूषवून आपल्या कालखंडात पिण्याचे पाणी रेशनवर वाटले हे रेकॉर्ड त्यांच्या काळात नोंदवले होते.त्याची सर्वदूर चर्चा त्यावेळी झडली होती.तर कोयटे यांच्या धर्मपत्नी सुहासिनी कोयटे यांनीही 1996-97 मध्ये नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती.तथापि ओमप्रकाश कोयटेंची संधी मात्र हुकली होती.त्यानंतर त्यांनी आपले लक्ष सक्रिय राजकारणात हटवून सहकारी पतसंस्था चळवळीत घातले होते.कोयटे आणि कुदळे यांनी 1998 मध्ये समता सहकारी पतसंस्था स्थापन केली होती.मात्र पुढे जावून कोयटे यांनी कुदळे यांची मर्जी सांभाळण्याऐवजी स्वतंत्र संस्था उभारणी सुरू केली आणि त्यांच्यात एका संस्थेवरून सौख्य बिघडले आणि पुढे त्यांच्यात बिनसले असल्याचे दिसून आले होते.

दरम्यान शिवसेना उबाठा गटात मोठी उलाढाल झाली असल्याचे समजत असून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे याचे नाव पिछाडीवर गेले असल्याचे समजत असून त्यांच्या जागी त्यांचे अंतर्गत प्रतिस्पर्धी भरत मोरे यांच्या धर्मपत्नी व माजी नगरसेविका सपना मोरे यांचे नाव आघाडीवर आले असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर चॅनल वापरला असल्याचे बोलले जात आहे.त्याबाबत अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.
सन-2012 च्या दरम्यान निवारा उपनगरात नगरसेवक उमेदवारी वरून दोघांत वितुष्ट येण्यास प्रारंभ झाला होता.त्यानंतर कुदळे यांनी आपली स्वतंत्र महिला सहकारी पतसंस्था स्थापन केली होती.आणि त्यांनी आपला सवता सुभा निर्माण केला आहे.त्यात ते यशस्वी ही झाले आहे.आज त्यांच्यात संवाद राहिलेला नाही.परिणामी एक काळे गटात असला तर दुसरा कोल्हे गटात जातो.त्यांची तोंडे विरूध्द बाजूला असतात असा नेहमी अनुभव येतो.आज उमेदवारी जाहीर होण्याच्या वेळी ओमप्रकाश कोयटे ‘ कृष्णाई ‘ कार्यक्रमस्थळी मध्ये येत आहे.आणि आ.काळे त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना देणार आहे.याची कुणकुण मिळाल्या-मिळाल्या त्यांनी तेथून काढता पाय घेतला होता.त्यातच सर्व काही आले आहे.
दरम्यान कोयटे यांना हि उमेदवारी देण्यात नेमकी कोणी भूमिका निभावली याचा आमच्या प्रतिनिधीने शोध घेतला असता मुंबई येथे आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालनात आ.काळे यांनी दोन दिवसापूर्वी ही खिचडी पकवली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांना आणखी आधार देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रसद पुरवली असल्याची माहिती हाती आली असून विखे यांनी आधार दिल्याने कोयटे यांनी थेट उडी घेतल्याचे बोलले जात आहे.परिणामी आ.कोल्हे गटास हा अंतर्गत दणका समजला जात आहे.दरम्यान आता कोल्हे गटाची खप्पा मर्जी होणार हे उघड आहे.त्याचा सामना ते कसा करणार हे पुढे उघड होणार आहे.परिणामी त्यांनी कोयटे यांना दणका देण्यासाठी तयारी केली असून माजी नगराध्यक्ष कुदळे यांना गळाला लावण्यासाठी आपल्या काही सरदारांची नेमणूक केली असल्याचे खात्रीलायक समजत आहे.त्यामुळे आगामी काळात 17 नोव्हेबर आज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शहरात राजकीय कुरघोड्याना वेग येणार आहे हे उघड आहे.
दरम्यान कोल्हे गटाच्या उमेदवारी जाहीर झाल्यावर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या कोल्हे गटाच्या अनेक उमेदवारांशी आ.काळे गटाने संपर्क साधून लाल गालिचा अंथरला असल्याच्या बातम्या आहेत.त्यात एक नदीकाठचे माजी नगराध्यक्ष,एक विषय समितीचे सभापती,दोन सक्रिय कार्यकर्ते आदींचा समावेश आहे.मात्र याची कुणकुण कोल्हे गटास लागल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना दुसऱ्या दिवशी ईशान्य गडावर पाचारण केल्याची माहिती आहे.आ.काळे गटास उमेदवारांची चणचण भासत असल्याची माहिती आहे.त्यामुळे त्यांची परवड होत आहे.शहरात कोल्हे गटाला मानणारा मोठा वर्ग असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे कोय टे आणि कुदळे यांच्या दोन तलवारी आता एका म्यान्यात राहणार की स्वतंत्र मार्ग निवडणार हे लवकरच कळणार आहे.



