जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अल्पसंख्यांक विकास

…या मतदारसंघात दोन कोटींचा निधी-माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

     कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण भागांचा विकासासाठी व नागरीकांना मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विविध अकरा कामासाठी २ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान या विकासकामांमध्ये चासनळी येथे मस्जिद परिसरात शेड व टॉयलेट बांधकाम करणे (२० लक्ष),कोळगाव थडी येथे ग्रा.मां. २९ ते इब्राहीम शेख वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे (३५ लक्ष), वेस येथे मुस्लिम भागात सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे (२० लक्ष),शिरसगाव येथे गोधेगाव रोड शेख वस्ती रस्ता मजबुतीकरण करणे (१० लक्ष),माहेगाव देशमुख येथे ग्रा.मा. २१ (६ चारी रस्ता) ते भिकन सय्यद वस्ती रस्ता मजबुतीकरण करणे (४० लक्ष) आदी अकरा कामाचा समावेश आहे.

   अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत,ज्यांचा उद्देश मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि जीवनमान उंचावणे हा आहे. यासाठी ‘ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम’ अंतर्गत पायाभूत सुविधा,कौशल्य विकास आणि शैक्षणिक सहाय्यासारख्या योजना राबवल्या जातात.या योजनांमध्ये संबंधित ग्रामपंचायतींमध्ये अल्पसंख्याक लोकसंख्येच्या किमान १०० किंवा अधिक लोकसंख्येच्या निकषावर आधारित निधी दिला जातो.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावांसाठी प्रस्ताव शासनाला पाठवले होते.त्यातून हा निधी मिळाला असल्याचे आ.काळे यांनी सांगितले आहे.या ०२ कोटी निधीतून रस्ते मजबुतीकरण,सांस्कृतिक सभागृह उभारणे,कब्रस्तान सुशोभीकरण व संरक्षण भिंत बांधकाम करणे,शेड व शौचालय बांधकाम करणे आदी कामांचा समावेश आहे.

   दरम्यान या विकासकामांमध्ये चासनळी येथे मस्जिद परिसरात शेड व टॉयलेट बांधकाम करणे (२० लक्ष),कोळगाव थडी येथे ग्रा.मां. २९ ते इब्राहीम शेख वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे (३५ लक्ष), वेस येथे मुस्लिम भागात सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे (२० लक्ष),शिरसगाव येथे गोधेगाव रोड शेख वस्ती रस्ता मजबुतीकरण करणे (१० लक्ष),माहेगाव देशमुख येथे ग्रा.मा. २१ (६ चारी रस्ता) ते भिकन सय्यद वस्ती रस्ता मजबुतीकरण करणे (४० लक्ष),रांजणगाव देशमुख येथे मुस्लिम कब्रस्थान सुशोभीकरण करणे व वॉल कंपाऊंड बांधकाम करणे (१० लक्ष), वारी येथे मुस्लिम कब्रस्थान सुशोभीकरण करणे (१० लक्ष), करंजी येथे मुस्लिम बहुल भागात सुशोभीकरण करणे (१० लक्ष),चितळी येथे कब्रस्थान संरक्षण भिंत बांधकाम करणे (२० लक्ष),पुणतांबा येथे चांगदेव नगर ईदगाह मैदान संरक्षण भिंत बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लक्ष), रवंदे येथे कब्रस्थान सुशोभीकरण करणे व सी.डी.वर्क बांधकाम करणे (१५ लक्ष) आदी कामांचा समावेश आहे.नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान या प्रशासकीय मान्यतेबाबत आ.काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदे,पालक मंत्री विखे,अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे आदींचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close