जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या दिवशी होणार (अ.प.)राष्ट्रवादीची यादी जाहीर !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची माजी आ.कोल्हे गटाची काल नगराध्यक्षपदासह नगरसेवकांची उमेदवारी जाहीर झाला असताना उद्या दि.13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता आ.आशुतोष काळे यांच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे या यादीकडे विरोधी गटाच्या नेत्यांसह मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

   

इच्छुक उमेदवार विजय वडांगळे यांनी शिंदे सेनेचे आ.अमोल खताळ यांची भेट घेतली तो क्षण.

दरम्यान शिवसेना (एकनाथ शिंदे गट) गटाची कोपरगाव नगरपरिषद हद्दीत ताकद तोळामासाच असताना त्यांनीही बऱ्यापैकी जोर लावला आहे.माजी नगराध्यक्ष विजय वहाडणेसह माजी नगरसेवक विजय वडांगळे हे शिंदे सेनेकडून प्रयत्नशील असून त्यांनी संगमनेरचे आ.अमोल खताळ यांची जावून भेट घेतल्याचे फोटो आमच्या प्रतिनिधीच्या हाती आले आहेत.

   राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आगामी 02 डिसेंबरला मतदान होणार आहे.31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत.त्या दिशेनं निवडणूक आयोगाने प्रवास सुरू केला असून काल दि.१० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.त्याची अंतिम मुदत-१७ नोव्हेंबर असून त्याची छाननीची तारीख-१८ नोव्हेंबर असून ते माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर आहे.अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत-२५ नोव्हेंबर आहे.तर निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी-२६ नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर होणार आहे.तर माघार झाली नाही तर मतदानाचा दिवस-२ डिसेंबर निश्चित करण्यात आला आहे.त्यामुळे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे.जोरजोराने ढोल ताशे बडवले जात असून रणभेऱ्या गर्जत असून नाल,घोडे,तंग,तोबरा,जमा करण्यात सर्व गर्क आहे.विश्रांती अजिबात नको ची हाळी झाली आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्या जागेवर अनेक ओबीसी नेते आणि कार्यकर्ते इच्छुक असताना माजी आ.कोल्हे गटाने त्यावर पाणी फिरवले आहे.परिणामी ओबीसी नेते आणि उमेदवारांत मोठी नाराजी दिसून येत आहे.आता आ.काळे गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय निरिक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.त्यासाठी त्यांनी,’ कृष्णाई ‘ मंगल कार्यालयात आपल्या उमेदवाऱ्या जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.त्यामुळे आता पंधरा प्रभागातील नगरध्यक्षपदाचे आणि नगरसेवकपदाचे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असल्याचे दिसून येत आहे.

  

  दरम्यान काँग्रेसकडून महाआघाडी आकार घेताना दिसत नसल्याने काँग्रेस नेते अस्वस्थ झाले असून त्यांनी आता नवीन चाल खेळली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांनी नगराध्यक्षपदासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांचे नाव समोर केले असल्याची माहिती आहे.तर त्याला दुजोरा मिळाला नाही.

    दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या ल लढाईत आ.कोल्हे गटाने ओबीसी चेहरा टाळल्याने आता काळे गटावरही कुणबी उमेदवार देण्याचे दडपण वाढले आहे.आधीच माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि सेनेकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी दंडाच्या बेटकुळ्या दाखवल्याने आ.आशुतोष काळे गटाला सुद्धाआता नवा चेहरा शोधण्याची गरज निर्माण झाली असून त्यांचेकडून मोठा खल झाल्यावर नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे नावही समोर येण्याची मोठी शक्यता वाढली आहे.त्यामुळे ओबीसी चेहरे मंदार पहाडे,विरेन बोरावके आणि सुनील गंगूले आदी नावे मागे पडू शकतात असा कयास आहे.

दरम्यान आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बिना विजय भगत या महिलेचा एक अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी भारती सागरे यांनी माध्यमांना दिली आहे.

    दरम्यान कोपरगाव शहरात अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा गटाची) महाआघाडी आकारात येताना दिसत नाही.अद्याप सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आणि माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांच्यातील उमेदवारीचा वाद अद्याप संपुष्टात आलेला नाही.त्यासाठी भरत मोरे यांनी काल मातोश्रीवर जाऊन शक्ती प्रदर्शन केले असून त्याला झावरे गटाने उत्तर दिले असल्याचे मानले जात आहे.मोरे यांची खा.संजय राऊत यांचेवर मदार आहे.तर झावरे यांची शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचेवर सर्व लक्ष आहे.त्यामुळे यात कोणाची बाजी होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.त्यासाठी मुंबईवरून एक निरीक्षक पाठवला असल्याचे बोलले जात आहे.त्यानंतर कोपरगाव शहराचा आढावा घेऊन अंतिम फैसला होणार असल्याची माहिती आहे.मात्र या लढाईत जिल्हाध्यक्षांची ताकद लावूनही फत्ते मात्र झावरे गटाची होणार असे संकेत मिळत आहेत.त्यानंतर मोरे गट काय भूमिका घेणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहणार आहे.ते मातोश्रीच्या आदेशाचे पालन करणार की पुंडाई करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.याबाबत लवकरच माहिती बाहेर येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

     दरम्यान शिवसेना (एकनाथ शिंदे गट) गटाची कोपरगाव नगरपरिषद हद्दीत ताकद तोळामासाच असताना त्यांनीही बऱ्यापैकी जोर लावला आहे.माजी नगराध्यक्ष विजय वहाडणेसह माजी नगरसेवक विजय नारायण वडांगळे हे शिंदे सेनेकडून प्रयत्नशील असून त्यांनी संगमनेरचे आ.अमोल खताळ यांची भेट घेतल्याचे फोटो आमच्या प्रतिनिधीच्या हाती आले आहेत.मात्र त्यांचेकडून ठंडा प्रतिसाद असल्याची माहिती हाती आली आहे.वडांगळे यांनी तर आपण नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर झालो असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले असून बाकी शहरातील उमेदवार आपणच देणार असल्याचा दावा केला आहे.मात्र त्याला दुजोरा मिळाला नाही.

  दरम्यान काँग्रेसकडून महाआघाडी आकार घेताना दिसत नसल्याने काँग्रेस नेते अस्वस्थ झाले असून त्यांनी आता नवीन चाल खेळली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांनी नगराध्यक्षपदासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांचे नाव समोर केले असल्याची माहिती आहे.त्यांची प्राथमिक माहिती हाती आली आहे.ते दिनाक 15 नोव्हेंबर रोजी कोपरगाव येत असल्याची माहिती हाती आली आहे.तर या दाव्याला उमेदवाराकडून दुजोरा मात्र मिळाला नाही हे विशेष !

                  ——————————-

*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close