वन व पर्यावरण
बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार,एक जखमी,ग्रामस्थांचा रास्ता रोको !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव मतदार संघातील टाकळी गावात बुधवार दि.०५ नोव्हेंबर रोजी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ऊस तोड कामगाराची तीन वर्षाची मुलगी ठार झालेली असताना आज सकाळी येसगाव शिवारात आपल्या जनावरांना घास कापत असलेल्या महिलेवर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक ६२ वर्षीय महिला शांताबाई अहिलाजी निकोले ही जागीच ठार झाली असून दुसऱ्या घटनेत सुरेगाव येथील कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला होता.मात्र अन्य सहकारी महिलांनी त्याला हाकलून लावले आहे.मात्र येसगाव येथील घटनेत संतापलेल्या ग्रामस्थांनी नगर-मनमाड महामार्ग बंद केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने चार दिवसापूर्वी आगामी काळात मानव आणि बिबट्याचा जीवन संघर्ष वाढणार याचे भाकित केले होते.त्याची प्रचिती आज सकाळी आली असून अनेक वाचकांनी यावर फोन करून आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला आहे.व तुमच्या लेखातील भाकित खरे ठरले असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”ऑगस्ट महिन्यात कोपरगाव शहराच्या भर वस्तीत धुमाकूळ घालणारा मादी बिबट्या मंगळवारी पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते.त्यानंतर कोपरगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असताना काल पुन्हा एकदा बिबट्याच्या तावडीत एक लहान बालिका सापडली असून त्यात तिचा करून अंत झाला होता.आज पुन्हा सकाळी १० वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली असून येसगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली महिला शांताबाई निकोल या आपल्या पशुधनास घास कापण्यासाठी गेलेल्या असताना व आपल्या कामात मग्न असताना त्यांच्यावर नजीकच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला असून त्यात त्या जागीच मृत्युमुखी पडल्या आहे.ही वार्ता नजीकच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांच्या हा धक्कादायक प्रकार लक्षात आला आहे.त्यांनी याबाबत वन विभागास दोषी धरले असून जो पर्यंत नरभक्षक बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत आपण नगर – मनमाड महामार्ग बंद करत आहोत.अशी घोषणा करून सदरचा रस्ता बंद करून टाकला आहे.
तर सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत अनिल वाबळे यांचे शेतात कापूस वेचण्यास आलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला होता.यात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.मात्र त्याला अन्य महिलांनी हुसकावून लावले आहे.
दरम्यान सदरच्या घटनेचे वृत् कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना समजली असून त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

दरम्यान या नरभक्षक बिबट्याला मारण्याची परवानगी वन विभागाने परवानगी मिळवली असून त्यासाठी लवकरच शूटर येसगाव, टाकळी परिसरात रवानगी होणार असल्याची माहिती जिल्हा वनाधिकारी श्री. सालविठ्ठल यांचेशी बोलून शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.
दरम्यान आमच्या प्रतिनिधीने चार दिवसापूर्वी आगामी काळात मानव आणि बिबट्याचा जीवन संघर्ष वाढणार याचे भाकित केले होते.त्याची प्रचिती आज सकाळी आली असून अनेक वाचकांनी यावर फोन करून आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला आहे.व तुमच्या लेखातील भाकित खरे ठरले असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

दरम्यान याबाबत टाकळी आणि येसगावसह कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या वाढली असून त्याचा फटका शेतकरी आणि नागरिकांना बसत आहे. या नरभक्षक बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची गरज असल्याची मागणी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप वर्पे यांनी केली आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने त्या घटनास्थळी संपर्क साधला असता तेथील कार्यकर्ते राजेंद्र निकोले यांनी मृत महिला शांताबाई निकोले यांचे शव कोपरगाव येथे पुढील कार्यवाहीसाठी हलविण्यात येत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्याची जागा अनेक महिन्यापासून रिक्त असून त्याचा प्रभार हा सामाजिक वनीकरण लागवड अधिकारी निलेश रोडे यांचेकडे असल्याची माहिती उपलब्ध असून त्यांना कारवाईसाठी मर्यादा येत असल्याची माहिती हाती आली आहे.उत्तर नगर जिल्ह्यासाठी बिबट्यांची मोठी संख्या वाढल्याने त्या जागी स्वतंत्र कार्यभार असणारा अधिकारी नेमण्याची गरज असल्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.
दरम्यान या गंभीर प्रश्नांबाबत मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात शिर्डी लोकसभेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी या संबंधी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून याबाबत माहिती मिळवली होती.त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात वाढती लोकसंख्या व वाढणारे हल्ले याचा तपशील आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे ? या बाबत शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्नाद्वारे केंद्र शासनाचे लक्ष वेधले होते.त्यांनी पुढे या हल्ल्यात जखमी किंवा मारल्या गेलेल्या लोकांच्या संख्येचा जिल्हावार तपशील काय आहे ? दरम्यान या बाबत मंत्री महोदयानी सागीतले की,”राज्याने दिलेल्या माहितीनुसार,मानव-प्राणी संघर्षाची वारंवारता नियंत्रित करण्यात आली आहे आणि काही बहुतांश घटनांमध्ये,आजूबाजूला भटकणाऱ्या प्रौढ प्राण्यांची अपघाती गाठ पडल्यामुळे या घटना घडल्या आहेत (ब) वाघांच्या हल्ल्याची समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने वाघाला पकडून ताडोबा आंध्र व्याघ्र प्रकल्पात किंवा जिल्ह्यातील इतर कोणत्याही सुरक्षित व मानवी जीवनास व्यत्यय आणणाऱ्या क्षेत्रापासून दूर ठेवण्याची विनंती केली होती.व केंद्र सरकारला याबाबत जाब विचारला होता.
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.


