धार्मिक
..या गावी काकड आरत्यांची सांगता

न्यूजसेवा
संवत्सर (प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर परिसरात गेल्या महिनाभरापासून ठिकठिकाणी सुरु असलेल्या काकड आरत्यांची बुधवार दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त सांगता झाली.महिनाभरापासून सुरु असलेल्या पहाटेच्या काकडा सोहळ्याने संपूर्ण संवत्सर परिसर विठ्ठल भजन,आरत्या,टाळ मृदुंगाच्या आवाजाने दुमदुमून गेला होता. महाप्रसादाने सोहळ्याचा समारोप मोठया उत्साहात संपन्न झाला असून या सोहळ्याचा लाखो भाविकांनी लाभ घेतला आहे.

संत तुकारामांनी आपल्या अभंगामधून भक्त पुंडलिकांविषयी सांगितले की,”पुंडलिका तू धन्य आहेस.सर्व संतजनांनी तुला मान्यता दिलेली आहे.तू जर हरिची सेवा केली नसती तर,कोणाला आणि कोणत्या काळी या हरिचे सुख असे प्राप्त झाले असते ?
संवत्सर गांवातील हनुमान मंदीर,विठ्ठल रुख्मिणी मंदीर व राम मंदिरात सुरु असलेल्या काकड आरतीची सांगता जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्या उपस्थितीत झाली.तर लक्ष्मणवाडी,रामवाडी,दशरथवाडी,पढेगांवरोड (आगवन वस्ती), भोजडे चौकी व इतर ठिकाणी गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या काकड आरती सोहळ्याची सांगता स्थानिक भाविक भक्तांच्या मोठ्या उपस्थितीने करण्यात आली. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्नानाला महत्व असल्याने गोदावरी नदीत अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली.

कार्तिकी पौर्णिमेनिमेच्या सोहळ्याला भक्त पुंडलिकांची महती विषद केली जाते.संत तुकारामांनी आपल्या अभंगामधून भक्त पुंडलिकांविषयी सांगितले की,”पुंडलिका तू धन्य आहेस.सर्व संतजनांनी तुला मान्यता दिलेली आहे.तू जर हरिची सेवा केली नसती तर,कोणाला आणि कोणत्या काळी या हरिचे सुख असे प्राप्त झाले असते ? ज्याला कुणी आजपर्यंत जिंकू शकले नाही,कोणालाही जो आजपर्यंत प्राप्त झाला नाही,अशा पांडुरंगाला तू विटेवर उभे केले आहे.इतकेच नाही तर पांडुरंगाबरोबर रुख्मिणी राही,सत्यभामा, गरुड हनुमंत,गोपी गोपाळांचा समुदाय आपण पंढरीस आणला आहे.वैकुंठच या भूमीवर आणले आहे.त्यामुळे सर्व भूमी धन्य झाली आहे.अशा या पावन भूमीत दरवर्षी काकडा आरत्यांचा धार्मिक सोहळ्याने शेतकरी,कष्टकरी भाविक व महिलांच्या जीवनात चैतन्य व आनंद निर्माण होतो.

महिनाभरापासून सुरु असलेल्या काकडा आरती निमित्त लक्ष्मणवाडी येथील मंदिरात दररोज पहाटे पत्रकार शिवाजी गायकवाड यांच्या परिवारातर्फे महिनाभर चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.आज बुधवारी झालेल्या सांगता समारंभानिमित्त संवत्सर गावचे उपसरपंच विवेक परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले,खंडू फेफाळे,कार्यकर्ते बाळासाहेब दहे,भिकाजी कर्पे,काशिनाथ बाभळे,रमेश गायकवाड,नामदेव पावडे,बाळासाहेब गायकवाड,दिपक आगवन,विजय आगवन,पोपट कर्पे,लहानू गुंड,भाऊसाहेब पवार,वंश भोसले,सुनिल भोसले,सुनील भाकरे,माणिक भाकरे,संजय भाकरे,कारभारी भाकरे,अविनाश भाकरे,जगनराव पेकळे,म्हस्केताई,सुलोचना पाटील,सखुबाई लाड,भाऊसाहेब ठेपले,प्रभाकर आबक,सुदाम साबळे,गोकूळ गंगुले,दिगंबर सोनवणे,सहाणेबाबा यांच्यासह संवत्सर पंचक्राशीतील अनेक भाविक भक्त व महिला उपस्थित होत्या.यावेळी महाप्रसाद वाटून सोहळ्याची सांगता झाली.



