गुन्हे विषयक
ऐन दिवाळीत तुंबळ हाणामारी,तीन जखमी!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत आज सकाळी 07 वाजेच्या सुमारास फिर्यादीची पत्नी अंगण झाडीत असताना त्यांची पत्रावळी ही आरोपींच्या अंगणात गेली असल्याचा राग मनात येवून आरोपी पांडुरंग सुखदेव मोरे,मनीषा कैलास मोरे आणि अन्य पाच जणांनी आपल्या पत्नीस लोखंडी गज,लाकडी दांडके,विट आदींनी जोराची मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला असून यात आपण स्वतः विजय परभत मोरे त्यांचा भाऊ रवींद्र परभत मोरे मुलगा अनिकेत विजय मोरे आदी तीन जण जखमी झाले असल्याचे फिर्यादी विजय परभत मोरे यांनी गुन्ह्यात म्हंटले आहे.त्यामुळे नाटेगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी विजय मोरे यांची पत्नी अंगण झाडीत असताना त्यांची पत्रावळी ही शेजारच्या आरोपींच्या अंगणात गेली होती.त्या किरकोळ गोष्टीचा त्यांना राग आला व त्यांनी माझ्या पत्नीस व आम्हाला लोखंडी गज,लाकडी काठी विटा आदींच्या साहाय्याने मारहाण केली असल्याचा आरोप आपल्या फिर्यादीत केला आहे.यात तीन जण जखमी झाले आहे.
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असताना त्यावर शेतकरी आणि ग्रामस्थ कसेबसे मात करत दिवाळी कशीबशी सुरू आहे.तर दुसरीकडे नागरिकांचा अलीकडील काळात संवाद कमी होत चालला असल्याचे वारंवार दिसून येत आहे.त्यात मोबाईल युग आल्याने शेजारधर्म विसरत चालला आहे.त्यामुळे भावाभावात वाद मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.त्यामुळे किरकोळ कारणावरून वाद आणि विसंवाद वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे.त्यातून काज्जे वाढत चालले आहे.अशीच घटना आज सकाळी नाटेगाव हद्दीत घडली आहे.
यातील फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,” आज सकाळी 07 वाजता आपले अंगण झाडीत असताना आमच्या अंगणातील प्रत्रावळी शेजारी असलेल्या आरोपींच्या अंगणात गेली होती.त्या किरकोळ गोष्टीचा त्यांना राग आला व त्यांनी माझ्या पत्नीस व आम्हाला लोखंडी गज,लाकडी काठी विटा आदींच्या साहाय्याने मारहाण केली असल्याचा आरोप आपल्या फिर्यादीत केला आहे.यात फिर्यादी विजय मोरे त्यांचा भाऊ रवींद्र पर भतमोरे,त्यांचा मुलगा अनिकेत मोरे आदी तीन जण जखमी झाले असल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी,महिला पोलिस नाईक अनिता शिवाजी वलवे यांनी भेट दिली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.298/2025 भारतीय न्याय संहिता कलम 118(1),189(2),191(2)(3),190,115,352,351(2) प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नाईक अनिता वलवे या करीत आहेत.
——————————
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



