संपादकीय
प्रस्थापितांना जड जाणारी नगरपरिषद निवडणूक !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या एकीकडे अंतिम होत असताना दुसरीकडे विविध पक्षांच्या युत्या-आघाड्यातून नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाच्या गळयात पडणार याकडे शहरातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.मात्र सत्ताधारी भाजपच्या निष्ठावान (वहाडणे) गटाचा कडवा सामना माजी आ.कोल्हे गटास करावा लागणार असे संकेत मिळत असून दुसरीकडे शिवसेनेत दोन जणांनी आपला दावा ठोकला असल्याचे दिसत असून आ.काळे गटात स्पर्धक मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे ही स्पर्धा जशी निवडणूक जवळ येईल तेवढी क्लिष्ट होणार असे दिसून येत आहे.

गत वेळेस ज्यांनी अपक्ष नगराध्यक्षपद भूषवले त्या विजय वहाडणे यांचा ईशान्य गडास कडवा सामना करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहे.कारण मागील वेळी त्यांना डावलले गेल्याने त्याची काय परिणीती झाली याचा दाहक अनुभव वरिष्ठ भाजप नेत्यांनी घेतला आहे.त्यामुळे ते आता ताकही फुंकून पिणार हे ओघाने आलेच.वहाडणे आधीच सावध असल्याने त्यांनी कोल्हे गटाच्या मुळावर घाव घातल्याचे दिसून येत आहे.त्यांनी आधीच वरिष्ठ भाजप नेते आणि मुख्यमंत्री यांना आपलेसे केले असल्याचे दिसून येत आहे.हीच मोठी अडचण ईशान्य गडास ठरली असल्याचे दिसत आहे.
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाची दि.06 ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालय येथे सोडत काढण्यात आली असून कोपरगाव नगरपरिषदेसाठी इतर मागास प्रवर्गासाठी (ओ.बी.सी.) हे आरक्षण सोडत नगराध्यक्ष पदासाठी निघाले आहे.मुंबई मंत्रालयात दिवसभर आरक्षण सोडत काढण्यात आली असून यामुळे आता इच्छुक उमेदवारांना नगरपालिकेचे निवडणूक कधी लागणार याचीच अपेक्षा लागून राहिली आहे.राज्यातील तब्बल चार वर्षांपासून प्रशासकराज असलेल्या नगरपालिकेची लवकरच निवडणूक होणार असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.या आरक्षणामुळे अनेक उमेदवारांचे नशीब उजळणार की त्यांना फटका बसणार याबाबतची नागरिकांची उत्सुकता आता संपली आहे.मोठ्या प्रतीक्षेनंतर ही कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक होत असल्याने प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे.आरक्षण सोडतीची सर्व उमेदवारांना प्रतीक्षा होती,कारण ती जाहीर झाल्याशिवाय उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार नव्हते.प्रभाग रचनेसह आता ही सोडत जाहीर झाल्याने इच्छुकांनी तथा भावी नगरसेवक आणि अध्यक्षांनी आपली आपले नाल,घोडे,तंग,तोबरा सज्ज ठेवला असून आपले बारगीर,सरदार,वतनदार,दरकदार आदींना आदेश सुटले आहे.”निष्काळजीपणा अजिबात नको” चे फर्मान सुटले आहे.

राजेंद्र झावरे हे नगराध्यक्ष असताना मागील सत्रात झालेले मोठे काम लोक विसरलेले नाही.शिवाय काळे कोल्हे यांना टक्कर देण्याची क्षमता ही त्यांची खास जमेची बाजू.शिवाय प्रशासनावर असलेला त्यांचा वचक अद्याप सामान्य नागरिक विसरलेले नाही.मध्यंतरी सेनेत अनेक शकले उडाली होती हे खरे असले तरी पक्षांतर्गत त्यांना अनेकांनी दंडाच्या बेटकुळ्या दाखवूनही त्यांच्या संघटनेवर असलेले त्यांचे नियंत्रण अद्याप कोणी दुसरा कोणी घेऊ शकलेला नाही.विविध संस्थांवर असलेले नियंत्रण ही आणखी जमेची बाजू.त्यांचेही मोठे आव्हान काळे कोल्हे पुढे ठाकणार आहे.
वर्तमानात इच्छुक नगराध्यक्ष उमेदवारांनी आपापल्या नेत्यांकडे गळ घालण्यास सुरुवात केली आहे.शिष्टमंडळ नेण्यास आणि त्यांच्या दारात पायधूळ झाडण्यास प्रारंभ केला आहे.मात्र मागील वेळेस ज्यांनी अपक्ष नगराध्यक्षपद भूषवले त्या विजय वहाडणे यांचा ईशान्य गडास कडवा सामना करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहे.कारण मागील वेळी त्यांना डावलले गेल्याने त्याची काय परिणीती झाली याचा दाहक अनुभव वरिष्ठ भाजप नेत्यांनी घेतला आहे.त्यामुळे ते आता ताकही फुंकून पिणार हे ओघाने आलेच.वहाडणे आधीच सावध असल्याने त्यांनी कोल्हे गटाच्या मुळावर घाव घातल्याचे दिसून येत आहे.त्यांनी आधीच वरिष्ठ भाजप नेते आणि मुख्यमंत्री यांना आपलेसे केले असल्याचे दिसून येत आहे.त्यांनी यावेळी गतवेळी केलेली चूक जाणीवपूर्वक टाळली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.त्यामुळे गतखेपेस ज्या काढण्या ईशान्य’गडाने वापरल्या ‘त्या ‘आता या खेपेस चालणे अवघड दिसून येत आहे.व ईशान्य गडाचे कारभारी आता सत्तेत नाही त्यामुळे त्यांची मागील इतकी किंमत उरलेली नाही.शिवाय मागील सलग्न नेते आता मुख्य प्रवाहाच्या बरेच बाहेर ढकलले गेले आहे.ईशान्य गड आणि पश्चिम गडकऱ्यांची जनतेची कामे प्रलंबित ठेवून मतदारांना नादी लावण्याची खासियत आता कालबाह्य ठरत आली आहे.शिवाय भाजपला कारण मागील वेळेस निष्ठावान कार्यकर्त्यांची झालेली होरपळ गत लोकसभेसाठी त्यांना चांगलीच भोवली होती.’चारसो पार’ चा नारा अंगलट आला होता.शिवाय आता तत्कालीन भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आता आम्हाला आर.एस.एस.ची गरज नाही,भाजप स्वबळावर निवडणूक लढवू शकते अशी फुशारकी त्यांच्या चांगलीच अंगलट आली होती.त्यामुळे त्यांनी झाल्या चुकीची दिलगिरी व्यक्त करून पुन्हा एकदा आपण राष्ट्रीय स्वंयसेवक शिवाय अपूर्ण आहोत याची जाणीव करून घेतली होती.त्यामुळे ‘आयाराम-गयाराम’ यांची यावेळी डाळ शिजने अवघड जाणार आहे हे उघड आहे.शिवाय भाजपने ईशान्य गडाची चौकशी करून आपल्या…खाली दडवून ठेवलेली फाईल अद्याप काढलेली नाही हे विशेष ! त्यामुळे त्यांचे नाक दाबलेले आहे.त्यामुळे विधानसभा तर जावू द्या पण विधानपरिषद त्यांना दिवास्वप्नं ठरले आहे.मागील सप्ताहात देशाचे सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्ह्यात येऊनही त्यांनी त्यांच्या पुनर्वसनाचा ‘ पू ‘ शब्दाचा उच्चार केला नाही.उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे येताना अमित भाई यांचेशी बोलणे झाले आहे बोळवण करून वेळ निभावून नेली आहे.आणि आता आगामी लोकसभेपर्यंत तरी ईशान्य गडाच्या हाती काहीही येणार नाही.मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही लिहिले होते की,”भाजपने ईशान्य गडास चुना लावला आहे” आणि त्याची अनुभूती आजही ही मंडळी घेत आहे.उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प घ्या,त्याचे अनुदान घ्या,शिक्षण संस्था घ्या” पण आता सत्तेबाबत काहीही बोलू नका असा स्पष्ट इशारा वरिष्ठ नेत्यांनी न बोलता अनुल्लेखाने या पूर्वी दिला आहे.हा ज्याला समजेल त्याला आहे.त्यामुळे जास्त अपेक्षेत न राहिलेले उत्तम.तर दुसरीकडे निष्ठावान भाजप वहाडणे गटही कधी नव्हे इतका एकत्र आलेला दिसून येत आहे.शिवाय आपल्याच सत्ताधारी भाजप नेत्यांच्या विरूध्द बोलणे वहाडणे यांनी प्रकर्षाने टाळले आहे.(हे त्यांच्या स्वभावाला धरून नाही ही बाब सोडा पण त्यांनी हे दिव्य केले आहे हे विशेष !)एव्हढेच नाही तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचेशी जुळवून समयसूचकता दाखवल्याचे दिसून येत आहे.त्यात त्यांना आणखी एक बाब जमेची ठरली असून मागील तीन महिन्यापूर्वी माजी नगराध्यक्ष माधवराव आढाव यांचे पुतळ्याचे भूमिपूजन करताना ईशान्य गड आणि पश्चिम गड यांनी या कार्यक्रमास आणलेल्या अडचणीमुळे विखे यांचा पारा सातव्या आसमंतात गेला होता.मुख्याधिकाऱ्यांचेपद बालंबाल वाचले होते.ही बाब येथे दुर्लक्षून चालणार नाही.त्याची किंमत काळे आणि कोल्हे या द्वयींना चुकवावी लागणार आहे हे उघड आहे.त्यामुळे आढाव आणि नरोडे,गवारे आदी मंडळी यातून नेमका बोध घेणार हे उघड आहे.त्यांना वहाडणे गट आणि विखे गट ऐन वेळी काहीही राजकीय चाल खेळू शकतो हे विसरून चालणार नाही.आणि एका मुलाखत देताना पालकमंत्री विखे यांनी आपला पक्ष किमान राहाता तालुक्यात तरी ओरिजनल ओ.बी.सी.ना संधी देणार असल्याचे सूतोवाच आधीच केले आहे.त्यामुळे मागील वेळी सपाटून मार खालेले ईशान्य गडाचे उमेदवार बाळासाहेब संधान यांचे काही खरे दिसत नाही.त्यांना ही लढाई आता तरी शक्य वाटत नाही.त्यांना आधीच पक्षांतर्गत मोठा विरोध आहे.त्यांच्या नावावर ईशान्य गडाचे बरेच प्रकल्प जमा असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांत मोठी चर्चा असून त्यांना आणखी काय आणि कशासाठी पाहिजे असा खाजगीत सवाल ही मंडळी विचारत आहे.याच बाबीमुळे मागील वेळी त्यातूनही त्यांची मोठी दुर्दशा झाली होती.त्यामुळे यावेळी कुठल्याही भ्रष्टाचाराचा डाग नसलेले व कोणत्याही ठेक्यात कमिशन न घेतलेले उमेदवार (मिस्टर क्लीन) वैभव गिरमे यांचे नाव समोर आले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.वर्तमानात संबधित उमेदवारच त्यांची थोडी बहुत लाज राखू शकतो असे सध्या तरी दिसत आहे.

मागील वेळी सपाटून मार खालेले ईशान्य गडाचे उमेदवार मुनिमजी यांचे काही खरे दिसत नाही.त्यांना ही लढाई आता तरी शक्य वाटत नाही.त्यांना आधीच पक्षांतर्गत मोठा विरोध आहे.त्यांच्या नावावर ईशान्य गडाचे बरेच प्रकल्प जमा असल्याची त्यांच्याच कार्यकर्त्यांत मोठी चर्चा असून त्यांना आणखी काय आणि कशासाठी पाहिजे ? असा खाजगीत सवाल ही मंडळी विचारत आहे.परिणामी गतवेळी त्यांची मोठी दुर्दशा झाली होती.त्यामुळे यावेळी कुठल्याही भ्रष्टाचाराचा डाग नसलेले व कोणत्याही ठेक्यात कमिशन न घेतलेले उमेदवार (मिस्टर क्लीन) वैभव गिरमे यांचे नाव समोर आले आल्याने वर्तमानात तरी ईशान्य गडास अन्य पर्याय असल्याचे दिसत नाही.
दरम्यान दुसरीकडे मागील 2016 च्या नगरपरिषद निवडणुकीत संधी हुकलेले उबाठा सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी आपली उमेदवारी सर्वात आधी घोषित करून प्रचार सुरू केला आहे.त्यांचे मागील सत्रात झालेले मोठे काम लोक विसरलेले नाही.शिवाय काळे कोल्हे यांना टक्कर देण्याची क्षमता ही त्यांची खास जमेची बाजू.शिवाय प्रशासनावर असलेला त्यांचा वचक अद्याप सामान्य नागरिक विसरलेले नाही.मध्यंतरी सेनेत अनेक शकले उडाली होती हे खरे असले तरी पक्षांतर्गत त्यांना अनेकांनी दंडाच्या बेटकुळ्या दाखवूनही त्यांच्या संघटनेवर असलेले त्यांचे नियंत्रण अद्याप कोणी दुसरा कोणी घेऊ शकलेला नाही.रिक्षा सेना आणि पतसंस्था,शाळा आदी संस्था स्थापन करून आपली पकड आणखी मजबूत केली आहे.शिवाय मातोश्रीवर त्यांचे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या यादीत वरच्या श्रेणीत आहे हे वेगळे सांगणे न लगे.त्यामुळे आज जरी माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांनी आव्हान दिले असले तरी व त्यांनी आपल्याला वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आहे असे ठामपणे सांगितले असले तरी त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.शिवाय अद्याप आपण नेत्यांनी सांगितले तर कधीही थांबण्यास तयार आहोत ही विनम्रता राजेंद्र झावरे यांना त्यांच्या इच्छितस्थळी घेऊन जाईल यात शंका वाटत नाही.हा एक खरे आहे की,वर्तमानात त्यांनी अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटास अद्याप विचारले नाही.शिवाय ही खंत हे दोन्ही पक्ष बोलून दाखवत असले तरी त्यांची नाराजी ते काही तासात आणि जागा वाटपात नक्की देऊ शकतात असे वर्तमानात तरी दिसत आहे.त्यामुळे ही लढाई होणार हे उघड असले तरी एक कांगोरा राहतो तो आ.आशुतोष काळे यांचा.त्यांनाही विखेंनी जर भूमिका ओरिजनल ओबीसी साठी पायघड्या घातल्या तर त्यांना ना म्हणण्याची दानत त्यांच्यात आहे असे वर्तमानात तरी दिसत नाही.परिणामी मंदार पहाडे यांनी आपल्या मातोश्री पुढे केले असेल तरी ते आपला हुकमी एक्का कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक दिनार कुदळे यांना पुढे करू शकतात.शहराध्यक्ष सुनील गंगुले हे इच्छुक असले तरी आ.काळे त्यांना संधी देतील ही शक्यता फार दुर्मिळ दिसत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुका शेवटच्या क्षणी जेथे तडजोडी होतील त्या ठिकाणी महायुती म्हणून लढवल्या जातील पण ज्या ठिकाणी ते शक्य होणार नाही.त्या ठिकाणी ते स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपवू शकतात.परिणामी कोपरगाव शहरात निवडणूक ही बहुरंगी होणार असे वर्तमानात तरी दिसत आहे.त्याला आणखी एक कंगोरा आहे.जर महाआघाडी झाली नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या पारंपरिक मतांना गोंजरण्यासाठी मितभाषी म्हणून आणि शालीन,धार्मिक म्हणून आपली ओळख निर्माण केलेले व्यक्तिमत्त्व म्हणून माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना रणांगणात उतरू शकते ही शक्यता नाकारता येत नाही.तरीही वर्तमान लढाई ही स्थानिक कोणतेही प्रश्न न सोडवता राजकारण करणाऱ्या काळे आणि कोल्हे या गड प्रमुखांना अवघड जाणार हे उघड आहे आता इतकेच.



