शैक्षणिक
…या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‘क्यु स्पायडर’मध्ये निवड !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
येवला तालुक्यातील बाभुळगाव येथील एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येवला च्याअंतिम वर्ष इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि व कॉम्पुटर इंजिनियरिंगच्या तीस विद्यार्थ्यांची पुणे येथील,’ची क्यु स्पायडर’ मध्ये व ची फोर्स मोटर्स’मध्ये निवड झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान या मुलाखतीत यशस्वी विद्यार्थ्यांच्या यावेळी एच.आर.मॅनेजर तेजस्वीनी बोजा,आर.चंदना यांनी मुलाखती घेतल्या होते.या विद्यार्थ्याला वार्षिक ३ लाख २० हजार पॅकेज देण्यात आले आहे.
सदर ड्राईव्ह मध्ये तीन राऊंड झाले आहे.दरम्यान या पात्रता चाचणीत व्यतिगत व टेक्निकल मुलाखत झाली असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.यावेळी एच.आर.मॅनेजर तेजस्वीनी बोजा,आर.चंदना यांनी मुलाखती घेतल्या आहेत.याशस्वी विद्यार्थ्याला वार्षिक ३ लाख २० हजार पॅकेज देण्यात आले आहे.
दरम्यान निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एम.यादव,इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ.पी.पी.रोकडे,कॉप्युटर विभागप्रमुख डॉ.जी.आर.बोंबले प्लेसमेंट अधिकारी प्रा.संदीप कराळे यांनी अभिनंदन केले आहे.सदर ड्राईव्ह साठी प्रा.डी.बी.वैराळ,प्रा.एस.ए.गाडे आदींनी नियोजन केले होते.
दरम्यान या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे,आ.किशोर दराडे,सचिव लक्ष्मण दराडे,संचालक रुपेष दराडे,कुणाल दराडे आदींनी अभिनंदन केले आहे.