निवडणूक
कोपरगावात होणार मोठी राजकीय रंगपंचमी…!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
राज्यातील कोपरगाव नगरपरिषदाचे आरक्षण जाहीर झाले असल्याने निवडणुका कशा लढणार याचे चित्र स्पष्ट होऊ लागले असून कोपरगाव नगरपरिषदेच्या मध्ये काळे-कोल्हे यांच्या मनमानीला नागरिक वैतागले असून ते यावेळी ते आगामी निवडणुकांची बेगमी करण्यासाठी ओरिजनल ओबीसींना पाठीशी घालणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही परिणामी स्थानिक आढाव आणि नारोडे आदी मंडळी एकत्र येऊन विरोध करणार असल्याचे दिसू लागले आहे.या शिवाय माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी ओरिजनल भाजपशी जुळवून घेतल्याने सत्ताधारी (बनावट) भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.या शिवाय मागील वेळी केलेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी उबाठा सेनेचे सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी सर्वच गटतट एकत्र केल्याने ते आताच देवांना पाण्यात बुडवून बसल्याने निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.त्यांना मनसे येऊन मिळणार हे गृहीत धरले जात आहे.त्यामुळे कोपरगाव मोठी रंगपंचमी साजरी करणार असे दिसू लागले आहे.

आ.काळे गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढविणारे उमेदवार विजय आढाव हे ही स्थानिक पातळीवर विखे-परजणे गटाकडून इच्छुक असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे यावेळी ही लढत रंगतदार आणि बहुरंगी होणार असल्याचे दिसत आहे.सत्ताधारी काळे आणि कोल्हे यांनी स्थानिक आढाव आणि नरोडे यांना माजी नगराध्यक्ष स्व.माधवराव आढाव यांचे पुतळ्यांचे भूमिपूजन प्रसंगी काळे-कोल्हे यांनी अभद्र युती करून त्यांना दाखवलेल्या लीलांमुळे ते एकत्र आणण्यासाठी मोठी मदत केली असल्याचे मानले जात आहे.
राज्यातील नगर परिषदांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे.यात राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार ते महिलांसाठी राखीव असणार की खुल्या प्रवर्गासाठी यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे अवलंबून असतात.त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्षांचं,त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं व कार्यकर्त्याचं लक्ष लागलं होतं.दरम्यान अशा वातावरणात ही सोडत जाहीर करण्यात आली असल्याने उच्छुकांच्या आशा अपेक्षा नवी चैत्र पालवी फुटली आहे.त्यामुळे राज्यात आणि सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्यात मोठे रणकंदन होणार हे उघड झाले आहे.त्यासाठी उच्छुकानी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे.आपले घोडे,नाल,तंग तोबरा केला असून,’जागते रहो…” फर्मान जारी केले आहे.त्यामुळे आता प्रभागासह सर्वत्र चैतन्य उसळले असून नगरपरिषदा आणि नगर पंचायती क्षेत्रात ढोल वाजू लागले आहे.

राज्यातील नगर परिषदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असल्याने राज्यातील विविध राजकीय पक्षांना व जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.अनेक महानगरपालिका,नगरपालिका,नगरपरिषदा,नगरपंचायतींच्या निवडणुका रखडल्या आहेत.अनेक पालिकांचं कामकाज हे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं होते.त्यांना स्थानिक नागरिक वैतागले होते.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता.त्यांची या ‘प्रशासन राज’ मधून एकदाची सुटका होणार आहे.

दरम्यान अशातच जानेवारी २०२६ पूर्वी या निवडणुका घ्याव्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले असल्याने आता निवडणुकांचा मार्ग प्रशस्त झाला आहे.परिणामी कोपरगाव सह राज्यातील उच्छुकांनी आपल्या दंडाच्या बेटकुळ्या दाखवण्यास प्रारंभ केला आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद असण्याचे कारण नाही.या ठिकाणी पारंपरिक विरोधक (!) विद्यमान आ.आशुतोष काळे यांचेसह माजी आ.कोल्हे यांच्या दोन गटांचे अनुक्रमे दिनार कुदळे,पराग संधान आदी दोन उमेदवार रिंगणात राहणार हे उघड असले तरी अन्य गटाचे उमेदवार रिंगणात रहाणार हे उघड आहे.तरी सत्ताधारी काळे-कोल्हे हे प्रमुख मागास (ओरिजनल ओबीसींना )उमेदवारांना उमेदवारी देऊन आपल्या आगामी निवडणुकांच्या मतांची बेगमी करणार हे उघड असल्याने स्थानिक कुणबी तथा मराठा समाज त्यांचे विरूध्द आवाज उठवणार असे दिसू लागले आहे.त्यात निष्ठावान भाजप गटाचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आता आपल्या भाजपशी जुळवून घेतल्याने त्यांना त्याचा फायदा होणार की तोटा हे आगामी काळच ठेवणे आहे.त्यात त्यांनी गतवेळी स्वतंत्र निवडणूक लढवून काळे आणि कोल्हे यांच्या उमेदवारांसह अनेकांना धूळ चारली होती.राज्यात सर्वाधिक मतांची बेगमी करून बनाम भाजपला त्यांची जागा दाखवली होती.
दरम्यान माजी नगराध्यक्ष वहाडणे यांचेसह शिवसेना उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष विजय राजेंद्र झावरे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,(कोणाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही) मागील वेळी आ.काळे गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढविणारे उमेदवार विजय आढाव हे ही स्थानिक पातळीवर विखे-परजणे गटाकडून इच्छुक असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे यावेळी ही लढत रंगतदार आणि बहुरंगी होणार असल्याचे दिसत आहे.सत्ताधारी काळे आणि कोल्हे यांनी स्थानिक आढाव आणि नरोडे यांना माजी नगराध्यक्ष स्व.माधवराव आढाव यांचे पुतळ्यांचे भूमिपूजन प्रसंगी काळे-कोल्हे यांनी अभद्र युती करून त्यांना दाखवलेल्या लीलांमुळे ते एकत्र आणण्यासाठी मोठी मदत केली असल्याचे मानले जात आहे.त्यात आणखी माजी नगरसेविका सपना मोरे यांनीही शडडू ठोकल्याचे उघड झाल्याने शिवसेनेत एक मत होईल का असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.काहींनी तर आरक्षण जाहीर होताच आपला नारळ फोडून प्रचार सुरू केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषद हद्दीत आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.आता आगामी काळ जसा जवळ जवळ येईल तसे तसे चित्र स्पष्ट होणार आहे.