नैसर्गिक आपत्ती
अपदग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राने आर्थिक मदत करावी- …या खासदारांची शहाकडे मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी,कष्टकरी यांना भरीव मदत देवून केंद्र शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघांचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची शिर्डी येथे समक्ष भेटून केली आहे.

दरम्यान केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी लोणी येथील आपल्या भाषणात राज्याच्या आपत्तीबाबत बोलताना म्हटले आहे की,”आपण याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्यासोबत एक बैठक घेतली त्याचा तपशिलात अहवाल पाठवावा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मार्ग काढू असे आश्वासन दिले आहे.
खा. वाकचौरे यांनी मध्यतरी झालेल्या पावसामुळे शेती,घरांची पडझड,गुरे ढोरे वाहून गेलेली आहे.त्यामुळे शेतकरी,गोर गरीब जनता हवालदिल झालेली आहे.अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून सर्वांनाच नुकसान भरपाई देवून शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी गृहमंत्री अमित शहा याना केली असता मंत्री महोदय यांनी शांतपणे ऐकून घेवून आपण यात लक्ष घालतो असे दिलासादायक वक्तव्य केले आहे अशी माहिती खा.वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.त्याबद्दल त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहे.