निधन वार्ता
भीमाबाई थोरात यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळकें येथील रहिवासी व माजी पोलिस पाटील पोपट बाळाजी थोरात यांच्या धर्मपत्नी भीमाबाई पोपट थोरात (वय- ७९) यांचे आज सकाळी ०८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,०५ मुली नातवंडे असा परिवार आहे.

स्व.भीमाबाई थोरात या अत्यंत मायाळू व शांत स्वभावाच्या म्हणून जवळके आणि परिसरात परिचित होत्या.अत्यंत प्रतिकूल काळात त्यांनी आपल्या प्रपंचास हातभार लावून आपली नैतिक जबाबदारी सांभाळली होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर जवळके येथील अमरधाम येथे दुपारी ०१.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांच्या पश्चात कानिफनाथ थोरात हा मुलगा आहे.त्या डॉ.कुटे हॉस्पिटलचे व्यवस्थापक अण्णासाहेब थोरात यांच्या चुलती होत्या.