निधन वार्ता
साईनाथ थोरात यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळकें येथील रहिवासी महावितरण कंपनीतील सेवानिवृत्त तारतंत्री व सामाजिक प्रश्नांची जाण असलेले कार्यकर्ते साईनाथ रामचंद्र थोरात (वय- ७६)यांचे आज सकाळी ०९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्यावर जवळके येथील अमरधाम येथे दुपारी ०३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांच्या पश्चात भाऊसाहेब,कानिफनाथ आदी दोन मुले,एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.साईनाथ थोरात यांनी अनेक वर्षापासून जागेअभावी प्रलंबित असलेल्या जवळके अंगणवाडी क्रं.०२ साठी येऊल वाटेनजिक जागेचा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित केला असता त्यांनी उदार अंतकरनाणे त्यास संमती देऊन दिड आर क्षेत्र आपल्या मुलगा भाऊसाहेब थोरात यांना देण्यास सांगून जिल्हा परिषदेला बक्षिसपत्र करून दिले होते.परिणामी लहान मुलांच्या व अंगणवाडी जागेचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला होता.त्यांचे हे कार्य कायम ग्रामस्थांचे स्मरणात राहील.
स्व.साईनाथ थोरात हे अत्यंत मितभाषी व कामावर निष्ठा असलेले व्यक्तिमत्व होते.त्यांना ग्रामविकासाची जाण होती.महावितरण कंपनीतून सेवानिवृत झाल्यानंतर त्यांनी प्रापंचिक जबाबदारी आपल्या मुलांवर सोडली होती.त्यांनी अनेक वर्षापासून जागेअभावी प्रलंबित असलेल्या जवळके अंगणवाडी क्रं.०२ साठी येऊल वाटेनजिक जागेचा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित केला असता त्यांनी उदार अंतकरनाणे त्यास संमती देऊन दिड आर क्षेत्र आपल्या मुलगा भाऊसाहेब थोरात यांना देण्यास सांगून जिल्हा परिषदेला बक्षिसपत्र करून दिले होते.परिणामी लहान मुलांच्या व अंगणवाडी जागेचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला होता.परिणामी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने जवळके ग्रामपंचायत आणि महिला बाल कल्याण विभागावर मोठे ऋण करून ठेवले आहे.त्यांच्यावर दुपारी ०३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,ज्येष्ठ अभियंता एस.के.थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच गोरक्षनाथ थोरात,नवनाथ थोरात,सर्व पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आदींनी दुःख व्यक्त केले आहे.