जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या कारखान्याने गणेश इतका दर द्यावा-…यांची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)


    श्रीरामपूर तालुक्यातील सहकारातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड.अजित काळे व जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी कारखान्याच्या अहवालावर बोट ठेवून मुरकुटे यांच्या चुकीच्या कामकाजाबद्दल सभासदांसमोर लेखाजोखा मांडला असता त्याचा राग येऊन कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी त्यांना मज्जाव केला आहे ही बाब निषेधार्ह असून त्याचा उपस्थित सभासदांनी जोरदार प्रतिकार केला असून सभासदांनी ऊस  उत्पादकांना प्रती टन गणेश सहकारी साखर कारखाना दर द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.त्याचे सभासदांनी जोरदार स्वागत केले आहे.

 

“कारखाना कार्यक्षेत्रात ०७ ते ०८ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असताना बाहेरून ऊस आणण्याची आवश्यकता का भासते ? कारखाना ऊस घेवून बाहेरील कारखान्याला तो पुरवितो.या व्यवहाराबद्दल आम्हाला काही समजत नाही.कारखान्याला २० ते २२ कोटी रूपयांचा तोटा दिसतो आहे.असे असताना तुम्हाला गाळप क्षमतेत वाढ कशाला करायची आहे?- ऍड.अजित काळे,उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.

    श्रीरामपूर इथल्या अशोक साखर कारखान्याच्या नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पहिल्यादांच अभुतपूर्व गोंधळ झाला आहे.माजी आ.भानुदास मुरकुटे, साईसंस्थानचे माजी विश्वस्त प्रताप भोसले आणि शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्यात ऊस भावावरून मोठे वादळ निर्माण झाले होते.

  

“अशोक सहकारी साखर कारखान्याने मागील दोन हंगामात गणेश पेक्षा सरासरी ८०० रुपये प्रति. में.टनाने पैसे कमी दिले याचे काय ? त्यामुळे आधीच विश्वास उडालेले ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवील का?- अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,अहील्यानगर शेतकरी संघटना.

     दरम्यान यावेळी प्रताप भोसले यांचे मुद्दे खोडून काढताना ऍड.अजित काळे यांनी कारखाना व्यवस्थापनाच्या उणिवांवर नेमके बोट ठेवले होते.यामुळे माजी आ.मुरकुटे आणि त्यांच्या समर्थकांनी ॲड.काळे यांना मज्जाव केल्याने मोठा गोंधळ उडाला होता.शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांच्याभोवती कडे करत त्यांना संरक्षण दिले.यानंतर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला.

    दरम्यान यावेळी अशोक सहकारी कारखान्याच्या व्यवहारांवर ऍड.अजित काळेंची यांनी शंका उपस्थित केली होती.त्यांनी,”कारखाना कार्यक्षेत्रात ०७ ते ०८ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असताना बाहेरून ऊस आणण्याची आवश्यकता का भासते ? असा कडवट सवाल उपस्थित केला होता.कारखाना ऊस घेवून बाहेरील कारखान्याला तो पुरवितो.या व्यवहाराबद्दल आम्हाला काही समजत नाही.कारखान्याला २० ते २२ कोटी रूपयांचा तोटा दिसतो आहे.असे असताना तुम्हाला गाळप क्षमतेत वाढ कशाला करायची आहे? आहे त्या क्षमतेत कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप करावे,अशी मागणी केली केली होती.त्यावर भानुदास मुरकुटे यांचा संताप झाला व त्यांनी त्यांचा माईक बंद केला होता.त्यावेळी मोठा गदारोळ उडून अखेर काळे यांना त्यांच्या समर्थक शेतकऱ्यांनी वेढा घातला होता व त्यांना सुरक्षित बाहेर काढले होते.त्यांनी नंतर सभास्थानापासून जवळच आपली छोटेखानी सभा घेऊन आपला निषेध व्यक्त केला होता.याची सर्वच नगर जिल्ह्यातील कारखानदारांनी धास्ती घेतली असल्याचे दिसून येत आहे.

   दरम्यान नंतर मुरकुटे यांनी सर्वसाधारण सभेत गणेश व मुळा इतका भाव देऊ असे आश्वासित केले आहे.परंतु मागील दोन हंगामात गणेश पेक्षा सरासरी ८०० रुपये प्रति. में.टनाने पैसे कमी दिले याचे काय ? असा गंभीर सवाल निर्माण केला आहे.त्यामुळे ऊस उत्पादक व्यवस्थापनावर विश्वास ठेवील का? असा सवाल निर्माण झाला आहे.कामधेनु वाचविण्यासाठी विश्वास ठेवलाच तर मुरकुटे सर्वसाधारण सभेत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करतील काय ? एकूणच वर्तमानात अशोक कारखान्यावर मुरकुटे यांच्या भ्रष्ट, चुकीच्या,दडपशाही मार्गाने चालविलेल्या व्यवस्थापनामुळे परिस्थिती राहुरी कारखान्यासारखी झाली आहे.गेल्या मागील पंचवीस वर्षापासून सातत्याने भानुदास मुरकुटे यांनी अशोक कारखाना गणेश करायचा काय ? अशोक कारखाना राहुरी करायचा काय ? अशा प्रकारची भीती दाखवून ऊस उत्पादकांमध्ये दिशाभूल करून आपणच कारखाना चांगल्या प्रकारे चालवू शकतो असा भ्रम निर्माण केला होता.अखेर काल झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मुरकुटे यांचा भ्रमाचा भोपळा शेतकरी संघटनेने फोडून मुरकुटे यांच्या कारभाराचे वास्तव चित्र ऊस उत्पादकांसमोर मांडले.

  मागील दहा वर्षाच्या गाळप हंगामामध्ये अशोक कारखान्याला गाळप क्षमतेपेक्षा अतिरिक्त ऊस उपलब्ध असताना व तसेच गेल्या चाळीस वर्षापासून एक हाती सत्ता असताना कारखान्यावर कर्ज व तोटा होण्याचे कारण काय असा सवाल निर्माण केला आहे.आज पर्यंत मुरकुटे यांनी चाळीस वर्षात एकदाही जिल्ह्यात विक्रमी भाव दिला नसून कामगारांनाअधिकचे बोनस व वेळेत पगार केलेला नाही.त्यामुळे त्यांचेवर सभासद आणि शेतकरी विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी शेवटी म्हंटले आहे.

                    ———————————–

*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा’ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close