जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

जीर्ण पुलाकडे दुर्लक्ष,पुल गेला वाहून,पूर्व भागाचा संपर्क तुटला !

न्यूजसेवा

संवत्सर -(प्रतिनिधी)

    राज्यासह कोपरगाव तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून आलेल्या पुरामुळे मोठी हानी झाली आहे.कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस जोडणारा भोजडे येथील कोळ नदीवरील पुल आलेल्या पुरात वाहून गेल्याने ग्रामस्थ,शेतकरी आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.त्यामुळे हा पूल तातडीने नव्याने बांधून द्यावा अशी मागणी तेथील कार्यकर्ते व्यंकटेश धट,भगवान सिनगर आदींनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

भोजडे येथील तुटलेला पुल दिसत आहे.

  

  “मागील वर्षीच हा पूल अर्धा तुटला होता मात्र याकडे राजकीय नेत्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्याची किंमत ग्रामस्थांना चुकवावी लागत आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याची मोठा वळसा घालून किंमत चुकवावी लागत आहे’-व्यंकटेश धट,भोजडे,ज्येष्ठ कार्यकर्ते.

   कोपरगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य वादळ वाऱ्यासह झालेल्या ११३ मि.मी.विक्रमी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची दैना उडाली असून सोयाबीन,मका,ऊस,कापूस,फळबागा आदी पिकांचेमोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकात अद्यापही मोठ्या प्रमाणावर पाणी असून अद्याप पाऊस थांबण्याची चिन्हे नाही त्यामुळे शेतकऱ्यांची त्यामुळे चिंता वाढली असून प्रशासनाने  नुकसान भरपाई देण्यासाठी आजच सकाळी बैठक घेतली असून या पार्श्वभूमीवर खा.वाकचौरे,आ.आशुतोष काळे यांनी गावोगावी भेटी दिल्या आहेत.वारी येथेही काही शेतकरी आणि बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके आदींच्या कुटुंबांना बारा तास अडकून पडावे लागले होते.तर कोपरगाव येथील खडकी उपनगर,सुभाषनगर,संजय नगर हा भागही पाण्याखाली गेला होता.मात्र सर्वाधिक नुकसान हे कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाचे झाले असून यात भोजडे येथील गावठाणानजिक असलेला वैजापूर रोडवरील कोळ नदीवरील पुल चक्क वाहून गेला असल्याने कोपरगाव तालुक्याचा पूर्व भागाशी संपर्क तुटला आहे.तर शेतकऱ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
 
  दरम्यान मागील वर्षीच हा कोळ नदी पूल अर्धा तुटला होता मात्र याकडे राजकीय नेत्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्याची किंमत ग्रामस्थांना चुकवावी लागत आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याची मोठा वळसा घालून किंमत चुकवावी लागत आहे.त्यामुळे खोपडी,धोत्रे,भोजडे आदी गावांना त्याचा फटका बसला आहे.परिणामी वैजापूर ला जाण्यास सर्वात जवळचा ठरणारा मार्ग बंद झाला आहे.परिणामी दूध संघाच्या गाड्या,राज्य परिवहन विभागाच्या बस आदींना आता दुरून जुन्या नागपूर मार्गाने दहिगाव बोलका मार्गे जावे लागत आहे.त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे.त्यामुळे या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने अंदाजपत्रक बनवून हाती घ्यावे असे आवाहन भोजडे येथील कार्यकर्ते व्यंकटेश धट आणि भगवान सिनगर आदींनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close