जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

कोपरगावकरांसाठी…तो सुदिन!

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

    उत्तर नगर जिल्ह्यात सहकारात अग्रणी असलेल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे वतीने देशातील पहिला सहकारी कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी) प्रकल्प तसेच स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवार दि.०५ ऑक्टोबर रोजी संजीवनी विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न होत असून या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली  होणार आहे.दरम्यान एवढ्या बड्या नेत्यांचे तालुक्याला पाय लागणार असल्याचे कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था,शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल अशी अपेक्षा करणे वाईट नाही तो तालुक्यातील जनतेसाठी सुदिन.

दोन्ही संकल्पचित्र.

दरम्यान या कार्यक्रमास केंद्रीय मंत्र्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री आदी येत असल्याचे अनेक नव्हे शेकडो नागरिकांचा बळी घेणाऱ्या नगर-मनमाड सह तळेगाव मार्गे संगमनेर पुणे या रस्त्यासह जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था दूर होणार का असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.याबाबत जनतेचा या कार्यक्रमाचे निमित्ताने संताप बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

   सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सी.बी.सी.) प्रकल्प म्हणजे शेतकरी किंवा सहकारी संस्था यांच्या सहकार्याने सेंद्रिय कचरा (उदा.शेतीमधील कचरा,धान्याचा कचरा,अन्न कचरा) वापरून कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प मानला जातो.या प्रकल्पात कचऱ्यापासून बायोगॅस शुद्ध करून तो कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सी.एन.जी.) प्रमाणे वापरला जातो. हे पारंपरिक जीवाश्म इंधनाला एक स्वस्त,स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा पर्याय आहे,जो कचरा व्यवस्थापनात सुधारणा करतो,ग्रामीण रोजगार निर्मितीस मदत करतो आणि आयात अवलंबित्व कमी करतो.त्याला केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी प्राधान्य दिले असून त्याचा ते मोठा पाठ पुरावा करत असताना दिसत असतात.त्यामुळे त्यांचा देशात नाही तर परदेशातही मोठा सन्मान होत असतो.त्याला ते मोठ्या प्रमाणावर अनुदान देत आहे.परिणामी देशात सहकारात अग्रणी असलेले महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र याकडे न ओढले गेले तर नवल आहे.

  

या पूर्वी प्रत्येक उपपदार्थ निर्मितीत या संजीवनी सहकारी साखर कारखान्याने कायमच माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या काळापासून प्राधान्य दिले असून त्यांचा तसा देशभर लौकिक आहे.मात्र प्रकल्प उद्घाटनाची घोषणा प्रत्येक वेळी होऊनही ऊस दर वाढ होण्याबाबत कायमच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली असल्याचे दिसून आले आहे.अद्याप एवढी वर्षे तरी सत्यात उतरलेली नाही.

  कोपरगाव तालुक्यात याचा अनुभव येऊ लागला असून याबाबत संजीवनी सहकारी कारखान्याने बाजी मारली असल्याचे दिसत आहे.मात्र त्याचा शेतकऱ्यांना ऊस दराचा भाव वाढण्यास किती मदत होईल ? हा संशोधनाचा भाग आहे.कारण या पूर्वी प्रत्येक उपपदार्थ निर्मितीत या संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे कायमच माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या काळापासून प्राधान्य दिले असून त्यांचा तसा देशभर लौकिक आहे.मात्र प्रकल्प उद्घाटनाची घोषणा प्रत्येक वेळी होऊनही ऊस दर वाढ होण्याबाबत कायमच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली असल्याचे दिसून आले आहे.अद्याप एवढी वर्षे तरी सत्यात उतरलेली नाही.नाही तर आज हा साखर कारखाना देशात सर्वाधिक ऊस दर देणारा ठरला असता दुर्दैवाने तसे दिसत नाही असो.

   दरम्यान या कार्यक्रमास देशाचे सहकार मंत्री अमित शहा येत असल्याने या प्रसंगी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर ओहळ,विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे,विदर्भ,तापी,कोकण खोऱ्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

   दरम्यान या कार्यक्रमास केंद्रीय मंत्र्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री आदी येत असल्याचे अनेक नव्हे शेकडो नागरिकांचा बळी घेणाऱ्या नगर-मनमाड सह तळेगाव मार्गे संगमनेर पुणे या रस्त्यासह जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था दूर होणार का असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.त्रस्त जनतेला निदान पायाभूत रस्ते,शेतीला पाणी,वीज आणि पिण्याचे पाणी एवढ्या किमान अपेक्षा आहे.मात्र स्वातंत्र्याची ७८ वर्षे उलटूनही या पायाभूत सुविधा मात्र वर्तमान नेते देऊ शकले नाही हे त्यांचे सपशेल अपयश मानले जात आहे.यात कोणालाही संदेह नाही मात्र स्थानिक नेते ते समजून घेतील तो सुदिन.निदान हे केंद्रीय मंत्री येत असल्याचे ती पूर्ण व्हावी अशी जनतेनं अपेक्षा व्यक्त करणे वावगे नाही.

                     ——————————–

*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा’ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close