सामाजिक उपक्रम
अपंग बांधवांसाठी किराणा वाटप संपन्न

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील श्री राम दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वंचित घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने अपंग बांधवांसाठी किराणा वाटप कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते त्याला चांगला प्रतिसाद लाभला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

“दिव्यांग बांधव समाजाचा अविभाज्य घटक आहेत.त्यांना स्वावलंबी व आनंदी जीवन मिळावे यासाठी संस्थेच्यावतीने सातत्याने अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते”-गोकुळ पावडे,अध्यक्ष,श्री राम दिव्यांग सेवा प्रतिष्ठान संवत्सर.
अपंगांना विविध सरकारी योजना,आर्थिक मदत आणि पुनर्वसन सेवांद्वारे मदत गरजेची आहे,ज्यामुळे त्यांना शिक्षण,आरोग्यसेवा आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतील. ‘दिव्यांग कल्याण’ वेबसाइट आणि ‘महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ’ यांसारख्या संस्थांमार्फत आर्थिक सहाय्य,साधने व उपकरणांची खरेदी,आणि स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत उपलब्ध आहे.याव्यतिरिक्त,त्यांना समाजात समान संधी मिळायला हव्यात आणि त्यांच्या गरजा समजून घेऊन आदरपूर्वक संवाद साधणे आवश्यक आहे.त्यासाठी सुज्ञ नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांना सन्मान देऊन मदत करण्याची गरज आहे.ती गरज ओळखून संस्थेचे अध्यक्ष गोकुळ पावडे यांनी संस्था स्थापन करून त्या दिशेने पाऊल उचलले आहे व हा त्यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवला आहे.
सदर प्रसंगी उपाध्यक्ष पन्नालाल माधव नेहे,दिपक वराडे,महेश जाधव,ज्योती घुले,अशोक रानोडे,बाबासाहेब आगवन,राजू परजणे आदी स्वयंसेवक उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमात अपंग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचा संच देण्यात आला त्यात तेल,साखर,पीठ,पोहे,भगर,रवा,मसाले अजून इत्यादी आदी दैनंदिन वापरातील वस्तूंचा समावेश होता.
या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष गोकुळ पावडे म्हणाले की, “दिव्यांग बांधव समाजाचा अविभाज्य घटक आहेत.त्यांना स्वावलंबी व आनंदी जीवन मिळावे यासाठी संस्थेच्यावतीने सातत्याने अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.गरजूंना मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे शेवटी सांगितले आहे.या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान याबाबत आश्रमाचे काम चालू आहे या आश्रमास आपण समाजातून आर्थिक वस्तू स्वरूपात सढळ हातानी मदत करू शकतो.त्यासाठी संस्थेने नामदेव परजणे कॉलेज रोड,संवत्सर,कोपरगाव,अहिल्यानगर,मो. 8275 89 4285,7821 09 4825 आदींवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.