क्रीडा विभाग
…हा हॉकी संघ राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी स्टेडियम येथे २५ व २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या सब ज्युनिअर हॉकी संघाने अंतिम सामन्यात डॉन बॉस्को,मुंबई विरुद्ध खेळतांना सदर संघाचा १-० असा निसटता पराभव झाला.गौतम पब्लिक स्कूलच्या या ग्रामीण भागातील संघाने नाशिक,अमरावती या मातब्बर संघांचा पराभव करून उप-विजेतेपद पटकावले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेत शाळेच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने केलेल्या लक्षवेधी कामगिरीबद्दल शाळेचे प्राचार्य नूर शेख,हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,क्रीडा संचालक निलक,हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, संघातील सर्व खेळाडू आदींचा संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
राज्यस्तरावर उप-विजेतेपद मिळवणे ही बाब कौतुकास्पद असल्याचे शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी नमूद केले.गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघास प्रशिक्षक रमेश पटारे यांनी मार्गदर्शन केले.कर्णधार म्हणून तन्मय पाटील व उप-कर्णधार म्हणून जीवन गवारे यांनी आपली जबाबदारी चोख बजावली. स्पर्धेत तन्मय पाटील २ गोल,कृष्णा सातपुते २ गोल तर ओम मुरडणर व चैतन्य नरोटे यांनी प्रत्येकी १ गोल करून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.
या स्पर्धेत शाळेच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने केलेल्या लक्षवेधी कामगिरीबद्दल शाळेचे प्राचार्य नूर शेख,हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,क्रीडा संचालक निलक,हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, संघातील सर्व खेळाडू आदींचा संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उपस्थित सर्व मान्यवरांनी शाळेचा हॉकी संघ,प्रशिक्षक रमेश पटारे व सर्व क्रीडा विभागाचे अभिनंदन केले आहे.