निधन वार्ता
सुदाम भोसले यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी व शेती महामंडळाचे माजी मुकादम सुदाम त्र्यंबक भोसले (वय- ८१) यांचे काल रात्री ०८.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.सुदाम भोसले अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे म्हणून संवत्सर आणि शेती महामंडळात परिचित होते.त्यांचा अनेक हिंदू धर्मग्रंथांचा गाढा अभ्यास होता.परिणामी त्यांचा परिसरात आदरयुक्त दबदबा होता.
स्व.सुदाम भोसले अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे म्हणून संवत्सर आणि शेती महामंडळात परिचित होते.त्यांचा अनेक हिंदू धर्मग्रंथांचा गाढा अभ्यास होता.परिणामी त्यांचा परिसरात आदरयुक्त दबदबा होता.त्यांचे पश्चात दोन भाऊ,पत्नी,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांना श्री.ढेपले सर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.