जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ग्रामविकास

…या गावांना मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते मंजूर!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजने अंतर्गत राज्य शासनाने दखल घेवून कोपरगाव मतदार संघातील ४० पाणंद व शेत रस्त्यांना महायुती शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजने अंतर्गत मतदार संघातील अंचलगाव,आपेगाव,उक्कडगाव, करंजी,कान्हेगाव,कारवाडी,कासली,कुंभारी, कोकमठाण,कोळगाव-थडी,कोळपेवाडी, खिर्डी,चांदगव्हाण,चांदेकसारे,चासनळी, डाऊच बु.,तिळवणी,दहेगाव बोलका,धामोरी, धोत्रे,बक्तरपुर,बहादरपूर,बोलकी,ब्राम्हणगाव, भोजडे,मंजूर,मढी बु.,मल्हारवाडी,माहेगाव देशमुख,मुर्शतपुर,रांजणगाव देशमुख,लौकी, वेळापूर,शहापूर,संवत्सर,सडे,सांगवी भुसार, हंडेवाडी,वडगाव आदी सत्ताधारी समर्थक ३९ गावांना मंजुरी मिळाली आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव..

   विकसित भारतासाठी जसे दर्जेदार रस्ते व महामार्ग आवश्यक आहेत त्याचप्रमाणे समृद्ध ग्रामीण भारतासाठी पाणंद रस्ते महत्वाचे आहेत.शेतकरी बांधवांना आपल्या शेतात जाण्यासाठी व कृषी यंत्र सामग्री सहज वाहून नेता आली पाहिजे यासाठी चांगले पाणंद रस्ते आवश्यक आहेत.राज्यात अनेक ठिकाणी पाणंद रस्त्याची अवस्था खराब असून शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचणी येतात. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारच्या महसूल विभागाने ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोपरगाव मतदार संघांतील ३९ रस्त्यांचा समावेश आहे.

  या योजने अंतर्गत राज्यातील शेतकरी,घरकुल लाभार्थी व शासकीय बांधकामासाठी शेततळी, पाझर तलाव,महसूल नाले व बंधाऱ्यातून निघणारा गाळ,माती,मुरूम आणि दगड मोफत मिळणार आहे.यामुळे पाणंद रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम,दगड व माती शेतकऱ्यांना विनामूल्य व सहज उपलब्ध होईल.

  शेतीसाठीची यंत्रसामग्री,शेतमालाची वाहतूक यामुळे अधिक सोयीची होईल.त्यातून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची कार्यक्षमता वाढेल,उत्पन्न वाढेल व खराब पाणंद रस्त्यामुळे येणाऱ्या अनेक अडचणींपासून सामान्य शेतकऱ्याची मुक्तता होण्यास मदत होणार आहे.यासाठी आ.काळे यांनी काही निवडक गावांची शिफारस केली होती.त्यातील मतदार संघातील अंचलगाव,आपेगाव,उक्कडगाव, करंजी,कान्हेगाव,कारवाडी,कासली,कुंभारी, कोकमठाण,कोळगाव-थडी,कोळपेवाडी, खिर्डी,चांदगव्हाण,चांदेकसारे,चासनळी, डाऊच बु.,तिळवणी,दहेगाव बोलका,धामोरी, धोत्रे,बक्तरपुर,बहादरपूर,बोलकी,ब्राम्हणगाव, भोजडे,मंजूर,मढी बु.,मल्हारवाडी,माहेगाव देशमुख,मुर्शतपुर,रांजणगाव देशमुख,लौकी, वेळापूर,शहापूर,संवत्सर,सडे,सांगवी भुसार, हंडेवाडी,वडगाव आदी सत्ताधारी समर्थक ३९ गावांना या मातोश्री शेत पानंद रस्ते योजनेचा फायदा होऊन या योजनेंतर्गत सातगावोगावी शेत रस्त्यांची उभारणी,मजबुतीकरण होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close