निधन वार्ता
बबनराव तिरमखे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर (प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व गोदावरी खोरे दूध संघाचे माजी संचालक बबनराव रावजी तिरमखे यांचे नुकतेच निधन झाले आहे.मृत्यूसमयी ते ७६ वर्षांचे होते,संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता

कै.बबनराव तिरमखे हे दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून संवत्सर पंचक्रोशीत परिचित होते.सन- २०११ ते २०१६ या कालावधीत गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलाचा सांभाळ करून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले.त्यांच्यामागे गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे विद्यमान संचालक दिलीप (बापू) तिरमखे व संदीप तिरमखे ही दोन मुले,पत्नी, एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै.बबनराव तिरमखे यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर पंचक्रोशीतील अनेक नागरीक व गोदावरी दूध संघातील पदाधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णाराव परजणे,उपसरपंच विवेक परजणे यांनी कै.बबनराव तिरमखे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.