जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…या शाळेच्या हॉकी संघाकडे पूणे विभागाचे नेतृत्व !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    पुणे येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,यांच्या वतीने पी.सी.एम.सी.पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या सब ज्युनिअर हॉकी संघाने अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व केले असून लक्षवेधी कामगिरी केली आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  

गौतम पब्लिक स्कूलचा क्रीडा क्षेत्रात दबदबा मानला जात असून विशेषत: हॉकी खेळात गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने अनेक कीर्तीमान आपल्या नावावर केलेले आहेत.तब्बल १५ वेळा गौतमच्या हॉकी संघाने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम केला आहे.

   सदर स्पर्धेचा अंतिम सामना गौतम पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट पेट्रिक्स स्कूल,पुणे (पूणे, शहर) यांच्यात झाला होता.या सामन्यात लक्षवेधी खेळ करत गौतम पब्लिक स्कूल हॉकी संघाने पुणे संघाचा २-० अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले आहे.राज्यस्तरीय स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे. 

  
  गौतम पब्लिक स्कूलचा क्रीडा क्षेत्रात दबदबा मानला जात असून विशेषत: हॉकी खेळात गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने अनेक कीर्तीमान आपल्या नावावर केलेले आहेत.तब्बल १५ वेळा गौतमच्या हॉकी संघाने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम केला आहे.

   शाळेच्या विजेत्या सब-ज्युनिअर हॉकी संघाचे नेतृत्व तन्मय पाटील व उप-कर्णधार जीवन गवारे यांनी केले.स्पर्धेत ओम मुरडनर, कृष्णा सातपुते, नैतिक पवार, सोहम माळी,चैतन्य नरोटे,आदित्य पाटील, मानव देशमुख, पार्थ रायते, प्रतीक मोगल (गोलकीपर) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.हॉकी संघाच्या खेळाडूंना हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे यांचे  मार्गदर्शन लाभले होते.संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,संस्था विश्वस्त आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष सिकंदर पटेल,सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी गौतम पब्लिक स्कूलच्या विजेत्या संघाचे व क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे आदींनी शाळेच्या क्रीडा विभागाचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close