जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ग्रामविकास

…या ग्रामपंचायतीना मिळणार नव्या इमारती !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जीर्ण झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी निधीसाठी केलेल्या पाठपुराव्यातून शासनाने धारणगाव,धोत्रे,मुर्शतपूर,जेऊर पाटोदा, दहेगाव बोलका,करंजी बु.,शिंगणापूर व चासनळी ह्या आठ गावांच्या नवीन इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे एकूण ०२ कोटी रुपये निधी मंजुर केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“गावच्या प्रगतीसाठी मजबूत व सक्षम ग्रामपंचायत इमारत ही काळाची गरज आहे. शासनाने मंजूर केलेल्या या निधीमुळे गावोगावी आधुनिक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती उभ्या राहतील.त्यामुळे ग्रामपंचायत कारभार अधिक पारदर्शक,प्रभावी व लोकाभिमुख होईल”-आ.आशुतोष काळे, कोपरगाव.

 

ग्रामपंचायतीचे महत्त्व हे गावाचा सर्वांगीण विकास साधण्यात आहे,कारण ती गावातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करून त्यांना मूलभूत सुविधा पुरवते,स्थानिक लोकशाही मजबूत करते आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीद्वारे खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण ग्रामस्वराज्य निर्माण करते.हे गावाच्या सामाजिक,आर्थिक आणि आरोग्यविषयक कल्याणासाठी कार्य करते.त्यांना परिपूर्ण अशा इमारती नाही हे दुर्दैवी चित्र कोपरगाव तालुक्यात दिसत होते.ते बदलण्यासाठी आ.काळे यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते त्यातून त्यांना हे यश आले आहे.
त्यामुळे लवकरच या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती पूर्ण होऊन या नवीन इमारतींमुळे केवळ कामकाजाची गती वाढणार नाही तर गावकऱ्यांना आवश्यक सेवा एकाच छताखाली सुलभ पद्धतीने मिळणार आहेत. नागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांना डिजिटल व्यवहार,ऑनलाइन प्रमाणपत्रे,बँकिंग व इतर सेवा गावातच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

  महायुती शासनाच्या या निर्णयाबद्दल आ. काळे यांचेसह ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.“गावच्या प्रगतीसाठी मजबूत व सक्षम ग्रामपंचायत इमारत ही काळाची गरज आहे. शासनाने मंजूर केलेल्या या निधीमुळे गावोगावी आधुनिक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती उभ्या राहतील.त्यामुळे ग्रामपंचायत कारभार अधिक पारदर्शक,प्रभावी व लोकाभिमुख होईल.या प्रलंबित ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी दोन कोटी निधी दिल्याबद्दल केंद्र शासन तसेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री राधाकृष्ण विखे,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आ.काळे यांनी धारणगाव, धोत्रे, मुर्शतपूर,जेऊर पाटोदा,दहेगाव बोलका,करंजी बु.,शिंगणापूर व चासनळी ह्या आठ गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close