जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

…या तालुक्याच्या पूर्व भागातील पाझर तलाव भरले !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पाऊस पुरेशा प्रमाणावर झालेला नसताना पालखेड धरणातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पाझर तलाव भरले असून त्याचे जलपूजन नुकतेच कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केले आहे.

“आमचे उक्कडगाव हे तालुक्याच्या सीमेवरचे शेवटचे गाव मात्र आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून मागील सहा वर्षापासून आमच्या गावातील पाझर तलाव आवर्जून भरून दिले जात आहे”-आप्पासाहेब निकम,उक्कडगाव.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”माजी खा.शंकरराव काळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी अनेक गावात पाझर तलावांची निर्मिती केली.पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या या पाझर तलावात माजी आ.अशोक काळे यांच्या काळात हे पाझर तलाव नियमित भरले जात होते व २०१९ पासून आ.आशुतोष काळे देखील हे तलाव भरून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पूर्व भागातील नागरीकांच्या चिंता मिटल्या असून आ.काळेंच्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे शेवटी कारभारी आगवण यांनी म्हटले आहे.

  सदर प्रसंगी सांडूभाई पठाण,राधु उकिर्डे, शिरसगाव-सावळगावचे सरपंच अशोक उकिर्डे, तिळवणीचे सरपंच गोविंद पगारे,जिनिंग प्रेसिंगचे माजी व्हा.चेअरमन नानासाहेब निकम,संचालक संदीप शिंदे,गोदावरी खोरेचे संचालक आप्पासाहेब निकम,राहुल गायकवाड,ऋषिकेश भवर,अमृत शिंदे,केशव गायकवाड,गोकुळ गायकवाड,लक्ष्मण भागवत, बाळासाहेब भागवत,रवी सुबे,शांताराम भागवत,जलील पटेल,गोविंद गायकवाड, भिकाजी भागवत,संदीप भागवत,सोमनाथ भागवत,बाबासाहेब भागवत,विनोद भागवत, ज्ञानदेव भागवत,विशाल भागवत,चांगदेव भागवत,किशोर गायकवाड,रावसाहेब उकिर्डे, अनिल वायदेस्कर,बिलाल शेख,तौसिब शहा, सुलतान पटेल आदी उपस्थित होते.

यावेळी उक्कडगाव येथील आप्पासाहेब निकम यांनी सांगितले की, आमचे गाव हे तालुक्याच्या सीमेवरचे शेवटचे गाव मात्र आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून मागील सहा वर्षापासून आमच्या गावातील पाझर तलाव आवर्जून भरून दिले जात आहे.याहीवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी आम्ही आ.काळे यांच्याकडे मांडल्या असता त्यांनी त्याचवेळी पाटबंधारे विभागाला सूचना करून पाझर तलाव भरून देण्यास सांगितले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close