जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात दगडाने हाणामारी,चौघांवरं गुन्हा !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


  कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या समता नगर या ठिकाणी शिवीगाळ करण्याच्या कारणामुळे आपले पती अनिल गुंजाळ यांना आरोपी रामदास दगडू गुंजाळ,अमित रामदास गुंजाळ यांचेसह चौघांनी दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा गुन्हा ज्योती अनिल गुंजाळ (वय-२८) यांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

 

फिर्यादी महिला ज्योती गुंजाळ यांचे पती अनिल गुंजाळ हे काल दिनाक १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास कामावर जात असताना यातील साईप्रभानगर येथील रहिवासी प्रमुख आरोपी रामदास गुंजाळ यांनी फिर्यादीचे पती अनिल गुंजाळ यांना शिवीगाळ केल्याने त्याबाबत अनिल गुंजाळ यांनी त्यास जाबसाल केल्याने आरोपीचा मुलगा अमित गुंजाळ,प्रसाद रामदास गुंजाळ,पत्नी लताबाई रामदास गुंजाळ आदींनी संगनमताने शिवीगाळ करून दगड,लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.

    वर्तमानात समाजातील सहनशीलता मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने किरकोळ किरकोळ कारणावरून शिवीगाळ,हाणामाऱ्या आदी घटनात मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.मोबाईल,दूरदर्शन आदी सोयी सुविधांमुळे नागरिक आत्मकेंद्री होताना दिसत असून त्यांच्यातील होणारा संवाद संपत चालला आहे.परिणामी त्याचे सामाजिक परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.परिणामी किरकोळ किरकोळ कारणावरून भांडणे,हाणामाऱ्या आदी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या समता नगर येथील रहिवाशांत घडून आली आहे.

  यातील फिर्यादी महिला ज्योती गुंजाळ यांचे पती अनिल गुंजाळ हे काल दिनाक १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास कामावर जात असताना यातील साईप्रभानगर येथील रहिवासी प्रमुख आरोपी रामदास गुंजाळ यांनी फिर्यादीचे पती अनिल गुंजाळ यांना शिवीगाळ केल्याने त्याबाबत अनिल गुंजाळ यांनी त्यास जाबसाल केल्याने आरोपीचा मुलगा अमित गुंजाळ,प्रसाद रामदास गुंजाळ,पत्नी लताबाई रामदास गुंजाळ आदींनी संगनमताने शिवीगाळ करून दगड,लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी महिलने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  सदर घटनास्थळी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पो.हे.कॉन्स्टेबल बी.एच.तमनर यांनी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

  दरम्यान कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.४५८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),११५(२),३५२,३५१(२३,(५)) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल तमनर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close