जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात संशोधन प्रकल्प कार्यशाळेचे उत्साहात आयोजन

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया महाविद्यालय येथे अविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

"अविष्कार संशोधन प्रकल्पामुळे महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्याचा संशोधन क्षेत्राकडे कल वाढत असल्याचे सांगितले आहे.अशा प्रकल्पामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे"-डॉ.विजय ठाणगे,प्राचार्य,के.जे.सोमैयामहाविद्यालय कोपरगाव.

  या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन संगमनेर येथील मालपाणी महाविद्यालयाचे  भौतिकशास्त्र विषयाचे डॉ.संदीप आरोटे हे उपस्थित होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अविष्कार संशोधन प्रकल्पाची पार्श्वभुमी व महत्त्व नमूद करतांनाच महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतांना कोणकोणत्या बाबी आत्मसात कराव्यात हे सांगितले.यावेळी त्यांनी राज्य पातळीवरती मिळालेल्या अविष्कार स्पर्धेतील विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केले.विद्यार्थ्यांनी बनविलेल्या नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पाची दखल विद्यापीठ व शासन पातळीवर होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

   सदर प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी अविष्कार संशोधन प्रकल्पामुळे महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्याचा संशोधन क्षेत्राकडे कल वाढत असल्याचे सांगितले आहे.अशा प्रकल्पामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार असून या स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे संयोजक व महाविद्यालयातील शैक्षणिक व संशोधन समन्वयक डॉ.गणेश चव्हाण यांनी केले आहे. आतापर्यंतचा अविष्कार योजनेतील महाविद्यालयाचा दैदीप्यमान सहभाग आणि यामागची महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट केली आहे.

  यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.एस.जी. कोंडा यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर आभार प्रा.सुभाष सोनवणे यांनी मानले आहे.

  या कार्यशाळेत डॉ.बी.एस.गायकवाड,डॉ. वसुदेव साळुंके,डॉ.गणेश शिंदे,डॉ.जिभाऊ मोरे,डॉ.संजय दवंगे,डॉ.सुरेश देवरे,डॉ.निलेश पोटे यांच्यासह महाविद्यालयातील विविध संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थी, पदवी-पदवीत्तर स्तरावरील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close