लोकसभा कामकाज
…या राष्ट्रीय महामार्गावरील बळी थांबवा – खासदारांची केंद्रात मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
संभाजीनगर ते अहिल्यानगर मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ अत्यंत वाईट स्थितीत असून प्रवासी आणि नागरिकांचे हकनाक बळी जात असल्याने हा रस्ता तातडीने तयार करा अशी मागणी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांचेकडे आज समक्ष भेटीत केली आहे.

याबाबत केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती खा.वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाच्या दोन वेळा निविदा काढल्या होत्या.बी.ओ.टी.तत्वावर हे काम होणार होते.मात्र,त्या कमी दराने भरल्या गेल्या.त्यानंतर दोन ठेकेदारांनी काम अर्धवट सोडले.एका बँकेने खोटी बँक हमी दिल्यामुळे अनेक अपघात होऊन निष्पापांचे बळी गेले आहेत.त्यामुळे त्या दोन्ही ठेकेदारांवर कारवाई सुरू केल्या असल्याच्या बातम्या होत्या.या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या पंधरा दिवसांत या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम केले जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या होत्या.जिल्हाधिकारी यांचेकडे जबाबदारी सोपवली गेली होती.पंधरा दिवसात आढावा घेतला जाणार असल्याचा बातम्या गत डिसेंबर मध्ये पसरवल्या गेल्या होत्या.मात्र या पैकी काहीच झाले असल्याचा पुरावा ना प्रवाशांना मिळाला नाही अवजड वाहन धारकांना की प्रवाशांना.त्यामुळे या रस्त्यावरील अपघात वाढत जाताना प्रवाशांचे हकनाक बळी जाताना दिसत होते.त्यात कमी मात्र येत नव्हती त्यामुळे याबाबत मागील हिवाळी अधिवेशनात शिर्डीचे उबाठा शिवसेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांना १४ डिसेंबर २०२४ रोजी संसदेत शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारला होता.त्यावेळी नितीन गडकरी यांनी त्यास उत्तर देताना आपण लवकरच या राष्ट्रीय महामार्गासाठी २.५ हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती.त्याला आता ०९ महिने उलटून गेले आहे.उत्तरेतील एका युवराजाने या रस्त्याबाबत हात टेकले असून कोणी ही हा रस्ता करा आणि खुशाल श्रेय घ्या अशी थेट हाकाटी पिटली असून सपशेल लोटांगण घातले असल्याचे नुकतेच उघड झाले आहे.या पार्श्वभूमीवर या प्रश्नाला व खा.वाकचौरे यांच्या या मागणीला विशेष महत्व आले असून त्यांनी योग्य वेळ (टायमिंग) साधले असल्याची चर्चा नगर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात रंगली आहे.त्यानंतर खा.वाकचौरे यांनी संभाजीनगर अहिल्या नगर या महत्वाच्या रस्त्याच्या प्रश्नास हात घातला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिवसेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांना १४ डिसेंबर २०२४ रोजी संसदेत शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारला होता.त्यावेळी नितीन गडकरी यांनी त्यास उत्तर देताना आपण लवकरच या राष्ट्रीय महामार्गासाठी २.५ हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती.त्याला आता ०९ महिने उलटून गेले आहे.तरीही अद्याप स्मशान शांतता आहे हे विशेष!
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”या महामार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे मोडून गेले असून रस्ता खड्ड्यांनी आणि उंचसखल पॅचांनी भरलेला आहे.त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास धोकादायक ठरत असून,अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे.अनेक वेळा गंभीर अपघात टळले असले तरी किरकोळ अपघात घडल्याची उदाहरणे मोठ्या प्रमाणावर असून अनेक बळी त्यात जात आहे.वित्तीय नुकसान वेगळे आहे.
याशिवाय रस्त्यावरील सुविधा अपुऱ्या व दुर्लक्षित अवस्थेत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.रस्त्यावर अनावश्यक ठिकाणी बसवलेले दुभाजक तसेच त्यावरील बेकायदेशीर काटकोन यामुळे वाहतुकीचा वेग खंडित होतो आणि मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते.तसेच पावसाळ्यानंतर रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्या (झेब्रा पट्टे) जवळजवळ पूर्णपणे अदृश्य झाल्या असून,विशेषतः रात्री वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होतो.

खा.वाकचौरे यांनी पुढे नमूद केले की,”या महामार्गाच्या देखभालीचा करार ३ सप्टेंबर २०२५ रोजी संपला असून,मागील कंत्राटदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे.त्यामुळे सध्या हा रस्ता पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे.
या गंभीर समस्येवर उपाययोजना म्हणून त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत त्यात महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून मोडक्या डांबरी पृष्ठभागाची दुरुस्ती करावी,रस्त्याची रचना पुनर्विचारात घेऊन अनावश्यक डिव्हायडर हटवावेत,रस्त्यावरील पट्ट्या (लेन मार्किंग) पुन्हा रंगवून वाहनांना सुरक्षित मार्गदर्शन द्यावे,नवा देखभाल करार जबाबदार व सक्षम कंत्राटदाराला देऊन वेळेत दर्जेदार काम करावे.
सदरचा संभाजीनगर ते अहिल्यानगर हा रस्ता पुण्यासह दक्षिण भारताशी जोडण्यात अहंम भूमिका निभावत असून अवजड वाहनासह प्रवासी वाहनाची संख्या मोठी आहे.सदर रस्ता हा श्री साईबाबांच्या शिर्डीस जोडणारा असल्याने या रस्त्याचे काम तातडीने होणे गरजेचे बनले असल्याची बाब निदर्शनास आणली आहे.
याबाबत केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती खा.वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.आता केंद्रीय रस्ते विकास कार्यालयाचे अधिकारी काय कारवाई करणार याकडे नेवास्यासह नगर जिल्ह्यातील प्रवाशांचे लक्ष लागून आहे.