जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

जनता दरबारात तक्रारींचा पाऊस …!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   महसूल आणि महाविद्यालय विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने जबाबदारी ढकलणे अयोग्य असून आलेल्या तक्रारींचे आगामी १५ दिवसात निराकरण करा व केलेल्या कामांचा अहवाल सादर करा असे फर्मान आज आ.आशुतोष काळे यांनी सोडले असल्याचे दिसून आले आहे.आज नागरिकांनी जवळपास ८७-८८ करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान महावितरण कंपनीने कोपरगाव तालुक्यातील कमी दाबाने होणारा वीजपुरवठा दुरुस्त करण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी शहा पंचाळे शिवारात २२० के.व्हि.ए.विद्युत रोहित्राचे ढोल बडवून ताशे वाजवून अजित पवार यांचे हस्ते उद्घाटन केले होते.मात्र अद्याप त्याचा विद्युत पुरवठा कोपरगाव तालुक्यात पहायला मिळालेला नाही परिणामी शेतकऱ्यांचे खरीप आणि रब्बी हंगामात मोठे नुकसान झाले आहे.यावर सर्वांनी गुपचिळी…! धरली असल्याचे उघड झाले आहे.याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

  कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोपरगाव तहसीलमध्ये आपले काम करून घेताना दलालांचा मोठा सुळसुळाट झाला असून अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याखेरीज नागरिकांचे एकही काम होत नसल्याचा आरोप भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खा.स्व.सूर्यभान वहाडणे यांचे चिरंजीव व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला होता.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील सत्ताधारी गटात खळबळ उडाली होती.व हा आ.काळे यांना घरचा आहेर मानला जात होता.त्यानंतर आ.काळे हे सजग झाले असल्याचे दिसून आले होते व त्यांच्या प्रसिद्धी विभागाने लगोलग प्रसिद्धी पत्रक काढून अधिकाऱ्यांना फटकारले (आव आणल्याचे) असल्याचे दिसून आले होते.त्यानंतर त्यांनी तातडीने हालचाल करून प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या महसूल आणि त्या खालोखाल बनाव करण्यात माहीर असलेल्या महावितरण कंपनीची बैठक आज सकाळी १०.३० वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी हे फर्मान दिले आहे.

“कोपरगाव तालुक्याचे प्रशासन जनतेसाठी आहे,जनता प्रशासनासाठी नाही त्यामुळे जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजेत.जनता दरबारात नागरीकांनी मांडलेल्या प्रश्नांवर पंधरा दिवसांमध्ये कारवाई होणे अपेक्षित आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

  सदर प्रसंगी गौतम बँकेचे अध्यक्ष संजय आगवन,जिनिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,तहसीलदार महेश सावंत,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,भूमी अभिलेख अधीक्षक रमाकांत डावरे,महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता रंजना फरसाळे, अतिरिक्त अभियंता डी.पी.धांडे आदींसह शासकीय कर्मचारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देणाऱ्या मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना -२ च्या बाबतीत अक्षम्य उशीर होत असल्याबाबत कोणीही चकार शब्द काढला असल्याचे दिसले नाही हे विशेष !



  यावेळी या जनता दरबारामध्ये महसूल आणि महावितरण बाबत तब्बल ६९ तक्रारी करण्यात आल्या असल्याचे उघड झाले आहे.तर १७- १८ तक्रारींचे जागेवर निरसन केल्याची माहिती त्यांचे प्रसिद्धी विभागाने दिली आहे.दरम्यान यावेळी नागरिकांनी केलेल्या तक्रारीत कमी क्षमतेने होणारा वीज पुरवठा,लोंबकळत असलेल्या वीज वाहिन्या,खंडित वीजपुरवठा, नवीन वीज रोहित्र मागणी,नवीन स्मार्ट वीज मीटर बसविणे,वीज बीलातील त्रुटी तसेच महसूल विभागाच्या बाबत महसूल नोंदी, शिवार रस्ते,उत्पन्न प्रमाणपत्रे, ७/१२ उतारे, पोट खराबा,रेशन आदी बाबतीत नागरीकांनी आपल्या व्यथा आ.आशुतोष काळे यांच्यापुढे मांडल्या.त्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी समजावून घेत आ.काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरीकांचे प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले.

तक्रारी करताना नागरिक.

  यावेळी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना सूचना करतांना आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की,प्रशासन जनतेसाठी आहे,जनता प्रशासनासाठी नाही त्यामुळे जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजेत.जनता दरबारात नागरीकांनी मांडलेल्या प्रश्नांवर पंधरा दिवसांमध्ये कारवाई होणे अपेक्षित आहे.याची महसूल व महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी.

  दरम्यान त्यांनी तहसील कार्यालयात एजंटचा सुळसुळाट वाढला असून नागरीकांची अडवणूक करून शासकीय कामासाठी पैसे मागितले जातात अशा नागरीकांच्या तक्रारी  आहेत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. याबाबत सखोल चौकशी करून जो कोणी कर्मचारी अशा प्रकरणात दोषी असेल त्याला समजावूनन सांगा आणि वेळप्रसंगी त्याच्यावर कार्यवाही करा अशा सूचना तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या.यापुढे जर नागरीकांची अडवणूक करून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले तर मला दर आठवड्याला जनता दरबार घ्यावा लागेल त्यावेळी जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर होणारी कारवाई कोणीच थांबवू शकणार नाही असा सज्जड ईशारा आ.काळे यांनी महसूल प्रशासनाला दिला.

  महावितरण संदर्भात अनेक वीज ग्राहकांच्या तक्रारी आहेत या समस्या देखील सुटल्या पाहिजे.महावितरणकडून जुन्या वीज मीटरच्या जागी वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट वीज मीटर बसवत आहे. त्याबाबत नागरीकांमध्ये संभ्रम असून तो संभ्रम महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दूर करावा.वीज ग्राहकाशी सुसंवाद साधून व  सहमती घेवूनच स्मार्ट मीटर बसवावे अशा सूचना केल्या.जनतेच्या समस्या वेळेवर न सुटल्यामुळे त्यांना प्रशासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात.म्हणूनच प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी जनता दरबार घेत आहे.प्रशासन आणि मतदार संघातील नागरिक यांच्यातील अंतर कमी करून कोणत्याही शासकीय कार्यालयात नागरीकांची कामे अडली जावू नये. जनता दरबारात नागरीकांनी लेखी स्वरूपात मांडलेल्या सर्व अडचणींचे निराकरण व्हावे यासाठी हे सर्व अर्ज संबंधित विभागाकडे पाठविले जातील त्यावर पंधराच दिवसात कार्यवाही झाली पाहिजे.पुढच्या जनता दरबारात तुम्हाला याबाबत अगोदर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा लागेल हे लक्षात घ्यावे असा ईशारा आ.काळे यांनी यावेळी उपस्थित महसूल विभाग व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close