जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

चाकू हल्ल्यातील…या आरोपीस कोपरगावात शिक्षा !

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीस बहाणा करून शेवगाव येथून भेटण्यास आलेला आरोपी जुबेर तांबोळीने सुरक्षा रक्षक बाळासाहेब रोहोम व भाऊसाहेब वाघ यांनी हाकलून दिल्याचा राग मनात धरून यांच्यावर एप्रिल २०२५ मध्ये चाकूने हल्ला चढवला होता.त्याची सुनावणी कोपरगाव येथे नुकतीच संपन्न झाली असून आज दुपारी प्रथम न्यायदंडाधिकारी डी.डी.अलमले यांनी आरोपीस ०७ वर्षाची शिक्षा व ०५ हजारांचा दंड ठोठावला आहे.या शिक्षेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

दरम्यान या खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले होते.न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.आज दुपारी कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायंदंडाधिकारी डी.डी.अलमले यांनी आरोपी जुबेर तांबोळी यास ०७ वर्षे शिक्षा व ०५ हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड.शरद गुजर यांनी काम पाहिले होते.

         सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्दीतील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय असून या ठिकाणी राज्याच्या विविध भागातून विद्यार्थी व विद्यार्थिनी येत असतात.अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी महाविद्यालयातील वसतिगृहात रहात असतात.त्यांच्या सुरक्षेसाठी मुख्य प्रवेशद्वारात आणि महाविद्यालय परिसरात,वसतिगृह आदी ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नेमलेले असतात.विद्यार्थ्यांनी असल्याने महाविद्यालयाची जोखीम आणखीच वाढत असते.अनेक वेळा कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही काही उडाणटप्पू ती तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसतात.त्यावेळी सुरक्षारक्षक आणि उडाणटप्पू तरुण यांच्यात वादविवाद निर्माण होत असतात.त्यातून काही सुरक्षारक्षक शिताफीने त्यांना वाटे लावतात तर काहींना त्यांना वाटे लावताना जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यातून वादविवाद होतात तर काहीं घटनांमध्ये प्रकरण हातघाईवर येते अशीच एक घटना कोपरगाव नजीक असलेल्या संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय एप्रिल २०२५ मध्ये उघडकीस आली होती.


  संजीवनी महाविद्यालयात येथे सुरक्षा कार्यालयासमोर असलेल्या मुलींच्या वस्तीगृहाजवळ काझी गल्ली,शेवगाव येथील आरोपी जुबेर फारूक तांबोळी (वय -२५) हा  एका विद्यार्थिनीस भेटण्याच्या बहाण्याने आला होता.सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सदर आरोपी मुलीच्या ओळखीचा असेल किंवा नातेवाईक असेल गृहीत धरून संबंधित मुलीस वसतिगृहातून बोलावून घेतले होते.सदर विद्यार्थिनी ही प्रवेशद्वारात आली असता व सुरक्षा कर्मचाऱ्याने तुला भेटण्यास हा तरुण आला आहे असे सांगितले असता.तेथे आलेल्या आरोपीस मुलीसमोर बोलावले होते मात्र विद्यार्थिनीने त्यास भेटण्यास चक्क नकार दिला होता.परिणामी प्रकरण सुरक्षा कर्मचारी बाळासाहेब रोहोम यांचे हे गंभीर प्रकरण एव्हाना लक्षात आले होते.त्यांनी व त्यांचा सहकारी भाऊसाहेब तुळशीदास वाघ यांनी आरोपी जुबेर तांबोळी याला प्रशासनाचे आदेशानुसार बाहेरचा रस्ता दाखविला होता.त्याला त्याला राग येऊन त्याने फिर्यादी बाळासाहेब मुक्ताहरीं रोहम (वय -४७) व त्याचा सहकारी साक्षीदार यांचेवर थेट चाकू हल्ला चढवला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.

कोपरगाव न्यायालय.

  या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं .७४/२०१५ भारतीय दंड विधान कलम ३०७ प्रमाणे आरोपी जुबेर तांबोळी याचे विरुद्ध दाखल करण्यात आला होता.त्याला पोलिसांनी रात्री ११.०५ वाजता अटक केली होती.त्याची चौकशी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बी.बी.शिंदे यांनी केली होती.त्यानंतर न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली होती.याबाबत कोपरगाव येथील न्यायालयात सुनावणी संपन्न झाली होती.या खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले होते.न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.आज दुपारी कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायंदंडाधिकारी डी.डी.अलमले यांनी आरोपी जुबेर तांबोळी यास ०७ वर्षे शिक्षा व ०५ हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड.शरद गुजर यांनी काम पाहिले होते.

   दरम्यान अशा बेशिस्त आणि असामाजिक तत्त्वावर कठोर शिक्षा झाल्याने संस्था चालक,प्राचार्य,विद्यार्थी, विद्यार्थिनी,पालक,सुरक्षारक्षक आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close