सामाजिक उपक्रम
… या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन माजी आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,सुशिलामाई काळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व संजीवनी रक्तपेढी कोपरगाव याच्या सहकार्याने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

“रक्तदान हे केवळ एक सामाजिक कर्तव्य नाही, तर ते एक मानवतेचे प्रतीक आहे. रक्ताची गरज ही कोणत्याही क्षणी, कोणालाही भासू शकते मग तो आपला आप्तस्वकीय असो, मित्र असो किंवा एखादा अनोळखी व्यक्ती.आपण केलेले रक्तदान एखाद्या अंत्यवस्थ व्यक्तीचा जीव वाचवू शकते”- द्यानदेव मांजरे,संचालक,कर्मवीर काळे कारखाना.
माजी आ.अशोक काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी संस्थेचे विश्वस्त ज्ञानदेव मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना विश्वस्त ज्ञानदेव मांजरे यांनी माजी आ.अशोक काळे यांच्या समाजकार्याची प्रशंसा करून त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.रक्तदान शिबिराच्या आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ते म्हणाले की,रक्तदान हे केवळ एक सामाजिक कर्तव्य नाही, तर ते एक मानवतेचे प्रतीक आहे. रक्ताची गरज ही कोणत्याही क्षणी, कोणालाही भासू शकते मग तो आपला आप्तस्वकीय असो, मित्र असो किंवा एखादा अनोळखी व्यक्ती. आपण केलेले रक्तदान एखाद्या अंत्यवस्थ व्यक्तीचा जीव वाचवू शकते. आपल्या देशात दररोज हजारो रुग्णांना अपघात, शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया, कॅन्सर अशा अनेक कारणांसाठी रक्ताची आवश्यकता असते. आजही अनेक रुग्ण केवळ वेळेवर रक्त न मिळाल्याने जीव गमावतात. ही बाब अत्यंत गंभीर असून आपण सर्वांनी याबाबतीत जागरूक होणे गरजेचे आहे. तरुण पिढीने या सामाजिक कार्यात पुढाकार घेवून रक्तदान चळवळीत योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संजीवनी रक्तपेढीच्या संचालिका नीता पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व याविषयी बहुमोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन केले.
या रक्तदान शिबिरात बहूसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचा हेतू, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व या विभागातील विविध कार्यक्रमांची माहिती आपल्या स्वागत व प्रास्ताविकेतून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विशाल पोटे यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साक्षी वाघडकर आणि कु.वैशाली निंबाळकर यांनी केले. प्रा.भीमराव रोकडे यांनी आभार मानले आहे.