जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

लहानपणी श्रीकृष्ण दही,लोणी आणि दुग्धजन्य पदार्थांचे खूप शौकीन होते आणि ते मित्रांसोबत मिळून ते लपवून ठेवत असत.या बाललीलांच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो,कोपरगाव शहरातही तो मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

  दहीहंडी,ज्याला गोपाळकाला किंवा उत्सवम देखील म्हणतात,हा महाराष्ट्रात कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्वाचा उत्सव आहे.यात गोविंदा पथके मानवी मनोरे बनवून उंच ठिकाणी बांधलेली दह्याने भरलेली मातीची हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.आगामी काळात कोपरगाव नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्याने त्याला विशेष महत्व आले होते.नेत्यांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी मोठी उधळपट्टी केल्याचे दिसून आले आहे.हा कार्यक्रम कोपरगाव शहरात डॉ.आंबेडकर मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.या दहीहंडी सोहळ्यासाठी राज्यभरातील नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती.

  यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
             
  यामध्ये कल्याण येथील श्री साईलीला महिला गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात सहभागी होत महिलाही कुठे कमी नाहीत हे दाखवून देत यशस्वी सहा थर रचले.
यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,मागील पाच वर्षात कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत.यामध्ये सर्व समाजांसाठी सभागृह,व्यापारी संकुलांची उभारणी,महापुरुषांचे पुतळे व सुशोभिकरण,पोलिस वसाहत व प्रशासकीय इमारतींची उभारणी ही काही कामे पूर्ण झाली आहेत,तर काही कामे प्रगतीपथावर असून सर्वात महत्वाचा आणि महिला भगिनींच्या अतिशय जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.आजची आपली दहीहंडी हि अविरत जनसेवेची आहे त्यामुळे यापुढील काळातही विकास कामे अविरतपणे सुरूच राहणार असून लवकरच २३२ कोटीच्या भूमिगत गटारीच्या कामास शुभारंभ होईल.  टिंगलटवाळी करून कधीही विकास होत नसतो त्यासाठी ठोस निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेतांना अडथळे देखील येतात, पणआपण कधीच मागे हटलो नाही आणि हटणार पण नाही कारण माझ्या पाठीशी कोपरगावकर आहेत आणि त्यांचा विश्वास आहे.ज्याप्रमाणे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून देतांना मला राज्यात क्रमांक पाचचे मताधिक्य दिले ते ऋण मी कधीही विसरणार नाही.येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत देखील आपली साथ आणि आपला विश्वास असाच माझ्या पाठीशी ठेवा आपण सर्वजण मिळून भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने कोपरगावचं समृद्ध भविष्य घडवून विकासाचा भव्य मनोरा उभारू असे उपस्थित जनसमुदायाला त्यांनी विश्वास दिला.

या  जनसेवेच्या दहीहंडी उत्सव सोहळ्यात राज्यातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता यामध्ये कल्याण इगतपुरी येथील गोविंदा पथकांचा समावेश होता.या गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हजारोंच्या संख्येने कोपरगावकर उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती.अभिनेत्री ज्योत्स्ना सपकाळ व त्यांच्या सहकारी कलाकारांनी केलेले नृत्याविष्कार, डी.जे.आशु आणि डी.जे मॅडी यांच्या धमाकेदार बीट्सने गोविंदा पथकांच्या व नागरिकांचा उत्साह द्विगुणीत केला.
आ.आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार गोविंदा पथकांच्या सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेवून दहीहंडीच्या खाली वाळूचा टाकून व त्यावर गाद्या टाकण्यात आल्या होत्या त्यामुळे एकही गोविंदाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही त्याबद्दल सर्व गोविंदा पथकांनी समाधान व्यक्त करून पुढच्या वर्षी नव्या जोमाने,नव्या उत्साहात येणार असल्याचे सांगितले.कल्याण येथील श्री साई लीला महिला गोविंदा पथकाने यशस्वी सहा थर रचले तर इगतपुरीच्या जय हनुमान गोविंदा पथक व शिर्डीच्या शंभू राजे प्रतिष्ठान या गोविंदा पथकांनी यशस्वीपणे सात थर रचले परंतु एकाही गोविंदा पथकाला आठवा थर रचता न आल्यामुळे एकही गोविंदा पथक दहीहंडी पर्यंत पोहोचू शकले नाही. सात थर रचणाऱ्या दोन्ही पथकांना पहिले बक्षीस विभागून तर श्री साई लीला महिला गोविंदा पथकास दुसरे बक्षीस आ.काळे यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close