जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

शासनातर्फे जलसंधारण विभागाचे गिते यांचा गौरव

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील भूमिपुत्र आणि नाशिक जलसंधारण विभागाचे उपअधीक्षक हरिभाऊ गिते यांना मृद व जलसंधारण विभागाने राज्यात तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल राज्य शासनातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.त्यांचे अहिल्यानगर,नाशिक,धुळे,जळगाव, नंदुरबार आदी जिल्ह्यात lसर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्री.हरिभाऊ गीते,अधीक्षक,नाशिक विभाग,जलसंधारण विभाग.

 

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत नाशिक प्रादेशिक जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण विभागाने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.त्याचे नाशिक विभागाची धुरा वर्तमानात उपअधीक्षक हरिभाऊ गीते यांचेकडे आहे.त्यांचे नगर नाशिक जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत नाशिक प्रादेशिक जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण विभागाने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. राज्य शासनाने विविध विभागांसाठी शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राबवली.यात प्रादेशिक जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण विभागातून तृतीय क्रमांक मिळवला.प्रादेशिक जलसंधारण अधिकारी गिते यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीतील प्रशस्तीपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला आहे.


   दरम्यान या गीते यांच्या या गौरवाबद्दल शिर्डीचे खा . भाऊसाहेब वाकचौरे,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व औरंगाबाद उच्च न्यायालय वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.अजित काळे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काळे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,गंगाधर रहाणे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ,रमेश दिघे, उत्तमराव जोंधळे, शरद गोरडे आदी  मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close