संपादकीय
निळवंडेच्या निमित्ताने न संपणारे महिमामंडन !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
निळवंडे धरणाचे पाणी कालवा कृती समितीने न्यायिक लढ्याच्या मार्गाने आणून दोन वर्षे उलटली आली आहे.अनेक गावांना पाणी मिळाले आहे मात्र बहादरपूर,अंजनापूर,जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,बहादरपूर,(पश्चिम भाग)शहापूर आदी गावांना हे पाणी पोहचलेले नाही शिवाय उजनी उर्फ रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजनाही सुरू न झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त केला आहे.

शेवटी जवळके आणि परिसरातील उपेक्षित आणि दुष्काळी गावांनी वारंवार पाण्याची मागणी करूनही लोकप्रतिनिधींना याकडे पाहण्यास वेळ नाही. परिणामी या भागासाठी वरदान ठरणारी वेस पाझर तलावातून हॉटेल मनोदिप या ठिकाणी बंदिस्त पाइपलाइन मधून पूर पाणी सोडून वरील गावांना वरदान ठरणारी पी.डी.एन.योजना (नदीजोड ) योजना जलसंधारण विभाग कधी पूर्ण करणार असा सवाल दुष्काळी शेतकऱ्यांना पडला आहे.
याबाबतचे सविस्तबर वृत्त असे की,”गोदावरी कालव्याच्या पूर पाण्यावर अवलंबून असणारी व रांजणगाव देशमुख,जवळके,धोंडेवाडी,वेस,सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावांसाठी रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजना युती शासनाच्या काळात या दुष्काळी भागातील रांजणगाव देशमुख,जवळके,बहादरपूर आदी भागातील दुष्काळी कार्यकर्ते आणि जनतेच्या आंदोलनानंतर तत्कालीन खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी तत्कालीन भाजपचे जलसंपदा मंत्री महादेव शिवणकर यांचेकडून ३.८४ कोटी रुपयांची ही योजना मंजूर करून घेतली होती.या योजनेतून रांजणगाव देशमुख,जवळके,बहादरपूर,शहापूर,बहादराबाद,अंजनापूर,धोंडेवाडी,वेस सोयगाव,मल्हारवाडी आणि मनेगाव आदी अकरा गावातील पाझर तलाव ५५ टक्के पूर पाण्यातून भरण्यात येणार होते.तिच्यावर कोपरगाव तालुक्यातील तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी विरोध करून मोठे राजकारण केले व आपल्या निवडणुकीच्या पोळ्या भाजल्या होत्या.खोटी- खोटी उद्घाटने केली,शपथा खाल्ल्या मात्र पाणी काही पूर्ण गावांना कधीच मिळाले नाही.

अकोलेतील मुख कालवा ०- २८ कि.मी.तील काम करण्यासाठी व कालव्याद्वारे पाणी बाहेर काढण्यासाठी समितीला मोठी यातायात करावी लागली होती.त्यावेळी आजच्या श्रेयवादाचे व निवडणुकीच्या वेळी बाहेर पडणारे उंदीर आणि त्यांचे पिटूकले कोणत्या बिळात जाऊन लपले होते हे समजायला मार्ग नाही.अखेर न्यायालयाला सन-२०१९च्या भर पावसाळ्यात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मिळून २२५ लोकांना निंभेरे येथे पाठवावे लागले होते.त्यावेळी कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या भारत शिंगाडे या अधिकाऱ्याच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या धाडसाला दाद द्यावी लागेल.त्यावेळी हे आजचे जलपूजक मर्द (!)मावळे चीन की पाकिस्तानच्या कोणत्या सीमेवर लढत होते हे समजायला मार्ग नाही.ज्याने नाक दिले त्याचे काही नाही आणि नथनी देणाऱ्याचे कोण मोठे कोडकौतुक.
दरम्यान या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून निळवंडे कालवा कृती समितीने उत्तर नगर जिल्ह्यातील ०७ तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना निळवंडे धरणाचे प्रस्तावित पाणी मिळण्यासाठी रस्त्यावरील लढा सूरु केला पण दुसरीकडे औरंगाबाद उच्च न्यायालयात दुष्काळी शेतकऱ्यांना एकत्र करून कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे व विक्रांत रूपेंद्र काले यांच्या वतीने व शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्या विधी सहाय्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.त्यातून औरंगाबाद उच्च न्यायालयाचे आदेशाने दि.३१ मे २०२३ रोजी निळवंडे लाभक्षेत्रातील बहुतांशी गावांना निळवंडे धरणाचे पाणी सोडण्यात आले.येथील पाझर तलाव,कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले जात आहे.या सर्व दुष्काळी भागातील पाझर तलाव आणि के.टी.वेअर तुडुंब भरले आहे.एवढेच नाही तर प्रवरेचे पाणी गोदामय झाले आहे.मात्र जवळके,अंजनापूर, बहादरपूर,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर, कोऱ्हाळे,वाळकी आदी गावांना दोन वर्षे उलटूनही पाणी मिळालेले नाही.त्यासाठी वेस पाझर तलावातून हॉटेल मनोदिप दरम्यान ८००- ९०० मी.लांबीचा बंदिस्त सुमारे ०६ कोटींचा नदीजोड प्रस्तावित असताना सत्ताधारी त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून उजनीचे (रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजनेचे) भिकेचे डोहाळे या दुष्काळी गावांच्या माथी बांधत आहेत.तर बहादरपूर गावासाठी शिवेलगत सिन्नर तालुक्यातील सायाळे गावातून बंदिस्त जलवाहिनी प्रस्तावित केली होती.त्यासाठी बहादरपूर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी पदरमोड करून चारी खोदली आहे.मात्र त्या गावाच्या पश्चिमेस अद्याप एक थेंब पाणी पोहचलेलं नाही.

उच्च न्यायालयात निळवंडे कालवा कृती समितीने निळवंडे कालव्यांसाठी जनहित याचिका दाखल केली त्यावेळी कालवा कृती समितीला विरोध करण्यासाठी आणि पिण्याच्या नावाखाली पाणी पळविण्यासाठी केवढा खटाटोप.अपवाद वगळता उत्तरेतील सर्व साखर कारखाने,नगरपालिका,संस्थाने आदींनी औरंगाबाद खंडपीठात मोजून २६ वकिलांची अखंड फळी उभी केली होती.त्यांना तोंड देण्यासाठी कालवा कृती समितीकडे एकमात्र विनामोबदला एक प्रामाणिक आणि अभेद्य वकील उभे होते त्यांचे नाव ॲड.अजित काळे.ऑक्टोबर २०२२ पर्यंत कालवे पूर्ण करण्याची अंतिम मुदत उच्च न्यायालयाने दिली होती.मात्र तरीही त्यात अडचणी आणण्याचे आणि विंचू इंगळ्या सोडण्याचे (अ) पवित्र काम करणारी व आज जलपूजनाला धावाधाव करणारी मंडळी थांबवत नव्हती.उच्च न्यायालयाने कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी एकूण ०६ मुदतवाढी देऊनही काम पूर्ण होत नव्हते.अखेर न्यायालयाला दिनाक १८ जानेवारी २०२३ रोजी मुदतवाढ न देण्याचे ठणकावले होते.त्यानंतरही संवेदना हरवलेले गेंड्याच्या कातडीच्या जलसंपदा विभागाने ऐकले नाही अखेर न्यायालयाला दि.१३ जुलै २०२३ रोजी सरकारचे आर्थिक अधिकार गोठवावे लागले होते. हे इतके लवकर विसरतील असे वाटले नव्हते.
उत्तरेतील नेते आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रोज एक जलपूजन करत आहेत.ज्यांनी निळवंडे न होण्यासाठी आयुष्यभर देव पाण्यात बुडवले, पाणी परिषदा घेतल्या,ज्यांनी २७ जानेवारी २००४ रोजी सर्वपक्षीय एकत्र येत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काढण्यासाठी रांजणगाव देशमुख आणि वाळकी फाटा आदी ठिकाणी खोटी उद्घाटने केली त्यांना आता निळवंडेचा केवढा कळवळा.उच्च न्यायालयात निळवंडे कालवा कृती समितीने निळवंडे कालव्यांसाठी जनहित याचिका दाखल केली त्यावेळी कालवा कृती समितीला विरोध करण्यासाठी आणि पिण्याच्या नावाखाली पाणी पळविण्यासाठी केवढा खटाटोप.अपवाद वगळता उत्तरेतील सर्व साखर कारखाने,नगरपालिका,संस्थाने आदींनी औरंगाबाद खंडपीठात मोजून २६ वकिलांची अखंड फळी उभी केली होती.त्यांना तोंड देण्यासाठी कालवा कृती समितीकडे एकमात्र विनामोबदला एक प्रामाणिक आणि अभेद्य वकील उभे होते त्यांचे नाव ॲड.अजित काळे.ऑक्टोबर २०२२ पर्यंत कालवे पूर्ण करण्याची अंतिम मुदत उच्च न्यायालयाने दिली होती.मात्र तरीही त्यात अडचणी आणण्याचे आणि विंचू इंगळ्या सोडण्याचे (अ) पवित्र काम करणारी व आज जलपूजनाला धावाधाव करणारी मंडळी थांबवत नव्हती.उच्च न्यायालयाने कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी एकूण ०६ मुदतवाढी देऊनही काम पूर्ण होत नव्हते.अखेर न्यायालयाला दिनाक १८ जानेवारी २०२३ रोजी मुदतवाढ न देण्याचे ठणकावले होते.त्यानंतरही संवेदना हरवलेले गेंड्याच्या कातडीच्या जलसंपदा विभागाने ऐकले नाही अखेर न्यायालयाला दि.१३ जुलै २०२३ रोजी सरकारचे आर्थिक अधिकार गोठवावे लागले होते.तांभेरे,राहुरी येथील वन विभागाच्या भूसंपादनाचा मुद्दा असाच सोडवावा लागला होता.

आजही राहाता तालुका वगळता पिडीएन चेकाम सहा तालुक्यातील कोणत्याही गावी सुरू दिसत नाही.निळवंडेच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी १८२ गावांचे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण गत तीन वर्षापासून लेखी मागणी करूनही नेते उपाधी लावणाऱ्या आणि दारूसाठी पाणी चोरणाऱ्या जेत्यांना ऐकू जात नाही.अकोले तालुक्यातील कालव्यांच्या दुतर्फा साइड गटारी करायच्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पाणी रोखायचे आहे आदी मागण्या ही मागणी त्यांच्या कानी जात नाही. अधिकारी त्यांच्या हो त हो मिळवत आहे. तुकाराम मुंढे,निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन, गो.रा.खैरनार या अधिकाऱ्यासारखा स्वतंत्र बाणा त्यांचा कधीच हरवला आहे.बांबूचे जंगल एकमेकावर घासून पेटलेल्या अग्निने जळून खाक होते अशी यांची अवस्था.
अकोलेतील मुख कालवा ०- २८ कि.मी.तील काम करण्यासाठी व कालव्याद्वारे पाणी बाहेर काढण्यासाठी समितीला मोठी यातायात करावी लागली होती.त्यावेळी आजच्या श्रेयवादाचे व निवडणुकीच्या वेळी बाहेर पडणारे उंदीर आणि त्यांचे पिटूकले कोणत्या बिळात जाऊन लपले होते हे समजायला मार्ग नाही.अखेर न्यायालयाला सन-२०१९च्या भर पावसाळ्यात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मिळून २२५ लोकांना निंभेरे येथे पाठवावे लागले होते.त्यावेळी कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या भारत शिंगाडे या अधिकाऱ्याच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या धाडसाला दाद द्यावी लागेल.त्यावेळी हे आजचे जलपूजक मर्द (!)मावळे चीन की पाकिस्तानच्या कोणत्या सीमेवर लढत होते हे समजायला मार्ग नाही.ज्याने नाक दिले त्याचे काही नाही आणि नथनी देणाऱ्याचे कोण मोठे कोडकौतुक सुरू आहे.सभासदांचे काटे मारून एक उत्खनक आणि दोन ट्रॅक्टर’ने दुष्काळी कार्यकर्त्यांना उपकृत करून जनतेला लाचारीच्या खाईत लोटले जात आहे.आणि मतांच्या झोळ्या भरल्या जात आहे.
आजही राहाता तालुका वगळता पिडीएन चेकाम सहा तालुक्यातील कोणत्याही गावी सुरू दिसत नाही.निळवंडेच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी १८२ गावांचे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण गत तीन वर्षापासून लेखी मागणी करूनही नेते उपाधी लावणाऱ्या आणि दारूसाठी पाणी चोरणाऱ्या जेत्यांना ऐकू जात नाही.अकोले तालुक्यातील कालव्यांच्या दुतर्फा साइड गटारी करायच्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पाणी रोखायचे आहे आदी मागण्या ही मागणी त्यांच्या कानी जात नाही. अधिकारी त्यांच्या हो त हो मिळवत आहे. तुकाराम मुंढे,निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन, गो.रा.खैरनार या अधिकाऱ्यासारखा स्वतंत्र बाणा त्यांचा कधीच हरवला आहे.बांबूचे जंगल एकमेकावर घासून पेटलेल्या अग्निने जळून खाक होते अशी यांची अवस्था.तरीही ही भोंदू नेते मंडळी म्हणते,”निळवंडे हे आमच्या आज्याचे स्वप्न होते,कोण म्हणते पंजाची दिव्य दृष्टी होती तर कोणी म्हणे आमच्या पितांजींचा साक्षात्कार होता.कोणी म्हणतो चिंचोलीत दुष्काळी परिषद घेतली,तर अन्य कोणी.म्हणे राज्यस्तरीय पाणी परिषद घेतली.या निर्लज्जपणाला तरी आमचे शब्द भांडवल अपूर्ण आहे हे सांगताना कमीपणा वाटत नाही.समर्थ रामदास स्वामींच्या,”सांगे वडिलांची किर्ती….! या उक्ती प्रमाणे यांची अवस्था झाली आहे.या नेत्यांची एक बाब आता सार्वत्रिक झाली आहे.कोणत्याही चारी आणि कालव्याला पाणी सोडले तर ही मंडळी पाणी आम्हीच सोडले याची बढाई मारल्याशिवाय यांना झोपच येत नाही.त्यांच्या या मूर्खपणाtला पाहून सरकारची कीव करावीशी वाटते. आपल्या गुणांची किंमत स्वतः नव्हे तर इतरांनी करायला हवी असते हे यांना कोणी सांगायचे? बॅनरबाजी आणि सोशल मीडियाच्या या शीघ्र काळात इतका दम धरायचा तरी कसा? असा बापड्यांना बहुधा प्रश्न पडला असावा.जेथे मुकुटाने बसावे त्या ठिकाणी जोड्यांनी बसायचा हा काळ वेगळी अपेक्षा तरी कशी करायची ? सरकार आणि जलसंपदा विभाग मग अधिकारी आणि पाटकरी नेमतात तरी कशाला ? असा प्रश्न कोणाही सुद्द्न्यास न पडला तर नवल! अखेर जलसंपदा विभाग धरणात पाणी कशाला साठवतो.इंग्रजांनी धरणे कशाला बांधली ? धरणे भरल्यावर पाणी कोठे जाणार आहे.या नेते मंडळींनी धरणे काठोकाठ भरल्यावर जलसंपदा विभागाला सांगितले नाही तर पाणी परत ढगात जाणार आहे का ? नदीत आणि कालव्यात वाहण्यासाठी पाण्याला इंद्रदेवतेची पूजा करावी लागणार आहे का ? या दळभद्री नेत्यांची ? सर्वच प्रश्न वर्तमानातील कलियुगाला धरूनच म्हटले पाहिजे.यांचे आजचे वर्तन पाहिले की आपसुकच आपले अंगठा चोखायचे वय आठवल्याशिवाय राहत नाही. दुष्काळी आणि बागायती भागातील मतदारांची अवस्था तर विचारायलाच नको,जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून ते विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा आपल्यातच लिन होतो.तसे या भागातील पैसा घेऊन मतदान करणाऱ्यांची मतदारांची आणि विकत मते घेणाऱ्या पुढाऱ्यांची अवस्था.यां लाचार फौजांकडून वेगळी अपेक्षा तरी काय करणार ! गेली ५५ वर्षे प्रत्येक निवडणुकांच्या वेळी निळवंडे कालव्यांचे गजरे दाखवली जायची आता चाऱ्याची दाखवून गावोगाव जलपूजनाचा महिमा सुरू असून नेत्यांचे न संपणारे महिमामंडन सुरू आहे.
——————————-
संपर्क आणि प्रतिक्रिया -7066 227 227.
नियमित *विश्वसनीय बातम्या *फ्री ‘न्यूजसेवा’* साठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*
https://bit.ly/newsseva2024
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी अथवा सर्च इंजिनवर जाऊन ताज्या बातम्यांसाठी न्यूजसेवा सर्च करा.