गुन्हे विषयक
तरुणाचा खून,तिघांना पोलिसांनी केली अटक

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
जुन्या भांडणाच्या कारणावरून ३ तरुणांनी एका तरुणाचा चाकुने भोसकुन खुन केल्याची घटना शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास शिर्डी शहरातील नगर मनमाड रस्त्याच्या कडेला साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ६ समोर असलेल्या हाँटेल बालाजी समोर घडल्याने शिर्डीसह परिसरात खळबळ उडाली आहे.

“आपला मुलगा सानुकुमार याची साई कुमावत व शुभम गायकवाड यांच्यासोबत मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून व भांडण मिटविण्यासाठी त्यांच्यात बाचाबाची होऊन साई कुमावत व शुभम गायकवाड यांनी त्यांच्याकडील असलेल्या चाकूने सानुकुमार याच्या छातीत खुपसून त्यास गंभीर जखमी करून त्यास जीवे ठार मारले आहे”नवीनकुमार ठाकूर,मयताचे वडील.
याबाबत शिर्डी पोलिसांनी या दोन तरुणांविरूद्ध आज रविवारी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात असल्याची माहिती शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.या घटनेने शिर्डीत पुन्हा खळबळ उडाली आहे.
सानुकुमार नवीन ठाकूर (वय १८, रा. शिर्डी, मुळगाव बिहार ) असे मयत तरुणाचे नाव आहे. साई सुनील कुमावत ( परदेशी वय १९ ), शुभम सुरेश गायकवाड (वय १९ ,दोघेही रा. शिर्डी या. राहाता) या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मयत सानुकुमार याचे वडील नविन कुमार ठाकुर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”हाँटेल बालाजी भवनासमोर माझा मुलगा सानुकुमार याची साई कुमावत व शुभम गायकवाड यांच्यासोबत मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून व भांडण मिटविण्यासाठी त्यांच्यात बाचाबाची होऊन साई कुमावत व शुभम गायकवाड यांनी त्यांच्याकडील असलेल्या चाकूने सानुकुमार याच्या छातीत खुपसून त्यास गंभीर जखमी करून त्यास जीवे ठार मारले आहे.या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी साई कुमावत व शुभम गायकवाड या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.या तरुणांनी नशेत सानुकुमार याचा खुन केल्याची कबुली दिली असल्याचे गलांडे यांनी सांगितले आहे.या दोन्ही आरोपींना शिर्डी पोलिसांनी अटक करून त्यांना राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
शिर्डी पोलिस या हत्येमागील नेमके कारण आणि वादाचा तपशील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे अस्वस्थता पसरली आहे.दहीहंडीच्या सणासारख्या आनंदी प्रसंगी अशी हिंसक घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीती व्यक्त केली जात आहे.यामुळे शिर्डी शहरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.