कृषी विभाग
… या ठिकाणी रानभाज्यांचे प्रदर्शन !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तहसील कार्यालय येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसीलदार महेश सावंत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

रानभाज्यांचे आपल्या आहारात नियमित सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.त्यामुळे,शक्य असल्यास, पावसाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या या नैसर्गिक आणि आरोग्यदायी भाज्या अवश्य खा आणि निरोगी राहा! हा संदेश देण्यासाठी तालुका कृषी विभागाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रामभाज्यांचे प्रदर्शन कोपरगाव तहसील मध्ये आयोजित केले होते.
रानभाज्या या फक्त आरोग्यदायीच नाहीत,तर त्या आपल्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत.त्या परागीभवनासाठी फुलपाखरांसारख्या कीटकांना आकर्षित करतात,ज्यामुळे शेतीलाही अप्रत्यक्षपणे फायदा होतो.रानभाज्यांचे आपल्या आहारात नियमित सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.त्यामुळे,शक्य असल्यास, पावसाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या या नैसर्गिक आणि आरोग्यदायी भाज्या अवश्य खा आणि निरोगी राहा! हा संदेश देण्यासाठी तालुका कृषी विभागाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रामभाज्यांचे प्रदर्शन कोपरगाव तहसील मध्ये आयोजित केले होते.त्यावेळी आ.काळे बोलत होते.
सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी,कृषी विभागाचे अधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
याप्रसंगी या महोत्सवात स्थानिक महिला बचतगट,शेतकरी व स्वयंसेवी संस्थांनी स्टॉल लावून विविध पारंपरिक रानभाज्या,त्यांचे पोषणमूल्य,उपयोग व स्वयंपाक पद्धतीचे सादरीकरण करत सहभाग घेतला आहे.अनेकाना या रानभाज्यांची ओळख झाली आहे.या प्रसंगी कृषी अधिकारी मनोज सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.