जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

पाणी शुद्धीकरणात अफरातफर,कारवाईसाठी आंदोलन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


देशभरात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात संपन्न होत असताना कोपरगाव तालुक्यात मात्र विपरीत परिस्थिती पाहायला मिळाली असून हिंगणी ग्रामपंचायतने जल शुद्धीकरण यंत्र एका इसमास चालविण्यास दिले असताना त्याने त्यापोटी द्यावयाची रक्कमच ग्रामपंचायत खात्यात भरली नसल्याने या ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करत तेथील कार्यकर्त्यांनी ऐन स्वतंत्र दिनाच्या दिवशी प्रशासनास पेचात सापडवले आहे.त्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आमचे प्रतिनिधीने याबाबत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी त्याला दुजोरा दिला आहे.व तक्रारदार अर्जुन गोकुळ पवार यांचे आरोपात तथ्य असल्याचे सांगून पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासित केले आहे.त्यामुळे आंदोलनकर्ते आता काय भूमिका घेणार याकडे हिंगणी आणि परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

  १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.कोपरगाव त्याला अपवाद नाही आज तहसील कार्यालयसह तालुक्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.मात्र कोपरगाव तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायतने आपल्या हद्दीत जल शुद्धीकरण प्रकल्पात २.३८ लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप येथील कार्यकर्ते अर्जुन गोकुळ पवार यांचेसह अन्य कार्यकर्त्यांनी कोपरगाव पंचायत समिती समोर आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे हिंगणीचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी अडचणीत आले आहे.

हिंगणी ग्रामपंचायतने आपल्या हद्दीत नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्यासाठी २०२१ साली एक जलशुद्धीकरण यंत्र (फिल्टर/आर.ओ.) खरेदी केले होते.ते चालविण्यासाठी आधी निलेश लक्ष्मण पवार या चालकास खर्च वजा जाता ०६ हजार रुपये प्रति महिना दराने चालविण्यास दिले होते.त्यानंतर ते गेली चार वर्षे संजय यमाजी पवार यांस हा इसम चालवत आहे.मात्र ०४ वर्षे उलटूनही खर्च वजा जाता ठेकेदार संजय पवार याने ते भरले नाही. त्यामुळे गेली चार वर्षे ग्रामपंचायतची एकूण रक्कम ०२ लाख ७० हजार रुपये होती.पैकी ३२ हजार रुपये वजा जाता ग्रामपंचायतचे ०२ लाख ३८ हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे गावच्या आर्थिक विकासाला खीळ बसली आहे.याला जबाबदार सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद अडसूळ हे दोघे जबाबदार आहे.म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या साठी हे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू झाले आहे.आंदोलन कर्त्यांनी फिल्टर चालक हा सरपंचाचा मामा असल्याने हे संरक्षण केले जात असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान आंदोलन सुरू होऊन दोन दिवस होऊनही ते संपलेले नाही.त्यामुळे ग्रामस्थांत चिंता पसरली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने गटविकास अधिकारी संदीप दळवी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सदर विषय ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांना अवगत असून त्यांनी त्याची चौकशी केली असल्याचे सांगितले असून कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.

आमचे प्रतिनिधीने याबाबत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी त्याला दुजोरा दिला आहे.व तक्रारदार अर्जुन गोकुळ पवार यांचे आरोपात तथ्य असल्याचे सांगून पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासित केले आहे.त्यामुळे आंदोलनकर्ते आता काय भूमिका घेणार याकडे हिंगणी आणि परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान या चौकशीत सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद अडसूळ यांनी संबंधित संजय पवार या चालकाने सदर रक्कम भरण्यासाठी तीन महिन्याची मुदत मागितली होती मात्र ती देऊनही त्याने ती पाळली नसल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे.त्यामुळे आता गटविकास अधिकारी काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close