जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

…या तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.कोपरगाव त्याला अपवाद नाही आज तहसील कार्यालय येथे तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते तर कोपरगाव पंचायत समितीच्या आवारात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप, तर नगरपरिषदेत मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील विविध सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,ग्रामपंचायतीत प्रभात फेऱ्यानंतर सरपंच,जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये,सहकारी संस्थात त्या त्या पदाधिकाऱ्यांनी तर पदाधिकारी नसलेल्या ठिकाणी प्रशासक आदींनी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पाडले आहे.

  १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.हा दिवस १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याचे स्मरण करतो.या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘विकसित भारत’ आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरामध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देत ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि भाषण करतात.या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते,संपूर्ण देश हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि देश आणि राज्यासह कोपरगाव तालुक्यातही विविध ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात केले आहे.

  कोपरगाव तहसीलमध्ये तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते तर तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ०९.०५ वाजता संपन्न झाला आहे.

  त्यावेळी तहसील इमारतीवर निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी ध्वजारोहण केले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप ध्वजारोहण करताना.

 

सदर प्रसंगी  कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,गटविकास अधिकारी संदीप दळवी,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राजेंद्र सोनवणे,शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,अजित पवार गट राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,कृष्णा आढाव,वीरेन बोरावके आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

माधवराव आढाव विद्यालयात कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप ध्वजारोहण करताना.

  दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेत मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी पालिका आवारात ध्वजारोहण केले त्यावेळी उपमुख्याधिकारी उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडेजा,आरोग्य विभागाचे सुनील आरण,आदींसह बहुसंख्येने विभागप्रमुख,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

  दरम्यान कोपरगाव पंचायत समितीसमोर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप यांचे हस्ते करण्यात आले आहे.त्यावेळी आय. सी.डी.एस.चे अधिकारी पंडित वाघेरे,उपगटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,गट शिक्षण अधिकारी शबाना शेख,तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.श्रध्दा काटे,कक्षाधिकारी ऋषिकेश बोरुडे,कनिष्ठ अभियंता अश्विन वाघ,संतोष नलगे,रवींद्र घारे आदींसह बहुसंख्येने पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मात्र गटविकास अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे.

  कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या तर तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण पार पाडले आहे.

  कोपरगाव तालुक्यातील विविध सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,ग्रामपंचायतीत प्रभात फेऱ्यानंतर सरपंच,जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये,सहकारी संस्थात त्या त्या पदाधिकाऱ्यांनी तर पदाधिकारी नसलेल्या ठिकाणी प्रशासक आदींनी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पाडले आहे.तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close