धार्मिक
…’या’ गावी अखंड हरिनाम सप्ताह सुरू !

न्युजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह ह.भ. प.भानुदास महाराज रोहम यांच्या हस्ते तसेच महंत रमेशगिरी महाराज जनार्दन आश्रम यांच्या पूजनाने संवत्सर शनी मंदिरासमोर माजी जि.प.सदस्य राजेश परजणे यांचे प्रमुख उपस्थितीत व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ संवत्सर यांच्या भजन सेवेने आज पासून सुरू झालेले आहे.

वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे. यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाङमयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त परायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम पर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात येते. ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विशद केले जाते.जे संवत्सर येथे सुरू आहे.
सालाबाद प्रमाणे गोदावरी नदीच्या काठी शृंगऋषी या ठिकाणी ऋषी भोजनाची परंपरा रामायण महाभारतापासून चालू असलेली ती परंपरा परमपूज्य महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून त्यांच्या भजनाच्या कार्यक्रमाने व आशीर्वादाने सुंगेश्वर मंदिर या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे.

त्या ठिकाणी नामदेवराव पाटील गोदावरी दूध संघ अध्यक्ष राजेश पारजणे यांचे हस्ते पूजा करून उपसरपंच विवेक परजणे,दिलीप ढेपले योगेश गायकवाड,धीरज देवतरसे,ज्ञानेश्वर कासार,विजय आगवन यांच्या हस्ते पूजा करून शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांना ऋषी भोजन देण्यात आले आहे.
सदर प्रसंगी ह.भ.प.वाल्मीक महाराज जाधव, लक्ष्मणराव साबळे,चंद्रकांत लोखंडे,भरतराव बोरनारे,सोमनाथ निरगुडे,लक्ष्मणराव परजणे, अनिल आचारी,राजेंद्र भोकरे गावातील ग्रामस्थ व भजनी मंडळ उपस्थित होते.