शैक्षणिक
…हे भारतीय साहित्यातील क्रांतिकारी साहित्यिक-माहिती

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
“मुंशी प्रेमचंद हे केवळ हिंदी साहित्यातीलच नव्हे तर भारतीय साहित्यातील क्रांतिकारी साहित्यिक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर हिंदी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली त्यावेळी समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ठाणगे बोलत होते.

सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “मुंशी प्रेमचंद यांनी शंभर वर्षांपूर्वी परतंत्र भारतातील रूढी-परंपरा आणि सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी साहित्याला माध्यम बनवले आणि शेकडो कथा- कादंबऱ्यांचे लेखन केले.त्यांचे साहित्य कालजयी साहित्य आहे.त्यामुळे ते आजही पूर्वीइतक्याच आवडीने वाचले जाते. विद्यार्थ्यांनी प्रेमचंद यांच्या कथा कादंबऱ्या अवश्य वाचाव्यात.त्यांनी भारतीय साहित्यामध्ये शेतकरी,शेतमजूर आणि दलित-शोषित वर्गाला केंद्रस्थानी ठेवून कथा कादंबऱ्यांचे लेखन करणाऱ्या प्रेमचंदांनी भारतीय साहित्यामध्ये समाज-परिवर्तनासाठी साहित्य सृजनाची मुहूर्तमेढ रोवली असल्याचे शेवटी सांगितले आहे.
याप्रसंगी प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा-पूजन करून साहित्यसम्राट प्रेमचंद यांना अभिवादन करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक प्रा.जिभाऊ मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.सोळसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संशोधक विद्यार्थी सतीश दवंगें यांनी मानले आहे.कु.सुरेखा पवार,श्रीमती श्रद्धा सिनगर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले आहे.