जयंती,पुण्यतिथी अभिवादन
…या शहरात लोकशाहीर साठे यांची जयंती उत्सवात संपन्न !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते,तर ते समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

अण्णाभाऊ साठे जन्म: १ ऑगस्ट १९२० रोजी झाला होता तर मृत्यू: १८ जुलै १९६९ झाला होता
ते एक थोर मराठी लेखक,समाजसुधारक आणि लोककवी होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला.त्यांनी समाजातील गरीब आणि वंचित घटकांसाठी खूप मोठे कार्य केले.त्यांनी ३२ कादंबऱ्या,१३ कथासंग्रह,प्रवासवर्णन, लोकनाट्ये आणि अनेक गाणी लिहिली. त्यांना ‘लोकशाहीर’ म्हणून ओळखले जाते.त्यांची जयंती कोपरगाव सह राज्यभरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे त्या प्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गांगुले, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,बाळासाहेब आढाव,राजेंद्र वाघचौरे,संतोष चवंडके,दिनार कुदळे,शिवाजी खांडेकर,नवाज कुरेशी,दिनकर खरे,पदाधिकारी,कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे समाजाच्या तळागाळातून आलेले थोर साहित्यिक आणि क्रांतिकारक होते.त्यांनी आपल्या लेखणीला शस्त्र बनवून वंचित,शोषित आणि उपेक्षित जनतेच्या वेदना शब्दांतून मांडल्या.त्यांच्या कथा,कविता आणि गीतांमध्ये दुःख आहे, संघर्ष आहे,पण त्याहून अधिक आशा आणि परिवर्तनाची जिद्द आहे.ते साहित्यिक, समाजसुधारक आणि क्रांतीचे प्रतीक होते. अण्णाभाऊ साठे हे कामगार,शेतकरी आणि उपेक्षितांच्या हक्कासाठी लढणारे खरे जनकवी होते. त्यांच्या विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी उपस्थितांचे आभार परशुराम साळवे यांनी मानले आहे.