शैक्षणिक
विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीच्या मार्गावरूनच यश शक्य -..यांचे प्रतिपादन

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीच्या मार्गावरूनच गुणवत्तेच्या शिखराकडे जाणे शक्य आहे.आपल्याला गुणवत्तेच्या दिशेने जाण्याचा मार्ग कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिकविला आहे.त्याच मार्गावरून आपल्याला पुढे जायचे असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“शिस्त ही गुणवत्तेची खरी ओळख गुणवत्ता सुधारण्यासाठी शिस्त फारच महत्त्वाची असते.यश हे गुणवत्तेच्या जोरावर मिळते,पण हे यश टिकवायचे असल्यास स्वयंशिस्त अत्यावश्यक असते.शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत.”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,रयत शिक्षण संस्था,उत्तर विभाग.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील शाखाप्रमुख सहविचार व गुणवत्ता सुधार कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने,राहुल जगताप, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे,कार्यालयीन प्रमुख राजनंदन पांडुळे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शाखाप्रमुख उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शिस्त ही गुणवत्तेची खरी ओळख गुणवत्ता सुधारण्यासाठी शिस्त फारच महत्त्वाची असते.यश हे गुणवत्तेच्या जोरावर मिळते,पण हे यश टिकवायचे असल्यास स्वयंशिस्त अत्यावश्यक असते.शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत.प्रवेश वाढविण्यासाठी प्रयत्न,पालक संवाद,आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.घटती विद्यार्थी संख्या हे मोठे आवाहन आहे जर विद्यार्थी टिकले,तर संस्था टिकेल आणि ही जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.यावर एकच उपाय म्हणजे गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत.शैक्षणिक शिस्तीसाठी प्रसंगी काही वेळा वाईटपणा घ्यावा लागतो,शाखा प्रमुखांनी त्या भूमिकेसाठी सदैव तयार राहिले पाहिजे असे सांगितले
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी केले
यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए.आय. आधारित इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड यंत्रणेचा प्रभावी उपयोग,प्रशिक्षण आणि देखभाल करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.गुणवत्ता सुधार कार्यक्रम विद्यार्थी प्रगती,शिकविण्याच्या पद्धती,शिक्षकांचे प्रशिक्षण,निकाल यामध्ये सुधारणा करण्याचे उपाय संस्थेने राबवले जात आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी केले तर सदर प्रसंगी विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी शाखांसमोर अनंत अडचणी आहेत.शाळांमधील अडचणींची नोंद,उपाययोजना व मागण्या विभागीय पातळीवर केल्या जात असल्याचे शेवटी सांगितले आहे.