जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अनैतिक संबंधातून तरुणाचा बळी?

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी नजीक पश्चिमेस हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात नदी पात्राकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिमेस असलेल्या एका कुटुंबातील महिलेचे जवळच्या नातेवाईकांशी असलेले अनैतिक संबंध गावभर उघड केल्याच्या रागातून जवळच्या नातेवाईकाने महिलेच्या २७ वर्षीय मुलास बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणातून सदर तरुणाने आज दुपारी नैराश्येत जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांना कोणतीही खबर स्थानिक पोलिसांच्या खबऱ्याने दिलेली दिसत नाही त्यामुळे या घटनेतील पुरावा नष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संकल्पित छायाचित्र.

अनैतिक संबंधात सदर महिलेच्या तीन मुलांचा अडथळा येत असल्याने एक एकास विविध निमित्ताने संपवले आहे.एकास अतिरिक्त मद्य पाजून तर एकास नदीत कडेलोट करून आपल्या प्रेमसंबंधात अडथळा दूर केला असल्याची माहिती आहे.एक मुलगा भोळसट होता.पण त्याला हे संबंध डोळ्यात खुपत होते. त्याने हे लक्षात येताच गावभर दवंडी पिटण्यास सुरुवात केल्याने तो या नराधमाच्या डोळ्यावर आला होता.त्यातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.

    इंडियन पिनल कोड  म्हणजे भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९७  मध्ये विवाहबाह्य संबंधांची व्याख्या सांगण्यात आली आहे.एखादी महिला दुसऱ्या पुरुषाची पत्नी आहे किंवा पत्नी असण्याची शक्यता आहे अशा महिलेसोबत तिच्या पतीच्या परवानगीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे याला ‘अडल्ट्री’ असं म्हटलं जातं.यासाठी ०५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते,दंड भरावा लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा दोऊ शकतात.असे असताना कोळपेवाडी नजीक हाकेच्या अंतरावर नदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अधिवास असलेल्या महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.तिला एक मुलगी आणि तीन मुले होती.मात्र पतीचे निधन झाल्यावर सदर महिलेला जवळच्याच नातेवाईकाने संपत्तीवर डोळा ठेवून तिला अनैतिक संबंधात अडकवले असल्याची ग्रामस्थांत जोरदार चर्चा सुरू आहे.त्यातील कोपरंगावच्या पूर्वेकडील जमीन विक्री करून नदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक एकर क्षेत्र घेऊन वस्ती बांधली आहे.उर्वरित पैशाची जीवाची मुंबई केल्याची माहिती आहे.

   दरम्यान या अनैतिक संबंधात सदर महिलेच्या तीन मुलांचा अडथळा येत असल्याने एक एकास विविध निमित्ताने संपवले आहे.एकास अतिरिक्त मद्य पाजून तर एकास नदीत कडेलोट करून आपल्या प्रेमसंबंधात अडथळा दूर केला असल्याची माहिती आहे.एक मुलगा भोळसट होता.पण त्याला हे संबंध डोळ्यात खुपत होते. त्याने हे लक्षात येताच गावभर दवंडी पिटण्यास सुरुवात केल्याने तो या नराधमाच्या डोळ्यावर आला होता.आज सकाळी अशीच घटना त्या मयत मुलाचे लक्षात आल्याने त्याने त्याचा गाजावाजा आपल्या नातेवाईकांत केला होता.परिणामी तो घरी आल्यावर त्याला त्याच्या ..’त्या ‘नातेवाईकाने बेदम मारले होते.त्यातून तो नैराश्येत गेला होता.व त्यांने आज दुपारी एकच्या सुमारास गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली असल्याची माहिती आहे.सदर नराधमाचे सदर महिलेच्या मतिमंद मुलीशी अनैतिक संबंध असल्याची जोरदार चर्चा गाव आणि परिसरात सुरू आहे.पुरावा नष्ठ होण्यासाठी त्याला मूठमाती देण्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणतेही तक्रार दाखल नसल्याची माहिती दिली आहे.तक्रार दाखल करण्यास आता कोणीही उरलेले नाही.गावात पोलीस पाटलाची जागा रिक्त आहे.त्यामुळे आता कोपरगाव तालुका पोलीस आता काय भूमिका घेणार एका आवाज उठवणाऱ्या मुलास न्याय मिळणार का ? याकडे कोळपवाडी आणि तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close