जलसंपदा विभाग
…या कालव्यांना पाणी सोडले,खरीपास जीवदान

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
खरीप पिकांना पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके धोक्यात आल्याने व शेतकऱ्यांनी आ. काळे यांचेकडे पुरपाणी सोडण्याची केलेल्या मागणीची दखल घेवून जलसंपदा विभागाने काल पासून गोदावरी डाव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

गोदावरी कालव्यांना जलसंपदा विभागाने पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन,बाजरी, मका,कापूस,भुईमुग आदी खरीप पिकांना जीवदान मिळण्यास मदत होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त होत आहे.
खरीप पिकांना सध्या पावसाची ओढ जाणवत आहे,ज्यामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.अनेक ठिकाणी पेरणी झालेल्या पिकांना पाण्याची गरज आहे,परंतु पावसाअभावी पिके सुकत चालली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.त्यातच जायकवाडी धरण समन्यायी पाणी वाटपाच्या सूत्रानुसार ६५ टक्के भरल्याची व तो साठा जवळपास ८० टक्क्यांवर गेल्याची समाधानकारक बातमी आल्याने त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविण्यासाठी गोदावरी कालव्यांचे पाणी सोडण्याची मागणी त्यांचेकडे व जलसंपदाच्या नाशिक विभागाकडे केली होती.त्याची दखल घेऊन हे पूर पाणी सोडले आहे.

परिणामी मोठ्या प्रमाणात सोयाबीन,बाजरी, मका,कापूस,भुईमुग आदी खरीप पिकांना जीवदान मिळण्यास मदत होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त होत आहे.