कामगार जगत
…या तालुक्यातील बांधकाम कामगारांना साहित्य वाटप

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील ६२६ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते गृहपयोगी वस्तूंचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे विविध योजनांचा लाभ मिळतो.यामध्ये शैक्षणिक सहाय्य, आरोग्य सुविधा,आर्थिक मदत,आणि निवृत्ती वेतनासारख्या सुविधांचा समावेश आहे.कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल हॉल येथे कोपरगाव मतदार संघातील ६२६ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते गृहपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते तसेच बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.